पंतप्रधान मोदी यांचे ‘ते’ स्वप्न ट्रम्प पूर्ण करणार का? कोणते आहेत मार्गातील दोन मोठे अडथळे?
पक्षाच्या अधिवेशनामध्ये ट्रम्प यांनी निवडणुकीत सुमारे 400 किंवा त्याहून अधिक मोठ्या मतांनी विजय होईल असे म्हटले आहे. मात्र, यामुळे भारतात झालेल्या लोकसभा निवडणूक दरम्यानही नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “अब की बार, 400 पार” या घोषणेची आठवण होत आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक रॅलीदरम्यान हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्या कानाला लागलेल्या गोळीची जखम आता वेगाने बरी होत आहे. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. गेल्या आठवड्यात पक्षाच्या अधिवेशनामध्ये ट्रम्प यांनी निवडणुकीत सुमारे 400 किंवा त्याहून अधिक मोठ्या मतांनी विजय होईल असे म्हटले आहे. मात्र, यामुळे भारतात झालेल्या लोकसभा निवडणूक दरम्यानही नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “अब की बार, 400 पार” या घोषणेची आठवण होत आहे.
कशी होते निवडणूक?
व्हाईट हाऊससाठी 50 राज्यांमध्ये पसरलेल्या 538 पैकी मतांपैकी विजयासाठी 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता आहे. डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 20 राज्ये घेतात. तर, 10 टॉस अप राज्ये सोडली जातात. या राज्यांची मते कोणालाही जाऊ शकतात. प्रत्येक राज्यात लोकप्रिय मते जिंकणारा पक्ष निवडणुकीत सर्व मते घेतो.
आव्हान कुठे आहे?
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कॅलिफोर्नियाकडे 54 इलेक्टोरल मते आहेत. त्यात 52 प्रतिनिधी आणि दोन सिनेटर्स आहेत. सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या वायोमिंगकडे फक्त तीन इलेक्टोरल मते आहेत. त्यात एक प्रतिनिधी आणि दोन सिनेटर्स आहेत. कॅलिफोर्नियाने रीगनच्या काळात रिपब्लिकन पक्षाला शेवटचे मतदान केले होते. परंतु, 1992 मध्ये बिल क्लिंटन यांना मतदान केल्यानंतर ते डेमोक्रॅटिकचा बालेकिल्ला बनले आहे. त्यात यावेळीही बदल होण्याची शक्यता नाही.
सध्याच्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन 251 इलेक्टोरल मते जिंकण्याच्या मार्गावर आहेत. 270 ही बहुमताची संख्या गाठण्यासाठी त्यांना सुमारे अर्धा डझन राज्यांमधून फक्त 19 इलेक्टोरल मतांची आवश्यकता आहे. त्यातील दहा राज्ये स्विंग आहेत. यामध्ये पेनसिल्व्हेनिया (19), मिशिगन (15), नेवाडा (6) सारख्या राज्यांचा समावेश आहे. ऍरिझोना (11) आणि विस्कॉन्सिन (10) येथील मते ट्रम्प यांना मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.