आज तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार? काय आहे रशिया-यूक्रेनचा संघर्ष? जाणून घ्या फोटोस्टोरीतून

यूक्रेन हा स्वातंत्र्यवादी देश आहे. पश्चिम यूरोपचा त्याच्यावर पगडा आहे. रशियात जशी एकाधिकारशाही आहे तशी इथं दिसत नाही. त्यामुळे यूक्रेन हा पश्चिम यूरोपियन देश तसच नाटो देशांकडे झुकलेला आहे आणि नेमकं तेच रशियाला नको आहे.

आज तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार? काय आहे रशिया-यूक्रेनचा संघर्ष? जाणून घ्या फोटोस्टोरीतून
यूक्रेन-रशियाच्या संघर्षात जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 10:07 AM

Russia-Ukraine Conflict: तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात नेमकी कुठून होणार? ह्या प्रश्नाचं उत्तर वर्षभरापुर्वी तैवान असं दिलं गेलं असतं. पण सध्या ह्याच प्रश्नाचं उत्तर यूक्रेन असं द्यावं लागेल. त्याला कारण आहे ते गेल्या काही काळापासून तिथं घडत असलेल्या वेगवान घडामोडी. रशियानं (Russia) जवळपास सव्वालाख सैनिक यूक्रेनच्या (Ukraine) सीमेवर आणलेलं असून आज तिथं हल्ला होऊ शकतो अशी शक्यता अमेरीकेनं व्यक्त केलीय. ह्याच पार्श्वभूमीवर अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काल रशियाचे अध्यक्ष पुतीन (Putin) यांच्याशी चर्चा केली. पण ह्या चर्चेचा फार फायदा नसल्याचं जाणकारांचं म्हणनं आहे. कारण पुतीन कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतंय.

यूक्रेनच्या बॉर्डवर रशियानं केलेली लष्कराची जमवाजमव (Photo: PTI)

यूक्रेन-रशियाचा संघर्ष यूक्रेन हा एकेकाळी सोव्हिएत यूनियनचा भाग होता. पण 1991 मध्ये त्याची शकलं पडली आणि यूक्रेन हा एक स्वतंत्र देश झाला. रशियाला अजूनही यूक्रेन हा लहान भाऊ वाटतो. पण यूक्रेनला मात्र मोठ्या भावाची कायम भीती वाटत आलीय. त्याला काही कारणेही आहेत. यूक्रेनचं सामरीक स्थान हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यूक्रेनच्या तीन बाजू रशियानं घेरलेल्या आहेत तर चौथी बाजू वेस्टर्न यूरोपनं. त्यातल्या त्यात बेलारुस महत्वाचा आहे. एका अर्थानं सांगायचं तर रशिया आणि पश्चिम यूरोपच्या संघर्षात यूक्रेनचं सँडवीच झालंय. रशिया म्हटल्यानंतर अमेरीका, इंग्लंड आणि खासकरुन नाटो देशांचा दबावाचं राजकारण आलंच. यूक्रेन हा त्याचाच बळी ठरतोय.

यूक्रेन तणावस्थितीत टेहाळणी करताना जवान (Photo: PTI)

संघर्षाचं कारण काय? यूक्रेन हा स्वातंत्र्यवादी देश आहे. पश्चिम यूरोपचा त्याच्यावर पगडा आहे. रशियात जशी एकाधिकारशाही आहे तशी इथं दिसत नाही. त्यामुळे यूक्रेन हा पश्चिम यूरोपियन देश तसच नाटो देशांकडे झुकलेला आहे आणि नेमकं तेच रशियाला नको आहे. 2013 साली तत्कालीन यूक्रेनचा राष्ट्राध्यक्ष हा पश्चिम यूरोप आणि नाटो देशांसोबत आर्थिक तसच सामरिक करार करणार होते. पण पुतीननं एवढा दबाव आणला की तोच करार तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी मॉस्कोसोबत केला. यूक्रेनमध्ये संघर्ष उफाळला. राष्ट्राध्यांना घरी जावं लागलं. नवे राष्ट्राध्यक्षांनी सूत्रं स्वीकारली. त्यांनी यूरोपियन तसच नाटो देशांसोबत करार केला.

