बॉसने मेल केला, ती वेगळंच समजली, त्यानंतर तिने जे केलं त्यामुळे बॉसही हादरला

Ajab Gajab News : एका महिलेने तिच्या बॉसच्या ई-मेलमधील काही शब्दांचा चुकीचा अर्थ लावला आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

बॉसने मेल केला, ती वेगळंच समजली, त्यानंतर तिने जे केलं त्यामुळे बॉसही हादरला
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 4:29 PM

लंडन : ब्रिटनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका कंपनीच्या बॉसने त्यांच्या प्रोजेक्ट मॅनेजरला अधिकृत ई-मेल (email) पाठवला. मात्र त्यात असे काही शब्द वापरले होते, जे वाचून महिला कर्मचारी संतापली. त्यानंतर त्या बॉसवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, न्यायालयाचा (court decesion) निर्णय अखेर बॉसच्या बाजूने आला. खरंतर चूक महिलेची होती. तिने त्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला होता.

करीना (Karina) लंडन स्थित एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. ही कंपनी आपल्या ग्राहकांना ‘पेपरलेस ट्रेड सोल्यूशन्स’ प्रदान करते. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, कॅरिनाने दावा केला की तिचा बॉस अलेक्झांडरने ई-मेलमध्ये xx आणि yy हे लैंगिक शब्द वापरले आहेत, जे Kiss आणि शारीरिक क्रिया यांसाठी कोड वर्ड्स होते

आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी, तिने असेही सांगितले की तिच्या बॉसने एकदा फाईलचे नाव बदलून ‘AJG’ केले. महिलेने त्याच्या फुल फॉर्मचेही वर्णन केले. या गोष्टी लक्षात घेऊन महिलेने लैंगिक छळ, भेदभाव आणि अन्यायकारक बडतर्फीचा दावा करत तिच्या बॉसला न्यायालयात खेचले.

महिलेने दावा केला की तिचा ‘लैंगिक छळ’ 2019 मध्ये सुरू झाला. ती त्याचे म्हणणे धुडकावून लावत असल्याने बॉस तिला सर्वांसमोर अपमानित करायचे. छळाच्या एका घटनेचा हवाला देत कॅरीनाने कोर्टात सांगितले की, एकदा तिच्या बॉसने केस नीट करताना तिच्याकडे पाहिले. महिलेचे म्हणणे आहे की, एप्रिल 2021 मध्ये तिने बॉसविरुद्ध तक्रार केली. कोणतीही कारवाई न झाल्याने तिने राजीनामा दिला.

यानंतर लंडनमधील रोजगार न्यायाधिकरणात या प्रकरणाची सुनावणी झाली. जिथे न्यायमूर्तींनी पुराव्यांचा आढावा घेतल्यानंतर घटना चुकीच्या पद्धतीने सादर झाल्याने गैरसमज झाल्याचे सांगत महिलेचा युक्तिवाद फेटाळला. याशिवाय कोर्टाने कॅरिनाला आर्थिक दंडही सुनावला आहे. ज्या अंतर्गत तिला आता कंपनीला 5 हजार पौंड (5 लाखांपेक्षा जास्त) नुकसान भरपाई द्यावी लागेल.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.