पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टरचे अवशेष बलुचिस्तानात सापडले, लेफ्टनंट जनरलसह 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू

इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे (Bad weather) ही दुर्घटना घडलीय. पाकिस्तानी सैन्यानं जारी केलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांच्यासह 6 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय.

पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टरचे अवशेष बलुचिस्तानात सापडले, लेफ्टनंट जनरलसह 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू
लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 8:48 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याचं हेलिकॉप्टर सोमवारी रात्रीपासून बलुचिस्तान (Balochistan) परिसरात बेपत्ता झालं होतं. त्या हेलिकॉप्टरचे अवशेष (Helicopter wreckage) आज बलुचिस्तानातीलच मूसा गोथ इथं मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत पाकिस्तानी सैन्याच्या 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय. त्यांचे मृतदेहही मिळाले आहेत. इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे (Bad weather) ही दुर्घटना घडलीय. पाकिस्तानी सैन्यानं जारी केलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांच्यासह 6 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय.

ISPR च्या डीजींनी ट्वीट करुन सांगितलं की लासबेला जिल्ह्यातील मूसा गोथ मध्ये एका हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. यात लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांच्यासह सर्व सहा अधिकारी आणि सैनिकांचा मृत्यू झालाय. त्यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात ही दुर्घटना खराब हवामानामुळे झाल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून शोक व्यक्त

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की पाकिस्तानी सैन्यातील जवानांच्या मृत्यूने देश दुखी आहे. देशाला लेफ्टनंट जनरल सरफराज अली आणि पाकिस्तानी सैन्याचे 5 अन्य अधिकाऱ्यांच्या मृत्यूने संपूर्ण देश दु:खात आहे. ते पूरग्रस्तांना मदतकार्य पोहोचवण्याचं काम चांगलं काम करत होते. देश या सुपूतांचा सदैव ऋणी राहील.

सोमवारी रात्री हेलिकॉप्टर बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पाकिस्ताने सैन्याकडून माहिती देण्यात आली की बलुचिस्तानच्या लासबेलामध्ये पूरग्रस्तांची मदत करणारं पाकिस्तानी सैन्याचं एक हेलिकॉप्टर बेपत्ता झालं आहे.

ATC शी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला

आयएसपीआरने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर 12वी कोअर कमांडर जनरल सरफराज अली आणि अन्य 5 वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना घेऊन गेलं होतं. बलुचिस्तानातील पूरस्थितीचा आढावा आणि मदतकार्याची पाहणी या हेलिकॉप्टरद्वारे केली जात होती. मदतकार्य सुरु असताना ATC शी असलेला हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. यात कमांडर 12 कोअर सह 6 अधिकारी होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.