Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात काय घडतंय? : अमेरिकेत भारतीय डॉक्टर्स, नर्सेसना कायमस्वरुपी नागरिकत्व मिळण्याची चिन्हं

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

जगात काय घडतंय? : अमेरिकेत भारतीय डॉक्टर्स, नर्सेसना कायमस्वरुपी नागरिकत्व मिळण्याची चिन्हं
Follow us
| Updated on: May 10, 2020 | 12:22 AM

मुंबई :  जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे (World Corona Virus Update). कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. भारतातही गेल्या 23 मार्चपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या (World Corona Virus Update) घडामोडींचा एक आढावा

1. गेल्या काही दिवसात भारतात गुगलवर कोरोना हेल्पलाईनपेक्षाही ऑनलाईन दारुबाबत जास्त सर्च केलं गेलं. 4 मेपासून काही राज्यांमध्ये ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी दिली गेली. त्यानंतर इंटरनेटवर ऑनलाईन दारु हा शब्द शोधणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. लोकसत्ताच्या एका बातमीनुसार 7 मे ला हे प्रमाण सर्वाधिक वाढलं होतं.

2. अमेरिकेतल्या भारतीय डॉक्टर्स किंवा नर्सेसना कायमस्वरुपी अमेरिकेचं नागरिकत्व मिळण्याची चिन्हं आहेत. त्यासंदर्भातल्या प्रस्तावावर अमेरिकेत विचार सुरु आहे. सध्या चीननंतर सर्वाधिक भारतीय अमेरिकेत आहेत. त्यातले बहुतांश भारतीय हे दरवर्षी H-1B व्हिसावर अमेरिकेत राहतात.

3. कॅलिफोर्नियातल्या एका तुरुंगात 800 हून अधिक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि जेलच्या 25 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालीय. दरम्यान, व्हाईट हाऊसचे अजून दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. उपराष्ट्रपती माईक पेन्स यांचे सेक्रेटरी आणि इवांका ट्रम्पच्या पीएलाही कोरोना झाला आहे.

4. अफगानिस्तानचे आरोग्य मंत्री फिरोजुद्दीन फिरोज यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना होणारे ते जगातले तिसरे आरोग्यमंत्री आहेत. याआधी इस्राईलच्याही आरोग्यमंत्र्यांना कोरोना झालाय. सध्या अफगानिस्तानात 4 हजार 33 कोरोनाबाधित आहेत.

5. अमेरिकेनं चीनी पत्रकारांच्या व्हिजाच्या कालावधीत घट केली. आता चीनचे पत्रकार फक्त तीनच महिने अमेरिकेत थांबू शकतात. याआधी इतर देशांमधल्या पत्रकारांनी अमेरिकेत किती काळ थांबावं. याची ठराविक मर्यादा नव्हती. आता मात्र चीनच्या पत्रकारांसाठी अमेरिकेनं नवा निर्णय लागू केला आहे.

6. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर दक्षिण कोरियात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. 24 तासात पुन्हा 18 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. दक्षिण कोरियाने अतिशय वेगाने कोरोनावर नियंत्रण मिळवलं. मात्र त्यानंतर लॉकडाऊनमध्ये सूट देण्यास घाई केल्यानं पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान, राजधानी सियोलमध्ये क्लब आणि बार आता पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

7. ऑक्टोबर महिन्यात चीनमधल्या वुहानची लॅब अनेक दिवस बंद राहिल्याचं समोर आलं. एनबीसीच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी काही माहिती जमा केली. ज्यात 7 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यानचा वुहान लॅबचा टेलिफोन डाटा जमवला गेला. मात्र, या काळात लॅबमध्ये एकही फोनकॉल आला नसल्याचं समोर आलं. कुठल्या तरी मोठ्या कारणामुळे लॅब बंद करण्यात आली असण्याची शंका अमेरिकेच्या गुप्तचर (World Corona Virus Update) विभागाला आहे.

8. सात हजार रुग्ण सापडल्यानंतर कुवैतनं अखेरीस देशात कर्फ्यू घोषित केला आहे. 3 आठवड्यांसाठी घोषित झालेला कर्फ्यू 31 मे रोजी संपेल. कुवैतमध्ये इराणमार्गे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आले असल्याची माहिती आहे.

9. रशियात सलग सातव्या दिवशी 10 हजारांहून जास्त रुग्ण कोरोना सापडले आहेत. त्यात रशियाची राजधानी मॉस्को कोरोनाचं केंद्र बनलं. रशियात आतापर्यंत 1 लाख 98 हजार रुग्ण आहेत. सध्या युरोपात ब्रिटन आणि रशिया या दोनच देशात वेगानं कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

10. कोणतीही लक्षण नसताना कोरोना असलेले अजून 15 रुग्ण चीनमध्ये सापडले आहेत. जिलीन प्रांतातले हे रुग्ण आहेत. महत्वाचं म्हणजे ज्या हुबेई प्रांतात वुहान शहर येतं, त्या हुबेईमध्ये लक्षणं नसलेले तब्बल 629 रुग्ण आहेत.

11. ब्रिटनमध्ये बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे. काही देशात अजूनही ब्रिटनचे लोक अडकून आहेत. त्यामुळे त्यांना जेव्हा देशात परत आणलं जाईल, तेव्हा विमानतळावरुन थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये 14 दिवसांसाठी भर्ती केलं जाईल. सध्या ब्रिटनमध्ये 2 लाख 11 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत.

12. पाच आठवड्यांनतर पाकिस्ताननं लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडे आता पैसाच शिल्लक नसल्यामुळे दुसरा पर्याय नसल्याचा दावा पंतप्रधान इम्रान खान यांचा आहे. मात्र, विरोधी पक्ष आणि डॉक्टरांच्या संघटनेनं इम्रान खान यांच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. सध्या पाकिस्तानात 27 हजारांहून जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.

13. अर्जेंटिनामध्ये 24 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 20 मार्चला अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, अजूनही कोरोना नियंत्रणात आलेला नसल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आलं. अर्जेंटिनात 5 हजारांहून जास्त लोकांना कोरोना झाला आहे.

14. कोरोनामुळे प्राण्यांच्या बाजारपेठा बंद करण्याचं मार्म काहीही कारण नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. बाजारपेठा बंद करण्याऐवजी त्या जास्तीत-जास्त सुरक्षित करुन सुरु कराव्यात असा सल्लाही जागतिक आरोग्य संघटनेनं (World Corona Virus Update) दिला आहे.

संबंधित बातम्या :

‘कोरोना’ला आळा घातल्याबद्दल अभिनंदन! किम जोंगचा जिनपिंग यांना व्यक्तीगत संदेश

कोरोना विषाणूवर लस तयार, इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

हे पहिल्यांदा घडतंय : जपानमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांऐवजी चक्क रोबो सहभागी

जगात काय घडतंय? : टांझानियात बकरी आणि पॉपॉ फळ कोरोना पॉझिटिव्ह

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.