बॉयफ्रेंडची हत्या केल्याने तरुणीला जन्मठेपेची शिक्षा, मात्र ‘या’ कारणामुळे शेकडो महिला समर्थनासाठी रस्त्यावर
ब्रिटेनमधील (Britain) लेस्टरमध्ये (Leicester) एका तरुणीला आपल्या बॉयफ्रेंडची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झाली.
Woman Jailed For Life Who Murdered Boyfriend: ब्रिटेनमधील (Britain) लेस्टरमध्ये (Leicester) एका तरुणीला आपल्या बॉयफ्रेंडची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र, या तरुणीच्या समर्थनासाठी ब्रिटनमधील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे बर्मिंघम क्राउन कोर्टाला (Birmingham Crown Court) या प्रकरणाची दुसऱ्यांदा सुनावणी करावी लागली आणि सर्व पुरावे तपासावे लागले (Woman jailed for life for killing boyfriend Many women support her in Britain).
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 28 वर्षीय तरुणीचं नाव एमा जेयनी मॅगसन (Emma-Jayne Magson) असं आहे. तिने आपला 26 वर्षीय बॉयफ्रेंड जेम्स नाइट (James Knight) याची चाकूने वार करत हत्या केली होती. ही घटना मार्च 2016 मध्ये घडली. विशेष म्हणजे या प्रकरणाची दुसऱ्यांदा सुनावणी झाली आणि त्यातही एमाला दोषी घोषित करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
नेमकं काय घडलं?
सुरुवातीला आरोपी एमाने हत्या केल्याचा आरोप फेटाळत आपण स्वसंरक्षणात चाकूने हल्ला केल्याचा दावा केला. आपला बॉयफ्रेंड दारु आणि ड्रग्सच्या नशेत होता, असंही तिने सांगितलं होतं. यानंतरही न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर ब्रिटनमध्ये अनेक महिला या आरोपीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या. संबंधित तरुणी ही कौटुंबिक हिंसाचारी बळी असल्याचं म्हणत या आंदोलक महिलांनी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी केली. यानंतर न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेतली.
या प्रकरणातील पहिली सुनावणी 2017 मध्ये संपली. त्यानंतर दुसऱ्यांदा सुनावणी घेण्यात आली. मात्र, त्यातही न्यायालयाने आरोपी तरुणीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे आता या तरुणीला 17 वर्षे तुरुंगात घालावे लागणार आहे (Emma Jayne Magson is Jailed For Life).
आरोपीच्या वकिलांकडून तरुणी मानसिक रुग्ण असल्याचाही दावा
आरोपीच्या वकिलांकडून तरुणी मानसिक रुग्ण असल्याचाही दावा करण्यात आला. मागील वर्षी जानेवारीमध्ये या मुद्द्यावर कोर्टाने मानसिक रुग्ण असल्याचे सर्व पुरावे तपासून पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश दिले. वकिलांनी दावा केला होता, “एमाला इमोशनली अन्स्टेबल पर्सनालिटी डिसऑर्डर (Emotionally Unstable Personality Disorder) हा आजार आहे. त्यामुळे तिने केलेल्या हत्येत ती सर्वस्वी जबाबदार नाही.”
यानंतर या प्रकरणाची दुसऱ्यांदा सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने 10-2 असा निर्णय देत पुन्हा आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालयाने आरोपीने 999 हेल्पलाईन नंबरवर फोन करण्याआधी 45 मिनिटे वाट पाहून बॉयफ्रेंडची हत्या केल्याचं निरिक्षण नोंदवलं.
हेही वाचा :
एका दिवसात 100 पेक्षा जास्त लोकांची हत्या, म्यानमारमधील सैन्याकडून दडपशाही, जगही हैराण
वकील पत्नीकडून शिक्षक पतीची हत्या, सीसीटीव्हीत वकील प्रियकर दिसल्याने पर्दाफाश
व्हिडीओ पाहा :
Woman jailed for life for killing boyfriend Many women support her in Britain