कमला हॅरिस यांचे भारतीय कनेक्शन काय? कशी असते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीतून आपली माघार घोषीत केली आहे. त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठींबा जाहीर केला आहे. भारत आणि अमेरिका जगातील दोन सर्वात मोठी लोकशाही राष्ट्रे परंतू त्यांच्यातील निवडणूक पद्धती किती भिन्न आहे ते पाहूयात...

कमला हॅरिस यांचे भारतीय कनेक्शन काय?  कशी असते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ?
Who is Kamla Harris
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 8:58 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या यांच्या समोर आपला निभाव लागणार नाही याचा अंदाज आल्यानंतर 81 वर्षीय जो बायडेन यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांचे आव्हान असणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांच्याबाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणूकीतील रंगत वाढली आहे. कशी असते अमेरिकेतील निवडणूक पद्धत ? तेथील राष्ट्राध्यक्ष आणि आपल्याकडील राष्ट्रपतींचे पद यात फरक काय ?  कशी होते ही निवडणूक प्रक्रीया पाहूयात….

मतांची गोळाबेरीज काय

नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत जवळपास 12 कोटी अमेरिकन नागरिक मतदानात सहभाग घेतील. अमेरिकेत प्रत्येक राज्याला अशी निर्धारित मतं निश्चित करण्यात आलेली आहेत. त्याला म्हणतात इलेक्टोरल कॉलेज. आपण म्हणू या मतदार मंडल. अमेरिकेत 50 राज्ये आहेत. या 50 राज्यांना निर्धारित करण्यात आलेल्या मतांची बेरीज ही अमेरिकेची केंद्रीय प्रतिनिधी सभा..म्हणजे ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’ आणि सिनेट यांच्या एकूण सदस्य संख्येइतकी आहेत. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेची ( हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज ) सदस्यसंख्या  435 आहे. आणि सिनेटचे 100 अशी एकूण 535 मते असतात.  अधिक 2 मते राजधानी वॉशिंग्टन डीसीची असतात तर  1 मत अमेरिकेतील सर्वात कमी लोकसंख्येचा वायोमिंगचे असते. म्हणजे झाले 537 मते आहेत.  अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराला विजयासाठी किमान 270 मतांची गरज असते. लोकांनी केलेल्या मतदानाबरोबरच उमेदवाराला विजयी होण्यासाठी मतदार मंडळातली मतेही महत्त्वाची असतात.

अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही आहे तर आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. आपल्याकडे पंतप्रधान पद मोठे असते तर राष्ट्रपती पद घटनात्मक दृष्ट्या जरी मोठे असले तरी सत्तेचे प्रमुख आपल्या येथे पंतप्रधानच असतात, त्यांनाच सर्व अधिकार दिलेले असतात.

 निवडणुकीची पद्धत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुहतांशी प्रत्यक्षपणे निवडले जातात तर भारतीय अध्यक्ष अप्रत्यक्षपणे निवडले जातात.

राष्ट्र आणि सरकारचे प्रमुख

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे राष्ट्राचे प्रमुख आणि सरकारचे प्रमुख असतात, तर भारतीय राष्ट्रपती पद हे केवळ राष्ट्राचे प्रमुख असतात. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा खरा कार्यकारी अधिकारी असतो. भारतीय राष्ट्रपती पद हे ब्रिटीशपद्धतीप्रमाणे केवळ नामधारी पद आहे.

 किती वर्षांची टर्म असते

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची टर्म 4  वर्षांसाठी असते आणि त्यांना दोनदा निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. तर भारतीय राष्ट्रपती आणि पंतप्रधान पद  5 वर्षांसाठी असते. आणि कितीही वेळा निवडून लढविता येते.

कार्यालयाचे स्वातंत्र्य

भारतीय राष्ट्रपतींनी त्यांची कर्तव्ये पार पाडताना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या ( CoM ) सल्ल्यानुसार कार्य करणे आवश्यक असते. सीओएम देशाच्या कारभाराशी संबंधित सर्व निर्णय घेते आणि राष्ट्रपतींची मंजूरी किंवा मोहोर घेऊन त्यांची अंमलबजावणी करते. अमेरिकेमध्ये, मंत्रीमंडळाचे सदस्य हे अमेरिकन काँग्रेसचे सदस्य नसतात आणि त्यास जबाबदार नसतात. तसेच मंत्रीमंडळातील सदस्यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्षांद्वारे केली जाते आणि त्यांना राष्ट्राध्यक्ष बरखास्त करु शकतात.

