कोरोनामुळे जगभरात एकाच दिवसात 12 हजार मृत्यू, 6 लाख नव्या बाधितांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 6 कोटींच्या पुढे

जगभरात गेल्या 24 तासात 12 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे जगभरात एकाच दिवसात 12 हजार मृत्यू, 6 लाख नव्या बाधितांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 6 कोटींच्या पुढे
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 7:57 AM

मुंबई : जगभरातील 218 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6 कोटींच्याही पुढे गेली आहे. तसेच गेल्या 24 तासात जगभरात 12 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 24 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 11 हजार 733 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. यापैकी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत नोंदवण्यात आले आहेत. (World CoronaVirus updates new cases and death tolls on 26 november 2020)

जगभरात 14 लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू

वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 6 कोटी 7 लाख 15 हजार 719 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 4 कोटी 20 लाख 28 हजार 241 रुग्ण बरे झाले आहेत, तर 14 लाख 26 हजार 734 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 1 कोटी 72 लाख 60 हजार 744 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 31 लाख 37 हजार 962 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 78 लाख 5 हजार 280 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 68 हजार 219 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 92 लाख 66 हजार 697 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 86 लाख 77 हजार 986 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 35 हजार 261 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश

अमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 13,137,962, मृत्यू – 268,219 भारत : एकूण कोरोनाबाधित – 9,266,697, मृत्यू – 135,261 ब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 6,166,898, मृत्यू- 170,799 फ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,170,097, मृत्यू – 50,618 रशिया : एकूण कोरोनाबाधित – 2,162,503, मृत्यू – 37,538 स्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,622,632, मृत्यू – 44,037 यूके : एकूण कोरोनाबाधित – 1,557,007, मृत्यू – 56,533 इटली : एकूण कोरोनाबाधित – 1,480,874, मृत्यू – 52,028 अर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,390,388, मृत्यू – 37,714 कोलंबिया : एकूण कोरोनाबाधित – 1,270,991, मृत्यू – 35,860

महाराष्ट्रात कोरोनाची पुन्हा उसळी

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आली असतानाच आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यातील कोरोना नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजाराखाली गेला होता. मात्र, आता यामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला, तर 65 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ही राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

तत्पूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण पावले उचलली होती. त्यानुसार दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्या पुन्हा वाढवण्यात आली आहे. तसेच कालपासून दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या चार राज्यांतून रेल्वे, विमान आणि रस्ते मार्गाने येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीलाही सुरुवात झाली आहे.

सध्या राज्यात 5 लाख 29 हजार 344 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 6 हजार 980 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. तर अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 84 हजार 464 इतकी आहे. काल नोंदवण्यात आलेल्या 65 मृत्यूंपैकी 56 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर नऊ मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल: राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल. राज्यात ती येऊ नये असं वाटतं पण मनात भीती असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केले होते.

संबंधित बातम्या

कोरोनाची लस जानेवारी किंवा फ्रेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता, सरकार SMS पाठवून वेळ, ठिकाण कळवणार

अहमद पटेल ते चेतन चौहान; कोरोनामुळे आतापर्यंत ‘या’ बड्या नेत्यांचा मृत्यू

अमित शाहांचा कोरोना नियंत्रणासाठी तीन कलमी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांना कार्यवाहीच्या सूचना

(World CoronaVirus updates new cases and death tolls on 26 november 2020)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.