अमेरिकेत तयार झाले जगातले दुसरे सर्वात मोठे मंदिर, 183 एकरवर पसरलेल्या या मंदिरात 10 हजार मुर्त्या

कंबोडीयातील जगातील पहिल्या भव्य हिंदू मंदिरानंतर आता अमेरिकेतील न्यूजर्सी येथे 183 एकरात दुसरे भव्य हिंदू मंदिर बांधले जात आहे.

अमेरिकेत तयार झाले जगातले दुसरे सर्वात मोठे मंदिर, 183 एकरवर पसरलेल्या या मंदिरात 10 हजार मुर्त्या
BAPS-Swaminarayan-Akshardham-Temple-in-New-Jersey-Robbinsville
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 9:06 PM

नवी दिल्ली | 25 सप्टेंबर 2023 : सध्याच्या आधुनिक काळात भारताबाहेर अमेरिकेतील न्यूजर्सी येथे एका भव्य हिंदू मंदिराचे निर्माण पूर्ण होत आले आहे. हे जगातले दुसरे मोठे मंदिर आहे. या मंदिराचा पसारा 183 एकर पसरला असून त्याच्या निर्मितीसाठी 14 वर्षांचा काळ लागला आहे. या मंदिराचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होत आहे. न्यूयॉर्क स्थित टाईम्स स्वेअरपासून 60 मैल दक्षिणेल आणि वॉशिग्टन डीसी पासून सुमारे 180 मैल उत्तरेला रॉबिन्सविले टाऊनशिपमध्ये बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराची निर्मिती 2011 रोजी सुरु झाली होती. यासाठी 12,500 स्वयंसेवकांनी मदत केली.

या अक्षरधाम मंदिराचे क्षेत्र 183 एकरात पसरले आहे. या मंदिरात हिंदू धर्मग्रंथाच्यानूसार 10,000 मूर्ती, भारतीय वाद्ये आणि नृत्यांगणाची नक्षी आणि भारतीय संस्कृती दिसणार आहे. हे मंदिर कंबोडीयातील अंकोरवाट मंदिरानंतरचे दुसरे मंदिर आहे. कंबोडीयातील मंदिर 12 व्या शतकातील असून जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर 500 एकरात पसरलेले आहे. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.

नवी दिल्लीतील अक्षरधाम 100 एकराचे

नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर 100 एकरावर पसरले आहे. ते साल 2005 पासून सर्वसामान्यांसाठी उघडले. बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे अक्षरवत्सलदास स्वामी यांनी आमच्या आध्यात्मिक गुरुंनी पश्चिमेकडेही एका भव्य मंदिराची गरज होती. जे केवळ हिंदू, भारतीयच नव्हे तर जगातील सर्व लोकांना खुले असावे. येथे येऊन लोकांना हिंदू परंपरा, संस्कृतीचे दर्शन व्हावे असे विचार व्यक्त केले होते. आमच्या प्रमुख स्वामी महाराज्या इच्छेनुरुप बांधलेल्या या मंदिराचे औपचारिक उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि 18 ऑक्टोबर रोजी ते सर्वसाधारण भक्तांसाठी खुले होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.