विधीमंडळाची जबाबदारी

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे कोणत्याही विधीमंडळाचा भाग नसतात आणि ते विधीमंडळांना जबाबदार नसतात. भारतीय संसदेत राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहांचा समावेश होतो.

संसद विसर्जित करण्याचा अधिकार

भारतीय राष्ट्रपती संसद विसर्जित करू शकतात तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना असे कोणतेही अधिकार नाहीत.

पदावरुन हटविण्याची प्रक्रीया काय ?

अमेरिकन आणि भारतीय दोन्ही राष्ट्राध्यक्षांना केवळ महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. भारतात एकतर सभागृह राष्ट्रपतींविरुद्ध महाभियोगाची कार्यवाही सुरू करू शकते आणि इतर सभागृहाच्या संमतीने राष्ट्रपतींवर महाभियोग चालवू शकते. अमेरिकेमध्ये महाभियोग चालविण्याचा अधिकार केवळ सिनेटकडे ( वरचे सभागृह ) आहे. अमेरिकेच्या घटनेतील 25 व्या सुधारणेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची ताकद आणि अधिकाराचे हस्तांतरणाची प्रक्रिया नोंदविली आहे. जेव्हा राष्ट्राध्यक्ष आपली जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ असेल तेव्हाच त्यांना हटविता येते.

कोण आहेत कमला हॅरिस ?

कमला हॅरीस या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या पहिल्या महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय आणि दक्षिण आशियाई अमेरिकन महिला आहेत. अमेरिकन लोकशाहीच्या 250 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेली नाही. त्यामुळे डेमोक्रॅटीक पक्षाने जर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोतर्ब केले तर रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवू शकतात.

कमला हॅरिस यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1964 रोजी कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. त्यांच्या आईचे नाव श्यामला गोपालन हॅरिस आहे. त्या भारतीय वंशाच्या आणि प्रसिद्ध कर्करोग शास्त्रज्ञ आहेत. गोपालन ( श्यामला गोपालन ) यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला आणि नंतर त्या अमेरिकेत गेल्या. श्यामला या ब्रेस्ट कॅन्सर तज्ज्ञ होत्या तर हॅरिसच्या वडिलांचे नाव डोनाल्ड जे. हॅरिस, जे मूळचे जमैका येथील आहेत. ते अर्थतज्ज्ञ होते. कमला हॅरिस या 5 वर्षांच्या असताना त्यांच्या आईवडीलांचा घटस्फोट झाला. दोघेही स्वतंत्र राहू लागले. घटस्फोटानंतर कमला आणि तिची धाकटी बहीण माया यांचे पालनपोषण त्यांची आई श्यामला गोपालन यांनी केले. एका मुलाखतीत कमला हॅरिसने सांगितले की, बालपणात त्या त्यांच्या आईसोबत सतत भारतात येत असत. येथील संस्कृती आणि भारतीय खाद्यपदार्थ त्यांना खूप आवडतात.

निवडणूकीची रंगत वाढली

कमला हॅरिस यांना सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाठींबा जाहीर केल्यानंतर त्यांना रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे तगडे स्पर्धक मानले जात आहे. बायडेन यांच्यावर पक्षांतर्गत दबाव आल्याने तसेच डेमोक्रॅटीक पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी हाऊस स्पिकर नॅन्सी पेलोसी यांच्यासह अनेकांना बायडेन यांना माघार घेण्यास सुचविले होते. तसेच पक्षाच्या देणगीदारांनी देखील हात आखडता घेतल्याने अखेर त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीतून आपली माघार घोषीत केली आहे. ऑगस्टमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन होणार आहे. खरे तर या अधिवेशनात जो बायडेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार होते. त्याआधीच त्यांनी निवडणूकीच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. 59 वर्षीय कमला हॅरिस या जर राष्ट्राध्यक्ष निवडून आल्या तर त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आणि पहिल्या कृष्णवर्णीय महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. त्या चार वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष झाल्या होत्या. कमला यांची आई भारतातील दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूतील आहेत.

अमेरिकेतील निवडणूक प्रचार आणि फंडींग

अमेरिकेत निवडणूकांसाठी कॉर्पोरेट जगताकडून निधी घेणे त्यांचा पाठींबा मिळविणे ही निवडणूकीचा जुनी परंपरा आहे. हा निवडणूक निधी अत्यंत पारदर्शकपणे घेतला जातो. भारतात निवडणूक लढविण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार कॉर्पोरेट जगताकडून पैसे घेतात परंतू लपून छपून घेतात. अमेरिका आणि भारत जगातील सर्वात मोठी दोन प्रमुख लोकशाही राष्ट्रे आहेत. येथे निवडणूका एक विशाल प्रक्रिया आहे. भारतात मतदार पक्षांना आणि पक्षांच्या उमेदवारांना मते देतात. तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या दोन उमेदवारांना मत दिले जाते.

