जागतिक वन्यजीव दिन : पर्यावरणाच्या साखळीत वन्यजीवांचे महत्त्व जाणून घ्या…

जंगलाशेजारी मानव आणि पशू हा संघर्ष सध्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यातून मध्यम मार्ग काढून मानवासोबतच वन्यजीवांचं रक्षण करणे आवश्यक आहे. वन्यजीव हे पर्यावरणाची साखळी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

जागतिक वन्यजीव दिन : पर्यावरणाच्या साखळीत वन्यजीवांचे महत्त्व जाणून घ्या...
जागतिक वन्यजीव दिनImage Credit source: विकिपीडिया
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 6:33 AM

आपल्या सभोवताल सुष्टी आहे. प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष अशी विविधता आहे. पशु-पक्ष्यांच्या विविध जाती सापडतात. निसर्गाची कत्तल (Slaughter of Nature) केली जाते. निसर्गातील पशु-पक्ष्यांवर अत्याचार केले जातात. पण, ते जगले तर आपण जगू ही भावना रुजविणे आवश्यक आहे. यादृष्टिकोणातून हा विचार पुढं आला. तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. वन्यजीव (Wildlife) आणि वनस्पती यांच्याबाबत जागृकता वाढविणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याची सुरुवात थायलंडमध्ये झाली. 1970 च्या दशकात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले होते. चोरटा व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता. वन्यप्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर होते. वनस्पतींचीही कत्तल केली जात होती. या पार्श्वभूमीवर जगानं चिंता व्यक्त केली. यासंदर्भात जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations ) वन्यजीव दिवस ठरविला.

180 देशांनी घेतला पुढाकार

तीन मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या 2013 च्या अधिवेशनात जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषीत करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी वन्यजीवांचे रक्षण, संवर्धनावर चर्चा केली जाते. अन्यखाखळीतील वन्यजीवांचे महत्त्व समजावून सांगितले जाते. वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय स्थितीबाबत मंथन घडवून आणले जाते. तीन मार्च 1973 रोजी जागतिक वन्यजीवांसदर्भात खरी चिंता व्यक्त करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा पारीत केला गेला. 180 देशांनी वन्यसृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा मान्य केला. स्थानिकांच्या मदतीनेच जंगली पशु-पक्ष्यांची शिकार होते. दुर्मीळ वनस्पतींचा चोरटा व्यापार होता. त्यामुळं याबाबत स्थानिकांची जनजागृती यानिमित्तानं केली जाते. निसर्गसाखळीतील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. त्याचं जीवन निसर्गसाखळीसाठी का आवश्यक आहे, हे यानिमित्तानं समजावून सांगितलं जातं. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत वन्यजीवांची परिस्थिती, अनुवंशिकता, वैज्ञानिक सौंदर्य यासंदर्भात अध्ययन करण्याचे ठरले.

काही महत्त्वाच्या थीम

2020 – पृथ्वीवर जीवन कायम राहीलं पाहिजे 2019 – पाण्याखाली जीवन-लोकांसाठी 2018 – मांजरी-शिकाऱ्यांमुळं धोक्यात 2017 – युवकांनो आवाज ऐका 2016 – वन्यजीवांचं भविष्य आमच्यासोबत 2015- वन्यजीव गुन्ह्यांबाबत गंभीर होण्याची गरज अशा काही थीमवर जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली.

चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्राचे प्रदूषण नागपूर, पुणे, मुंबईसाठीही घातक! पर्यावरणाचे काम करणाऱ्या संस्थेचा दावा काय?

Nagpur | पतंजली उद्योगाचे उत्पादन लवकरच सुरू होणार, मिहानमधील विकासकामाबाबत दीपक कपूर काय म्हणाले?

वर्धा नदीत आंघोळ करायला गेला मुलगा, बुडताना पाहून आई धावली! मुलासह आईचा बुडून मृत्यू

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.