कोणी वसविले श्रीलंकेचे प्राचीन अनुराधापुरा,जेथे पीएम मोदी पोहचले,भारताशी आहे अनोखे नाते…
सुमारे सहाव्या शतकातील ही गोष्ट आहे.श्रीलंकेच्या तत्कालीन राजा विजया यांचे अनुराधा हे मंत्री होते. त्यांनी अनुराधापुरा या शहराची स्थापना केली आणि त्यांचे नाव या शहराला देण्यात आले आहे. ईसवी सन पूर्व ३७७ मध्ये, राजा पांडुकभय यांनी अनुराधापुराला आपली राजधानी म्हणून निवडले ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी ६ एप्रिल २०२५ रोजी ते ऐतिहासिक शहर अनुराधापुरा येथे पोहचले. तेथे ते महाबोधी वृक्षाच्या खाली प्रार्थना करतील. शिवाय श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या सोबत ते भारताच्या मदतीने तयार केलेल्या अनेक योजनांचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. चला तर पाहूयात श्रीलंकेच्या अनुराधापुरा या प्राचीन शहराची निर्मिती कोणी आणि कशी केली.?
यूनेस्कोच्या वारसायादीत समावेश
श्रीलंकेचे अनुराधापुरा युनेस्कोच्या जागतिक वारसायादीत समाविष्ठ आहे. हे शहर एके काळी सध्याच्या श्रीलंकेच्या राजधानी होते. आणि हा मान अनुराधापुराला एक हजार वर्षांपासून होता. म्हणजे एक हजार वर्षांपासून श्रीलंकेच्या राजधानीचा मान अनुराधापुराला आहे. श्रीलंकेच्या उत्तर मध्य प्रांतातील असलेल्या प्राचीन शहर अनुराधापुराला एक समृद्ध धार्मिक आणि राजकीय इतिहास आहे. श्रीलंका आणि भारताच्या दरम्यान सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधांसाठी हे शहर एक प्राचीन वारसा आहे.
सहाव्या शताब्दीत ईसवी सन पूर्व झाली स्थापना
सहाव्या शताब्दतील ईसवी सन पूर्वाचा हा इतिहास आहे. तत्कालीन श्रीलंकेचे राजे विजया यांचे एक मंत्री होते अनुराधा. अनुराधापुराची स्थापना त्यांनी केली होती. त्यांच्या नावे या शहराचा इतिहास आहे. ३७७ ईसवी सन पूर्वमध्ये राजा पांडुकभय याने अनुराधाला आपली राजधानीसाठी निवडले आणि राजधानी केले. ३७७ ईसवी सन पासून १०१७ पर्यंत हे अनुराधापुरा लंकेच्या शासकाची राजधानी राहीली. साल ४७३ ईसवी सन मध्ये राजा कश्यप प्रथम यांनी आपली राजधानी सिगिरिया मध्ये स्थलांतरीत केली होती. तेव्हा काही काळापर्यंत अनुराधापुरा हे सत्तेचे केंद्र नव्हते. परंतू राजा कश्यप यांच्या निधनानंतर ४९१ ईसवी सन ४९१ मध्ये अनुराधापुरा पुन्हा राजधानी झाले.




बौद्ध धर्मस्थळांसाठी प्रसिद्ध
अनुराधापुरा आता नाही तर प्राचीन काळापासून बौद्ध स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथे बौद्ध धर्माची अनेक सर्वात पवित्र स्थळे आहेत. त्याकाळात सम्राट अशोकाने त्याची मुलगी राजकुमार महेंद्र याला बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवले होते. अनुराधापुरात तेव्हा देवनमपिया तिस्साचे शासन होते. सम्राट अशोकाने २५० ईसवी सन पूर्व आधी बौद्ध धर्म स्वीकारला होता. असे म्हटले जाते की राजा तिस्सार सम्राट अशोकाचे मित्र होते. आणि त्यांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सम्राट अशोकाने त्यांची कन्या राजकुमारी संघमित्रा हीला बौद्ध भिक्षुणींच्या एका गटा सोबत श्रीलंकेला पाठवले होते.
भारताशी आहे अनुराधापुराचे नाते
असे म्हटले जाते की राजकुमारी संघमित्रा आपल्या सोबत बिहार येथील बोधगयाच्या बोधी वृक्षाचे एक रोपटे घेऊन श्रीलंकेत गेली होती. सिद्धार्थ गौतम बुद्धांना बोधगया येथील बौद्ध वृक्षाखाली ( पिंपळ ) ज्ञानाची प्राप्ती झाली होती. याच झाडाच्या रोपट्याला अनुराधापुरात लावलेले आहे. तो वृक्ष आता विशाल वृक्ष बनला आहे.हा वृक्ष अनुराधापुरात आज देखील हजारो भाविकांना आकर्षित करीत आहे.
बौद्ध स्थळांचे घर आहे हे शहर
बौद्ध धर्मा जेव्हा भारतातून श्रीलंकेत गेला तेव्हा त्याचा तेथे वेगाने प्रसार झाला होता. या धर्माने सिंहली लोकांची धर्म-संस्कृती आणि समाजाला खूप प्रभावित केले. अनुराधापुरात सर्व स्तुप, मठ आणि असे अनेक अवशेष आढळतात. जे प्राचीन काळा बौद्ध धर्माचा प्रसार होतात बनवले गेले होते. अनुराधापुराच्या प्रसिद्ध बौद्ध स्थळांमध्ये जेतवनरमैया स्तुप सुमारे १२२ मीटर उंच आहे. त्याची निर्मिती तिसऱ्या शतकात झाली होती. तेव्हा हा जगातील सर्वात उंच स्तुप मानला जात होता.
भगवान बुद्धांचा दांत ठेवला होता
अनुराधापुरामध्ये राजा दुतुगेमुनु यांनी 140 ईसवी सन पूर्व मध्ये रुवानवेलिसया दागोबा ( स्तूप ) चे निर्मिती केली होती. त्याची उंची 103 मीटर आहे. याचा परिघ २९० मीटर आहे. एका लेखात म्हटले आहे की १९ व्या शतकात हे स्तुप खंडहर होते. परंतू २० व्या शतकाच्या प्रारंभी याला याच्या प्राचीन रुपाप्रमाणे जीर्णाद्धार करुन पुन्हा बांधले. कोण्या काळी अभयगिरी दागोबा मध्ये गौतम बुद्धांचा दांत ठेवला होता. आता या पवित्र दांताला कॅण्डी शहरातील एका बौद्ध मंदिरात ठेवले आहे.
याशिवाय अनुराधापुरामधील इतर महत्त्वाच्या प्राचीन बांधकामांमध्ये इसुरमुनिया मठ, थेरवाद शाळा आणि कुट्टम पोकुना (जुळे तलाव) यांचा समावेश आहे. इसुरुमुनिया हे प्रत्यक्षात प्रेमींसारख्या दिसणाऱ्या प्रसिद्ध दगडी पुतळ्यांसाठी ओळखले जाते.
अनुराधापुरा राजधानीचे पतन
अनुराधापुरा शहरावर साल 993 मध्ये भारतीय राजा राजेंद्र चोल प्रथम याने आक्रमण केले होते. चोल राजाने अनुराधापुराचे तत्कालीन राजा महिंदा वी आणि त्यांच्या कुटुंबियांना पकडले होते. महिंदा यांना भारतात आणले गेले. येथे महिंदा यांचा १०२९ ईसवी सन पूर्व मध्ये मृत्यू झाला. ईसवी सनमध्ये १०१७ मध्ये या गौरवशाली शहराचे पतन झाले.