अनमोल बिश्नोई याला भारतात आणणार? प्रत्यार्पणासाठी सुरक्षा यंत्रणांची धावपळ, पण आली ही मोठी अडचण
Anmol Bishnoi US Extradition Process : लॉरेन्स बिश्नोई याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याला गुरूवारी कॅलिफोर्नियामधे अटक करण्यात आली. अर्थात भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठीची कारवाई सुरू केली आहे. पण त्याला भारतात परत आणण्यात ही मोठी अडचण आली आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्वोई याला गुरुवारी कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. त्यांनी अमेरिकेमधील सुरक्षा एजन्सीसोबत संपर्क साधला आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक कागदपत्रांची जमवा जमव करण्यात येत आहे. पण अनमोल बिश्नोई याला भारतात परत आणणे तितके सोपे नसल्याचे समोर येत आहे. त्यात ही एक मोठी अडचण समोर आली आहे.
राज्यातील अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले. त्यानंतर मुंबई पोलिसांना या प्रकरणात अनमोलचा पण हात असल्याचे समजले. त्यांनी त्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी या दोन्ही भावांना बॉलिवुड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणात वाँटेड घोषित केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात लॉरेन्स आणि अनमोल आरोपी आहेत.
काय आहे अडचण?
अनमोल विरोधात इंटरपोल माध्यमातून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. अनमोल बिश्नोई कॅलिफोर्नियात असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांनी शेअर केली होती. त्यानंतर त्याला तिथे अटक करण्यात आली. त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू करण्यात आली. त्याला कधी भारतात आणल्या जाणार यासंबंधीची विचारणा झाली. पण त्याला सध्याच भारतात आणणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. अनमोल याला भारताने मोस्ट वाँटेड जाहीर केले असले तरी अमेरिकेत त्याच्यावर कोणताही गुन्हा नाही अथवा त्यांच्याविरोधात कोणतीही केस सुरू नसल्याने त्याला भारतात आणणे सोपे नसल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणात अनमोलचे नाव
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणात त्याचे नाव प्रकर्षाने पुढे आले. त्यांच्यावर बिश्नोई गँगच्या आरोपींनी गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बिश्नोई गँगेने समाज माध्यमावर या हत्येची जबाबदारी घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गँगमधील अनेक आरोपींना अटक केली. अनमोल याला लॉरेन्स गँगमध्ये छोटे गुरुजी या नावाने ओळखले जाते. अनमोल वयाच्या 25 व्या वर्षापासून अमेरिका, अझरबैजान, कॅनडा, केनिया, युएई, पोर्तुगाल, मेक्सिको यासह भारतातील 1000 हून अधिक शूटर्सचे काम पाहत आहे.