रशियाच्याविरोधात यूक्रेनची जनता भीतीग्रस्त आहे पण असे बॅनरही लागलेत (Photo: PTI)

क्रामियात काय घडलं? क्रामिया हा यूक्रेनचाच भाग होता. हा सर्व भाग खरं रशियन बोलणाऱ्यांचाच आहे पण काही वांशिक भिन्नताही आढळते. क्रामिया मात्र पूर्णपणे रशियाकडे झुकलेला आहे. 2014 साली तिथं सार्वमत घेतलं गेलं तर ते रशियाच्या बाजूनं गेलं. पुतीननं तिथं रनगाडे घातले आणि क्रामिया ताब्यात घेतला. तेव्हा अमेरीकेचे अध्यक्ष होते बराक ओबामा. पण ते एका प्रेस कॉन्फरन्सच्या पलिकडे काही करु शकले नाहीत. पण पुतीन एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी यूक्रेनच्या सीमेवर हळूहळू सैन्य वाढवत ठेवलं. क्रामियानंतर रशियासोबतच्या सीमावर्ती भागात काही फुटीरतावाद्यांनी संघर्ष सुरु ठेवला. त्यात लुहान्स्क आणि डोनास्क अशा दोन्ही भागातल्या फुटीरतावाद्यांनी यूक्रेनपासून वेगळं होतं स्वतंत्र रिपब्लिक जाहीर केलं. पुतीनच्या पाठिंब्यावरच हे घडत असल्याचा आरोप झाला. पण पुतीननं ते नाकारलं. वास्तव असंय की हे दोन्ही भाग रशियाच्याच कुशीत आहेत.

यूक्रेन-रशिया बॉर्डरवर रणगाडे, मिसाईल्स तैनात केले गेलेत (Photo: PTI)

पुतीनला कशाची भीती आहे? पुतीनला सर्वात मोठी भीती आहे ती लोकशाहीचीच. कारण यूक्रेनकडे प्रयोगशाळा म्हणून पाहिलं जातंय. सोव्हिएत यूनियनमधून यूक्रेन हा फुटून बाहेर पडला आणि त्यानं लोकशाही प्रणाली स्वीकारली. यूक्रेन हा एक मुक्त देश झाला. बरं यूक्रेन आणि रशियात तसा काही फरक नाही. जर यूक्रेनमध्ये लोकशाही नांदू शकते तर मग रशियात का नाही? असा सवाल विचारला जाऊ शकतो आणि तोच विचार पुतीनची रशियातली एकाधिकारशाही संपवू शकतो याची भीती मास्कोला असल्याचं जाणकारांना वाटतं.

नाटो देशांकडून यूक्रेनच्या मदतीसाठी आतापासून मदत पाठवली जातेय (Photo: PTI)

पुतीनला आता काय हवं आहे? यूक्रेननं नाटो तसच युरोपियन देशांसोबतचे आर्थिक आणि त्यातल्या त्यात मिलिट्री संबंध पूर्णपणे तोडून टाकावेत असा दबाव पुतीनचा आहे. यूक्रेन हा नाटो देशांचा भाग झाला तर ते रशियासाठी अत्यंत धोकादायक होऊ शकतो ते तातडीनं थांबवण्यासाठी पुतीननं यूक्रेनच्या सीमेवर लष्कर उभं केलंय. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर नाटोची निर्मिती झाली तिच मुळात रशियाला रोखण्यासाठी. यात अमेरीका, इंग्लंड, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आईसलंड, इटली अशा सगळ्या दादा देशांचा समावेश आहे. याच लिस्टमध्ये यूक्रेनचा समावेश होणे म्हणजे अमेरीका, इंग्लंडचं लष्कर रशियाच्या अंगणात उभं केल्यासारखं आहे आणि तेच पुतिनला नकोय. यूक्रेनसोबतचे सर्व संबंध तोडा अशी जी पुतीनची सध्याची मागणी आहे ती मान्य होणे अवघड. त्यामुळेच युद्ध अटळ मानलं जातंय.

संघर्ष शिगेला पोहोचलाय, त्यामुळे जवानांची गस्त वाढत चाललीय (Photo: PTI)

खरंच युद्ध होऊ शकतं? पुतीन फक्त घाबरवण्याचं काम करतायत की खरंच युद्ध होऊ शकतं? ह्या प्रश्नाचं उत्तर पुतीननं क्रामियात जे काही केलं त्यावरुन देता येऊ शकतं. पुतीन हे रेडलाईनपर्यंत जाऊ शकतात असं रशियाच्या माजी उपपरराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलंय आणि इथं ती रेडलाईन यूक्रेन असल्याचंही ते सांगायला विसरले नाहीत. सध्य स्थितीत यूक्रेनच्या बॉर्डरवर रशियानं 1 लाख 30 हजार सैन्य उभं केलंय. त्यात 1 लाख 12 हजार जवान आहेत तर 18 हजार है वैमानिक, नौसैनिक आहेत. टँक, मिसाईल्स असं सगळं तैनात केलं गेलंय आणि 16 फेब्रुवारीला म्हणजेच पुढच्या चोवीस तासात यूक्रेनवर हल्ला केला जाऊ शकतो अशी शंका अमेरीकेनं व्यक्त केलीय.

हे सुद्धा वाचा: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर, एके-203 रायफल्स, डिफेन्स सिस्टीमचा सौदा अजेंड्यावर

रशियात तब्बल 100 वर्षांने राजघराण्यात शाही विवाह, 103 वर्षांपूर्वीचा तो काळा दिवस, ज्यात अख्खं राजघराणं संपवलं!

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.