World Happiness Report | या 9 देशातील लोक सर्वात दु:खी, भारताचा क्रमांक कोणता ?
वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट तयार करण्यासाठी सहा गोष्टींचा विचार केला जातो. सामाजिक सुरक्षा, आरोग्य, उत्पन्न, स्वातंत्र्य आणि लोकांमधील औदार्य या सर्व बाबींचा विचार केला जातो. मानवा आनंदी राहण्यासाठी चांगल्या मानसिक आणि राहणीमानाची गरज असते. जो देश या गुणांवर अपयशी ठरला त्याला यात कमी गुण मिळतात आणि तो देश सर्वात दुखी मानला जातो.
नवी दिल्ली | 11 मार्च 2024 : दरवर्षी प्रसिद्ध होणारा वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट आला आहे. त्यात कोणते देशातील नागरिक सर्वात आनंदी आहेत आणि कोणत्या देशाचे नागरित सर्वात दुःखी आहेत याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांच्या आनंदीपणाचा निर्देशांक मोजताना स्वांतत्र्य, आरोग्य, भ्रष्टाचार, उत्पन्न सारख्या बाबी विचारात घेतल्या गेल्या आहेत. जागतिक स्तरावर आनंदाची पातळी निश्चित करणाऱ्या बाबींचा विचार करता या यादीत सर्वात दु:खी देशाच्या यादीत पहिले नाव अफगाणिस्तानचे आहे. तर भारताचे स्थान देखील फारसे उत्साहवर्धक नाही.
जगातील सर्वात दुखी देश
137 देशांच्या यादीत अफगाणिस्तान सर्वात तळाला आहे. हा जगातील सर्वात दुखी देश आहे. सध्या अफगाणिस्तानात तालिबानी राज्य आहे. गरीबी, दारिद्रय आणि उपासमारीशी या देशातील जनता सामना करीत आहे. अनेक वर्षे युद्धात पोळला गेलेला हा देश महागाई, बेरोजगारी आणि तालिबानी क्रुर शासकांच्या तावडीत आहे. त्यामुळे येथील जनता निराशेत आहे.
लेबनॉन –
दु:खी देशात दुसऱ्या क्रमांकावर लेबनॉनचा क्रमांक आहे. हा देश सामाजिक आणि राजकीय अस्थिरतेने ग्रस्त आहे. आर्थिक संकटाने समाज आणि नागरिक तेथील सरकारवर नाराज आहेत.
सिएरा लियोन –
दुखी देशांच्या यादीत सिएरा लियोन तिसऱ्या आणि आफ्रीकेत पहिल्या स्थानावर आहे. येथील आर्थिक स्थिती खूपच खराब आहे. सामाजिक घडी विस्कटल्याने जनता नाराज आहे.
झिम्बॉब्वे –
वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्टनुसार झिम्बॉब्व चौथ्या स्थानी आहे. हा देश देखील अनेक आव्हानांना तोंड देत आहे. येथील लोक देखील निराश आणि हताश आहेत.
डेमोक्रॅटीक रिपब्लिक ऑफ कांगो –
हा देश दुखी देशांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. राजकीय अस्थिरता आणि लोकांचे स्थलांतराने कांगो सर्वात दुखी देशांपैकी एक आहे.
बोत्सवाना –
बोत्सवाना देशात देखील राजकीय आणि सामाजिक अस्थिरता आहे. येथील जनता देखील खूश नाही, सर्वात दुखी देशांच्या यादीत हा देश सहाव्या स्थानी आहे.
मलावी –
वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच नापिकी जमिन आणि सिंचनाची सोयी नसल्याने या देशातील जनता देखील दुखी आहे. हा देश दुखी देशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. लोकांकडे खाण्यापिण्याच्या वस्तूंची कमतरता आहे.
कोमोरोस –
कोमोरोस येथे देखील अस्थिरता आहे. या देशाला सत्तापालट म्हटले जाते. सामाजिक आणि राजकीय अस्थिरतेने देशातील लोक नाराज आहेत, या दुखी देशांच्या यादीत हा देश आठव्या क्रमांकावर आहे.
तंजानिया –
आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अस्थिरता झेलणारा हा देश दुखी देशाच्या यादीत 9 व्या स्थानावर आहे.
भारताचे रॅंकींग काय ?
भारताचे नाव या यादीत जरी नसले तर भारताचे स्थान देखील काही चांगले नाही. 137 देशांच्या यादीत भारत खालून 12 व्या स्थानी आहे. म्हणजे भारत जगातील 12 वा सर्वात दुखी देश आहे. भारत जागतिक पटावर जरी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीने पुढे जात असला तरी रिपोर्टमध्ये त्यांचा क्रम चांगला नाही.