भारतात निवडणूक आयोगाला महत्व

अमेरिकेतील निवडणूका आणि भारतातील निवडणूकातील मोठा फरक म्हणजे भारतात निवडणूका घेण्याची आणि त्या सुरळीत पाडण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे असते. तर अमेरिकेत निवडणूका राज्यांनी करायच्या असतात. दोन्ही निवडणूकातील भेद आणि साम्यस्थळे पाहूयात….

निवडणूक निधी

अमेरिकेतील निवडणूकांसाठी पैशाचा सर्वात मोठा रोल असतो. जर एखादा सर्वसामान्य अमेरिकन माणूस गरीब असेल तर त्याच्याकडे निधी गोळा करण्याची ताकद नसेल तर तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. कारण निवडणूकांसाठी प्रचंड निधीची गरज असते. अमेरिकन कायदा निवडणूकांसाठी उमेदवारांच्या विरोधात किंवा बाजूने काम करणाऱ्या संस्थांना फंड जमा करण्याची परवानगी देतो. ज्या संस्था उमेदवारांसाठी किंवा त्यांच्या विरोधात मोहीम चालवितात त्यांना पॉलिटीकल एक्शन ग्रुप म्हटले जाते. या संस्था निवडणूकांआधी आणि दरम्यान अधिकाधिक निधी जमा करण्याचा प्रयत्न करतात. याच प्रकारे सामान्य नागरिक आपल्या पसंतीच्या उमेदवारांना 2500 डॉलर प्राथमिक निवडणूक आणि 2500 डॉलर मुख्य निवडणूकीसाठी देऊ शकतात.

भारतात पक्षनिधी गुपचूप घेतला जातो

भारतात निवडणूक लढविण्यासाठी गुप्तपणे निधी दिला जातो. राजकारणात सर्रास काळा पैसा वापरला जातो. भारतात प्रत्येक उमेदवाराला निवडणूकीचा खर्च सादर करावा लागतो. परंतू तरीही काळ्या पैसा निवडणूकीत वारेमाप वापरला जातोच…

कॉर्पोरेट जगत आणि मीडिया

अमेरिकेत एक टक्का श्रीमंत लोक निवडणूकांवर नियंत्रण ठेवून असते. कार्पोरेट जगताकडून सढळहस्ते दान मिळत असल्याने त्याचा प्रभाव निवडणूकांवर असतो. भारतात कायदेशीर पातळीवर कॉर्पोरेट पातळीवर निवडणूकीत थेट हस्तक्षेप नसला तरी लपूनछपून पैसा येत असतो. गुप्तपणे पैसे मोजणाऱ्यांना मोठी पदे मिळत असतात. भारत आणि अमेरिकेत दोन्ही ठिकाणी मीडिया स्वतंत्र आहे. परंतू भारतात हे मीडियाचे स्वातंत्र्य नावालाच आहे. सरकारी पक्षाची पालखी वाहण्यात नव्वद टक्के मीडिया बिझी आहे.

निवडणूक प्रचार

अमेरिका आणि भारतात निवडणूक प्रचार वेगळा आहे. भारतात उमेदवार मतदारांच्या घराघरात जातात. मोठ्या रॅली आणि सभांचे आयोजन करतात. निवडणूक प्रचारात लोकप्रिय गाणी, संगित, घोषणा आणि झेंड्यांचा वापर होतो. प्रत्येक पक्षाला निवडणूक आयोग निवडणूक आयोग स्वतंत्र निवडणूक चिन्ह देत असतो. परंतू अमेरिकेत बहुतांशी उमेदवार टीव्ही आणि रेडीओत जाहीराती देतात. सर्वसामान्य लोकांना देखील भेटतात.

कोण बनू शकतो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ?

अमेरिकन घटनेच्या कलम 2 च्या सेक्शन 1 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती दिलेली आहे. यात तीन प्रमुख नियम सांगितले आहे.

1- निवडणूक लढविणाऱ्याचा जन्म अमेरिकेत झालेला हवा

2- उमेदवाराचे किमान वय 35 वर्षे असले पाहीजे

3- निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने 14 वर्षांपर्यंत अमेरिकेत रहीवास केलेला हवा.

