World Population: पुढच्या आठवड्यात जगाची लोकसंख्या होईल 8 अब्ज, 1950 पासून किती वाढली जाणून घ्या

वाढती लोकसंख्या हा संपूर्ण जगाचीच चिंतेचा विषय आहे. 1950 पासून ते 2022 पर्यंत एकूण लोकसंख्या वाढीचा क्रम धक्कादायक आहे.

World Population: पुढच्या आठवड्यात जगाची लोकसंख्या होईल 8 अब्ज, 1950 पासून किती वाढली जाणून घ्या
जागतिक लोकसंख्या Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 6:45 PM

मुंबई, पुढील आठवड्यात 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या (World Population) 8 अब्जांवर पोहोचेल. तसेच 2023 पर्यंत ती 8.5 अब्जांपर्यंत पोहोचू शकते. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सन 2100 पर्यंत मानवी लोकसंख्या 10.4 अब्ज होईल असा अंदाज आहे. यामागचे कारण म्हणजे अनेक देशांमध्ये आयुर्मान वाढले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी लिंग गुणोत्तरासह जन्म-मृत्यूची आकडेवारीही थक्क करणारी आहे.

ग्लोबल वॉर्मिंग थांबवणे गरजेचे आहे

विल्सन सेंटर थिंक टँकच्या संशोधनानुसार, प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे 2022 ते 2050 दरम्यान 61 देशांची लोकसंख्या 1% किंवा त्याहून अधिक कमी होऊ शकते. एनजीओ पॉप्युलेशन मॅटर्सचे कार्यकारी संचालक रॉबिन मेनार्ड यांच्या मते, लोकसंख्येचा दर कमी करण्याची गरज आहे. एनजीओ प्रोजेक्ट ड्रॉडाउनने म्हटले आहे की, ‘पृथ्वीवरील संसाधने दीर्घकाळात वाचवण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंग थांबवणे आवश्यक आहे.

2050 पर्यंत लोकसंख्या 9.7 अब्ज

संयुक्त राष्ट्रांच्या मते  2050 पर्यंत पृथ्वीवरील मानवांची संख्या 9.7 अब्ज होईल. येत्या दशकात लोकसंख्या वाढतच जाईल असा अंदाज संयुक्त राष्ट्राने वर्तविला आहे. 65 आणि त्याहून अधिक वयाच्या जागतिक लोकसंख्येचा वाटा 2022 मध्ये 10 टक्क्यांवरून 2050 मध्ये 16 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. UN ने म्हटले आहे की, वृद्ध लोकसंख्या असलेल्या देशांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या संख्येशी जुळवून घेण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

हे सुद्धा वाचा

1950 ते 2022 अशी वाढली लोकसंख्या

मृत्यूदरात आणखी घट झाल्यामुळे 2050 मध्ये सरासरी जागतिक दीर्घायुष्य सुमारे 77.2 वर्षे असेल असा अंदाज आहे. त्याच वेळी, कोरोना महामारीचा लोकसंख्या बदलाच्या तिन्ही घटकांवर परिणाम झाला आहे. जन्मावेळी जागतिक आयुर्मान 2021 मध्ये 71.0 वर्षांपर्यंत घसरले. काही देशांमध्ये, विषाणूच्या लागोपाठ लाटांमुळे गर्भधारणा आणि जन्माच्या संख्येवर परिणाम झाला आहे. 1950 ते 2022 पर्यंत जगाची लोकसंख्या जवळपास तीन पटीने वाढली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.