जगातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्ती कोण? पहिला नंबर कुणाचा ?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या विवाहावरील खर्च आणि चमचमत्या ताऱ्यांची उपस्थिती आणि श्रीमंतीचे प्रदर्शन पाहून आपण जगात कुठे आहोत हे समजायला हवे, जगातील टॉप टेन श्रीमंत व्यक्तींची यादी ब्लुमबर्गने जाहीर केली आहे. पाहा कोण आहेत जगातील सर्वात दहा श्रीमंत व्यक्ती
मुंबई | 5 मार्च 2024 : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये रियालन्सचे इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा गुजरातच्या जामनगरात गेले काही दिवस सुरु आहे. बॉलीवूडपासून जगभरातील नामीगिरामी मंडळे या सोहळ्यात उपस्थित राहीले आहेत. मुकेश अंबानी यांना भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून मान आहे. तसाच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून टेस्ला कंपनीचे मालक इलोक मस्क यांचे स्थान घसरले आहे. आणि पुन्हा जेफ बेझोस हेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नंबरवन वर आले आहेत.
सोमवारी इलोक मस्क यांच्यया टेस्ला इंकमधील शेअर सोमवारी 7.2 टक्के घसरले आणि त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हा बहुमान गमावला आहे. ब्लूमबर्ग यांच्या माहीतीनुसार अब्जाधीशांच्या स्थानानूसार आता जेफ बेझोस पुन्हा नंबर वन झाले आहेत. इलोन मस्क यांची संपत्ती आता 197.7 अब्ज डॉलर झाली आहे. तर बेझोस यांची संपत्ती 200.3 अब्ज डॉलर इतकी आहे.
2021 नंतर प्रथमच ब्लुमबर्ग रॅंगिंकमध्ये एमेझॉन.कॉम इंकचे संस्थापक असलेले जेफ बेझोस ( 60 ) यांनी पहिले स्थान पटकावले आहे. इलॉन मस्क ( 52 ) आणि बेझोस यांच्या संपत्तीतील अंतर एकावेळी 142 अब्ज डॉलर इतके होते. ॲमेझॉन आणि टेस्लाचे शेअर्स भावात चढउतार झाला आहे. त्यामुळे यांच्या संपत्ती चढउतार झाला आहे. या दोघांच्या कंपन्याचे शेअर मॅग्निफिशेंट सेव्हन स्टॉक्सपैकी एक आहेत, ज्यांनी इक्वीटी मार्केटला चालना दिली आहे. ॲमेझॉनचे शेअर्स 2022 च्या उत्तरार्धापासून दुप्पट वाढले आहेत आणि विक्रमी पातळीवर पोहचले आहेत. तर टेस्ला कंपनीच्या शेअरचे भाव 2021 च्या शिखरावरून सुमारे 50% खाली उतरले आहेत.
इलॉन मस्क यांच्या शांघायमधील कारखान्यातील शिपमेंट एका वर्षाहून अधिक काळ घसरल्याचा प्राथमिक डेटा आल्यानंतर सोमवारी टेस्लाचे समभाग घसरले. कोरोना साथीच्या सुरुवातीपासूनच ऍमेझॉनच्या ऑनलाइन विक्रीत वाढ झाली आहे. इलॉन मस्कच्या संपत्ती सर्वाधिक हिस्सा त्यांच्या स्पेशएक्स आणि टेस्ला कंपनीतील शेअर आहेत. ब्लुमबर्ग इंडेक्सने त्यांची संपत्ती मोजताना नेहमीच त्यांच्या या कंपनीच्या शेअरची तुलना केली आहे. तर जेफ बेझोस यांच्या संपत्तीचा बहुसंख्य भाग त्याच्या Amazon मधील 9% शेअरमधून मोजला जातो. गेल्या महिन्यात सुमारे $8.5 अब्ज किंमतीचे 50 दशलक्ष शेअर्स अनलोड केल्यानंतरही तो ऑनलाइन रिटेलर अॅमेझॉनचा सर्वात मोठा भागधारक आहे.
जगातील टॉप टेन श्रीमंत आणि त्यांची संपत्ती
- जेफ बेझोस – Amazon – 200.3 अब्ज डॉलर
2. इलॉन मस्क – टेस्ला आणि स्पेस एक्स – 198 अब्ज डॉलर
3.बर्नार्ड अरनॉल्ट – LVMH चे सीईओ – 197 अब्ज डॉलर
4. मार्क झुकरबर्ग – फेसबुक मेटा – 179 अब्ज डॉलर
5. बिल गेट्स – मायक्रोसॉफ्ट – 150 अब्ज डॉलर
6. स्टीव्ह बॉलमर – Los Angeles Clippers – 143 अब्ज डॉलर
7. वॉरेन बफेट – Berkshire Hathaway – 133 अब्ज डॉलर
8. लॅरी एलिसन – ओरॅकल कॉर्पोरेशन – 129 अब्ज डॉलर
9. लॅरी पेज – अल्फाबेट – 122 अब्ज डॉलर
10. सर्गी ब्रिन – अल्फाबेट – 116 अब्ज डॉलर