केवळ 2020 च नव्हे, त्यापूर्वीची ‘ही’ वर्षेही अत्यंत वाईट!

मुंबई : 2020 ला आपण निरोप देत आहोत, आणि 2021 च्या नववर्षात पदार्पण करणार आहोत, मात्र, 2020 चं वर्ष सगळ्याच अर्थानं जगासाठी वाईट ( Worst Year) राहिलं. कोरोनानं तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांनी जीव (10 lack deaths due to corona) गमावला. आर्थिक मंदी (Economic Slow Down) आली, अनेकांना रोजगार गमवावा (Unemployment) लागला. याशिवाय, जगभरातील हिंसक […]

केवळ 2020 च नव्हे, त्यापूर्वीची 'ही' वर्षेही अत्यंत वाईट!
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 3:30 PM

मुंबई : 2020 ला आपण निरोप देत आहोत, आणि 2021 च्या नववर्षात पदार्पण करणार आहोत, मात्र, 2020 चं वर्ष सगळ्याच अर्थानं जगासाठी वाईट ( Worst Year) राहिलं. कोरोनानं तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांनी जीव (10 lack deaths due to corona) गमावला. आर्थिक मंदी (Economic Slow Down) आली, अनेकांना रोजगार गमवावा (Unemployment) लागला. याशिवाय, जगभरातील हिंसक घटना, जंगलांना लागलेल्या आगी, अनेक ठिकाणी आलेले महापूर आणि जगावर घोंगावणारं युद्धाचं संकट हे सगळं 2020 मध्ये आपण पाहिलं. पण, जर तुम्ही 2020 ला सर्वात वाईट वर्ष म्हणत असाल, तर आम्ही तुम्हाला असे काही वर्ष सांगतो, जी याहूनही अधिक वाईट होती. (Year End Special : Worst Years In humans History )

इस 536: असं वर्ष की जेव्हा लाखो लोकांनी भुकेनं जीव सोडला

कोरोना काळात अनेकांना उपाशीपोटी झोपावं लागलं, नोकऱ्या गेल्यानं 2 वेळच्या जेवण मिळणंही मुश्कील झालं. मात्र, आजपासून 1500 वर्षांपूर्वी जगभरात लाखो लोकांचा भूकेनं बळी गेला होता, हे तुम्हाला माहिती आहे का? इस 536 मध्ये जगात 2 अतिविशाल ज्वालामुखींचा स्फोट झाला. या स्फोटामुळं सगळ्या पृथ्वीभोवती धुळीची जाड चादर पसरली गेली. त्यामुळं तब्बल 18 महिने सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहचू शकला नाही. सूर्यप्रकाश न मिळाल्यानं सगळी पिकं जळून गेली. जगभरात अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला. पृथ्वीचं तापमानही अचानक खाली गेलं. युरोपात मोठा दुष्काळ पडला आणि त्यात लाखो लोकांनी आपले प्राण गामवले.

इस 1347 : असं वर्ष की ज्यात कोरोनाहूनही भयानक रोगानं कोट्यवधी लोक दगावले

ब्युबोनिक प्लेग, मानवजातीच्या मुळावर उठलेली महामारी, ज्यात कोट्यवधी लोकांना प्राण गमावले. साल होतं, 1347 ते 1352 दरम्यानचं…1348 साली या रोगानं थैमान घालायला सुरुवात केली. ज्यामुळं कोट्यवधी लोक संक्रमित झाले. शरीरावर डाग पडायचे आणि ताप, उल्ट्या आणि थंडी भरु यायची. युरोपातील तब्बल 5 कोटी लोकांना याचं संक्रमण झालं. आफ्रिका, आशिया आणि युरोपात या रोगानं थैमान घातलं. एकट्या भारतात 1855 ते 1900 सालात तब्बल 1 कोटी 20 लाख लोकांनी प्राण गमावले.

इस 1770 : भीषण दुष्काळाचं ते वर्ष, ज्यात अनेकांनी प्राण गमावले

1770 चं वर्ष, ज्यावेली बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. बांगलादेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडीसामध्ये लोक पाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करु लागले. याच दरम्यान, तब्बल 1 कोटी लोकांनी प्रमाण गमावल्याची माहिती आहे. बंगाल प्रांतातील तब्बल एक तृतीयांश लोकसंख्या या दुष्काळानं संपवली. 1972 साली पडलेला दुष्काळही महाराष्ट्राच्या मनातून पुसलेला नाही. याआधी इतका मोठा दुष्काळ महाराष्ट्रानं कधीही पाहिला नव्हता. या दुष्काळात अनेकांनी आपल्यांना गमावलं, तर अनेक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना डोळ्यासमोर मरताना पाहावं लागलं. कोरोना संकटाहूनही भीषण संकट त्यावेली लोकांनी अनुभवलं.

