मुंबई : कोरोनाची साथ आणि अनेक आपत्तींमुळे 2020 वर्षात संपूर्ण जग अक्षरशः हादरले आहे. आता हे वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. लोक उत्सुकतेने नवीन वर्षाच्या प्रतीक्षेत आहेत. पण, येणारे वर्ष हे सरत्या वर्षापेक्षा अधिक भयंकर असणार आहे. ही भविष्यवाणी प्रसिद्ध ‘बाबा वेंगा’ची आहे. या बाबा वेंगांनी या आधी 9/11 हल्ला, दहशतवादी संघटना आयएसआयएस सारख्या अनेक मोठ्या भविष्यवाण्या केल्या होत्या. ज्या अचूक असल्याचे सिद्ध झाले होते. याच बाबा वेंगांनी येणारे 2021 वर्ष हे आणखी वाईट असेल, असे म्हटले आहे. जगाची भविष्यवाणी सांगणाऱ्या या बाबा वेंगांचे जीवन हे अतिशय खडतर आणि संघर्षमय होते (Who is Baba Vanga and her sadest lifestory).
बाबा वेंगाचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी बल्गेरियातील स्ट्रूमिका येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव वांगेल्या पांडेवा गुश्तोरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) असे होते. परंतु लोक त्यांना प्रेमाने बाबा वेंगा म्हणायचे आणि मग हेच नाव पुढे प्रचलित झाले. जन्मानंतर काहीच दिवसांत बाबा वेंगाच्या आईचे निधन झाले होते. दुर्दैव असे की, त्याचवेळी त्यांच्या वडिलांना संशयित गुप्तहेर मानून तुरूंगात टाकण्यात आले. यानंतर बाबा वेंगाची परिस्थिती पूर्णपणे बदलली. आजूबाजूच्या लोकांच्या दयाळूपणा आणि दानशूरपणावर त्यांचे पूर्ण आयुष्य अवलंबून झाले. पुढे याच लोकांनी त्यांचा सांभाळ केला.
या दरम्यान, बाबा वेंगाबरोबर एक चमत्कारिक घटना घडली. या घटनेबद्दल कोणालाही थेट काही माहिती नाही, परंतु बाबा वेंगा स्वत:च्या भविष्यवाणीत या घटनेचा उल्लेख करत असत. त्यांच्या म्हणण्यानुसार, जोरदार वादळामध्ये अडकल्यानंतर, त्यांना कुठेतरी फेकण्यात आले. बऱ्याच काळाने त्यांना जाग आली तेव्हा, त्यांचे डोळे वाळूने भरले होते आणि त्या वेदनांनी ओरडत होत्या. काळानुसार, त्याच्या इतर जखमा भरुन गेल्या, परंतु डोळ्यांची दृष्टी कायमस्वरूपी गेली (Who is Baba Vanga and her sadest lifestory).
यानंतर बाबा वेंगाबरोबर आणखी एक अनोखी घटना घडली. यादरम्यान तिला थोडी दैवी शक्ती मिळाली. ज्यातून तिने स्वत:च्या हातांनी किरकोळ आजारांवर उपचार करणे सुरू केले. तसेच ती अनेक भाकितही करायची, जी बऱ्याचदा खरी ठरायची. दरम्यान, एक सैनिक त्याच्या भावाच्या मारेकरी शोधण्यासाठी तिच्याकडे आला होता. बाबा वेंगानी बल्गेरियन सैनिक दिमितार गुश्तरोव्हला सत्य सांगितले. पण त्याचवेळी, सैनिकाने खुन्याचा बदला न घेता त्याला सोडून द्यावे, असे वचन तिने घेतले. काही काळानंतर हा सैनिक तिचा जीवनसाथी बनला.
इकडे बाबा वेंगा यांचे आयुष्य वेगाने बदलत होते. ती बर्याचदा आजारी पडत होती. दरवेळी डॉक्टर सांगायचे की, ती जिवंत राहू शकणार नाही. परंतु, ती चमत्कारीकरित्या आजारातून बरी व्हायची. दरम्यान, बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरू लागल्या. दुसर्या महायुद्धाचा काळ होता. लोक त्यांच्याकडे जीवन आणि मृत्यूचा अंदाज घेण्यासाठी येत असत आणि त्या सत्य सांगत असत.
1996 मध्ये, बाबा वेंगा हिचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले. तेव्हापर्यंत अनेक बड्या राजकारणी व सामान्य लोक त्यांचे भक्त झाले होते. वेंगाला स्वत:ला लिहिणे आणि वाचणे याबद्दल फारशी माहिती नव्हती. ती बोलायची आणि लोक लिहायचे. अशाप्रकारे बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या एकत्र आल्या. त्याच्यावर बरीच पुस्तके आणि चित्रपट बनवले गेले. यात त्यांच्या भविष्यवाण्या एकत्र करून लिहिले गेलेले ‘वेंगा : अ लूक अॅट रशिया’ हे पुस्तक विश्वासार्ह मानले जाते (Who is Baba Vanga and her sadest lifestory).
बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विभाजन, अमेरिकेवरील 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेंस डायनाचा मृत्यू, चेर्नोबिल दुर्घटना, अमेरिकेला मिळालेले पहिले आफ्रिकन राष्ट्राध्यक्ष, यांसह अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, ज्या खऱ्या ठरल्या होत्या. वेंगा यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन यांच्याबाबतही भविष्यवाणी केली होती. ट्रम्पना गूढ आजार होईल तर पुतीन यांच्यावर त्यांच्याच देशातील काही समाजकंटक हल्ला करतील, असंही सांगितलं होतं.
2021 बाबत बाबा वेंगा यांनी सांगितलं आहे की, जगात अनेक प्रलय आणि आपत्ती येतील. एक मोठा ड्रॅगन माणसावर ताबा मिळवेल. भविष्यवाणी आणि गूढ भाषांमधील तज्ज्ञांच्या मते बाबा वेंगाचा इशारा चीनच्या दिशेने होता. चीन अमेरिकेला नमवत जगातील सर्वात शक्तीशाली देश बनेल. भारतही अधिक बलवान होणार आहे. युरोपात रासायनिक हल्ले होतील. तसेच इंधनावरूनही भांडणं होतील. पेट्रोलियमचं उत्पादन थांबू शकतं.
(Who is Baba Vanga and her sadest lifestory)
हेही वाचा
पत्नीने खोटा साप दाखवून पतीसोबत केला Prank, दरवाजा खोलताच तलावारीने केले वार; VIDEO VIRAL
लेकीच्या लग्नात आईच झाली नवरी, आधी कन्यादान नंतर सात जन्माची गाठ!
2020 पेक्षा 2021 अधिक प्रलयकारी असेल, बाबा वेंगाची भविष्यवाणी#BabaVangaPrediction #babavanga #Yearend2020 #HappyNewYear2021 https://t.co/ZzVSJdGjIq
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2020