अशी असते निवडणूक प्रक्रीया

अमेरिकेत दोनच प्रमुख पक्ष आहेत. एक रिपब्लिकन आणि दुसरी डेमोक्रॅटिक, दोन्ही पक्षांनी एक-एक उमेदवार राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभा करावा. उमेदवाराची निवड होण्याची प्रक्रीया खूप लांबलचक आहे. पक्षाचा उमेदवार निवडण्यासाठी प्रायमरी आणि दूसरी कॉकस फेरी असते. यात पक्षाचा कोणताही कार्यकर्ता राष्ट्राध्यक्ष निवडणूकाला उभा राहू शकतो. त्याला केवल त्याचा सर्मथकांचा पाठींबा हवा असतो.

प्राथमिक निवडणूका राज्यांद्वारे घेतल्या जातात. ज्या खुल्या किंवा बंद स्वरुपात देखील होऊ शकतात. जर राज्य सरकार खुल्या स्वरुपात निवडणूका घ्यायच्या कि बंद स्वरुपात याचा निर्णय घेते. जर राज्याने खुल्या निवडणूकांचा निर्णय घेतला तर पक्षांच्या सर्मथकांना तसेच सर्वसामान्य जनतेला मतदानाचा अधिकार मिळतो. जर बंद स्वरुपात निवडणूक झाली तर पक्षाचे समर्थकच पक्षांशी संबंधित उमेदवाराला मते देतात.

कॉकसस प्रक्रीयेत निवडणूका पक्षाच्यावतीने घेतल्या जातात. यात पार्टीचे सर्मथक एका जागी जमा होतात आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर दोन्ही उमेदवार भाषण करतात. राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे राहीलेल्या व्यक्तीचे संभाषण ऐकले जाते. नंतर त्याच सभेत हात उंचावून आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करतात आणि निवड होते. परंतू असे मतदान कमी राज्यात होते. अमेरिकन निवडणूकीत मतदाराला निवडणूकीच्या काही वेळ आधी एका पक्षासाठी नोंदणी करावी लागते. तेव्हाच तो या प्रायमरी किंवा कॉकसस निवडणूकीत सहभाग घेऊ शकतो.

नोव्हेंबरमध्ये होते निवडणूक

अमेरिकेत निवडणुकीसाठी दिवस आणि महिना ठरलेला असतो. निवडणूक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी येथे मतदान होते. मात्र, येथे साठ दिवस आधी मतदानाची प्रक्रिया सुरू होते. या कालावधीत अमेरिकेबाहेर राहणारी व्यक्ती देखील ऑनलाइन मतदान करू शकते. अमेरिकेची मंत्रिमंडळ बनविण्याची प्रक्रिया भारतापेक्षा संपूर्णपणे भिन्न आहे.

खासदार होण्यासाठी निवडून येणे गरजेचे नाही

संसद सदस्य होण्यासाठी येथे जनतेतून निवडून येणे गरजेचे नाही, तसेच राजकीय पक्षांचा सदस्य असणेही बंधनकारक नाही. राष्ट्राध्यक्षांना जर सोयीचे वाटत असतील तर ते विरोधी पक्षाच्या सदस्याला किंवा तज्ज्ञ व्यक्तीला देखील मंत्री म्हणून नियुक्त करू शकतात.

दोनच पक्ष

अमेरिकन लोकशाहीत दोनच पक्ष असतात. त्यामुळे त्रिशंकू संसद होत नाही. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट हे दोन प्रमुख पक्ष येथे आहेत. इतर पक्षांचे येथे अस्तित्वच नाही. अध्यक्ष बनण्याची इच्छा असलेले उमेदवार प्रथम एक समिती तयार करतात, ही समिती निधी गोळा करण्याचे काम करते आणि संबंधित नेत्याविषयीचा जनतेचा दृष्टिकोन जाणून घेण्याचे काम करते. अनेक वेळा ही प्रक्रिया निवडणुकीच्या दोन वर्षे आधी सुरू होते.

कॉकसची भूमिका

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉकसची मोठी भूमिका असते. पक्षाचे सदस्य कॉकसमध्ये जमतात. शाळा, घरे किंवा सार्वजनिक ठिकाणी उमेदवाराच्या नावाची चर्चा होते. तिथे उपस्थित लोक हात वर करून उमेदवाराची निवड करतात. तर प्राथमिक निवडणूकीत बॅलेट पेपरद्वारे मतदान होते. प्रत्येक राज्याच्या नियमांनुसार प्राथमिक निवडूक वेगवेगळी असते आणि कॉकस प्रक्रिया देखील प्रत्येक राज्याच्या कायद्यानुसार बदलत असते..

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.