इस 1783 : ज्वालामुखीनं जगाला जेरीस आणलं

वर्ष होतं 1783 चं, आईसलँडमधील लाकी हा ज्वालामुखी सक्रीय झाला. आणि तब्बल 8 महिने त्यात स्फोट होत राहिले. यामुळं जगाच्या काही भागात तापमानात मोठी वाढ झाली, तर काही भागात तापमान शुन्याच्याही खाली गेलं. उत्तरी धुव्राजवळ राहणाऱ्या लोकांच्या श्वासात विषारी वायूचा समावेश वाढला. अनेक भागात रासायनिक पाऊस पडला. त्यामुळं लाखो प्राण्यांचा मृत्यू झाला. आईसलँडच्या तब्बल 20 टक्के लोकसंख्या या नैसर्गिक आपत्तीत संपली. त्यानंतर जगभरात अन्नधान्याची कमी झाली, आणि त्यातही लाखो लोकांनी आपले प्राण गमावले.

इस 1918 : स्पॅनिश फ्लू, ज्यानं 5 कोटी लोकांचा बळी घेतला

H1N1 एन्फ्लुएन्झा फ्लूनं जगाला जेरीस आलं. जगातील प्रत्येक 3 लोकांमधील एका माणसाला याचं संक्रमण झालं. एका अंदाजानुसार जगात तब्बल 50 कोटी लोक या फ्लूमुळं संक्रमित झाले. जगभरात तब्बल 5 कोटी लोकांना या फ्लूनं संपवलं असा अंदाज आहे. ही फक्त रेकॉर्डवरील संख्या आहे, मृतांचा आकडा याहूनही अधिक होता असं जाणकार सांगतात. उत्तर भारतात या फ्लूमुळं तब्बल 1 कोटी 30 लाख लोकांनी प्राण गमावले. भारताच्या लोकसंख्येच्या तब्बल 6 टक्क्यांपर्यंत लोक या फ्लूमुळं मारले गेले.

1943 : दुसऱ्या महायुद्दाची ती वर्ष, मानवजातीसाठी सर्वाधिक कठीण

1943 ला दुसऱ्या महायुद्धाचे चटके मानवजातीला बसण्यास सुरुवात झाली. जर्मनीसह अनेक देशांमधील युद्धातील कॉन्स्ट्रेशन कॅम्प हे नरसंहाराचे अड्डे झाले. ब्रिटनही या युद्धातील अवस्था अतिशय बिकट होती. भारतातही या युद्धानं गंभीर परिणाम केले, अन्नधान्याची मोठी कमी झाली. सगळं अन्नधान्य सैनिकांसाठी पाठवण्यात येत असल्यानं नागरिकांना अन्नधान्य कमी पडू लागलं. त्याच काळात अनेक भागात पडलेल्या दुष्काळानं पिकांचं नुकसान झालं. परिणामी या काळात तब्बल 30 लाख भारतीयांना आपला जीव गमवावा लागला.

1947 : भारत-पाक फाळणीचं ते वर्ष सर्वाधिक कठीण

1947 साली भारत-पाक फाळणी झाली. ते वर्ष अनेकांसाठी सर्वाधिक कठीण राहिलं. पंजाबला याचे सर्वाधिक चटके बसले. पंजाबसह सिंध प्रांतात दंगली उसळल्या. या दंगलींमध्ये तब्बल 4 ते 5 लाख लोकांनी प्राण गमावले. या विभाजनात तब्बल दीड कोटी लोकांना आपलं घर सोडावं लागलं. दंगलींचं हे सत्र विभाजनानंतरही थांबलं नाही, आणि या सगळ्यात देशभरात तब्बल 20 ते 25 लाख लोकांनी आपले प्राण गमावल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाशी लढाई जिंकता-जिंकता नाताळमध्ये अचानक रुग्ण वाढले, दक्षिण कोरियात नेमकं काय झालं?

New Strain of Coronavirus UK : कोरोनाचा नवा अवतार आशियात धडकला, पहिला रुग्ण सापडला

(Year End Special : Worst Years In humans History )

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.