भूतान आणि भारताच्या लव्ह स्टोरीत कोण ठरतोय व्हीलन ! भारतीयांशी लग्न करून पश्चाताप करतायेत भूतानवासी
भूतानवासी करमा मजबूरीने पत्नी आणि मुलासोबत भारतात रहात आहेत. करमाला आपल्या पत्नी आणि मुलाला भूतानला जाऊन तेथे राहायचे आहे, परंतु नियम आड येत आहेत.
दिल्ली : कालच ‘व्हेलेंटाईन डे’ सर्व जगात साजरा करण्यात आला. परंतू आपला भारताचा शेजारी असलेल्या भूतान या छोट्या देशाच्या गरिकांना आपला व्हेलेंटाईन डे साजरा करताना अडचणी येत आहेत. कारण भूतानच्या नागरीकाने भारतीयाशी किंवा भारतीय नागरिकाने भूतानच्या नागरिकाशी लग्न केले असेल तर त्यांना आता पश्चाताप होत आहे. याचे कारण तुम्ही ऐकाल तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून रहाणार नाही.
भूतानची रहिवासी असलेली छोकी वांगमो हिने जेव्हा विवाह केला तेव्हा तिला पुढे इतक्या अडचणी वाढून ठेवल्याची काही कल्पना नव्हती. तिचा विवाह भारताचे नागरिक असलेल्या पुष्पेंद्र सिंह यांच्याशी झाला. पुष्पेंद्र सिंह सकाळी कामासाठी सीमेपलिकडे जातात आणि रात्रीपर्यंत त्यांची वाट छोकीला सीमेवर भारतात पहावी लागते. मनात असूनही ती तिच्या माहेरी जाऊ शकत नाही. कारण पुष्पेंद्र सिंह यांना भूतानमध्ये काम करण्याचे वर्क परमिट मिळालेले आहे. आणि दर तीन महिन्यांनी ते नुतनीकरण करून घ्यावे लागते. पुष्पेंद्र सिंह हे भारतीय आहेत. सीमेपलिकडे भूतानच्या फुंतशोलिंग येथे ते काम करतात. त्यांनी परमिट काढल्याने त्यांना भूतानमध्ये जाता येते.
छोकी भूतानची असल्याने तिला मात्र भूतानमध्ये जाण्यासाठी अडचणी येत आहेत. छोकीच्या भावाचा म्हणून या लग्नाला विरोध होता. कारण भारतीयाशी विवाह केल्यावर तिचे पती व मुलांना भूतानचे नागरिकत्व मिळणार नाही. छोकीचे मामा हिमाचलमध्ये मनालीत एका बौद्ध मंदिराचे लामा आहेत. 2019मध्ये तिची भेट रिकोंगपीओ मध्ये पुष्पेंद्रशी झाली. पुष्पेंद्र हिंदु तर छोकी बौद्ध आहे, त्यांच्या लव्हस्टोरीत धर्म आड आला नाही, परंतू भूतान आणि भारताची सीमा आड आली आहे. छोकी हीला वाटते की तिच्या पतीने भूतानमधील तिच्या घरात रहावे. परंतू पुष्पेंद्र जर तिला घेऊन तेथे गेले तर त्यांना दररोज सस्टनेबल डिव्हलपमेंट चार्ज ( एसडीएफ ) म्हणून दररोज 1200 रूपये भरावे लागेल. भूतान सरकार भारतीयांकडून एसडीएफ म्हणून 1200 रूपये प्रतिदिन फि घेते.
भूतान आधी भारतीयांकडून हा कर घेत नव्हता परंतू गेल्यावर्षी कोरोनानंतर पर्यटकांना भूतान खुले झाल्यानंतर हा कर सुरू झाला. तिला जर भूतानकडून मॅरेज सर्टीफिकेट मिळाले असते. तर तिच्या पतीकडून कर घेतला नसता. परंतू मॅरेज सर्टीफिकेट वर्षांनूवर्षे मिळत नाही. पंधरा- पंधरा वर्षे लोक पहात आहेत, अशाच भूतानच्या एका करमा यांचे लग्न भारतातील बक्सा येथील छृंग छोकी हीच्याशी 2019 ला झाले. आणि लॉकडाऊन घोषीत झाल्याने ते भारतात राहीले तेथे त्यांना मुल झाले. परंतू आता अडचण निर्माण झाली आहे. आता तिला आणि तिच्या मुलाला भूतानची नागरिकता मिळण्यात अडचण येत आहे.
आता करमा मजबूरीने पत्नी आणि मुलासोबत भारतात रहात आहेत. करमाला आपल्या पत्नी आणि मुलाला भूतानला जाऊन तेथे राहायचे आहे, परंतु नियम आड येत आहेत. जर करमा आपल्या पत्नीसह भूतानला गेला तर त्याला दररोज एसडीएफ म्हणून 1200 रुपये द्यावे लागतील.एकदा त्याची पत्नी चार दिवसांसाठी भूतानला गेली होती, तेव्हा तिला एसडीएफ म्हणून 4800 रुपये द्यावे लागले. करमा छृंग छोकीला भूतानमधून विवाह प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे.