उस्ताद जाकीर हुसैन आणि अँटोनिया यांचं प्रेम कसं जुळलं?; अशी होती दोघांची फिल्मी लव्हस्टोरी…

देशाचेच नव्हे तर जगाचे उस्ताद जाकीर हुसैन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं. जाकीर हुसैन यांनी अँटोनिया मिनेकोला यांच्याशी विवाह केला होता. अँटोनिया या कथ्थक नृत्यांगणा होत्या. पण संसारासाठी त्यांनी कथ्थकमधील करिअर सोडून नवऱ्याच्या पाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला. काय होती जाकीर हुसैन आणि अँटोनिया यांची लव्ह स्टोरी?

उस्ताद जाकीर हुसैन आणि अँटोनिया यांचं प्रेम कसं जुळलं?; अशी होती दोघांची फिल्मी लव्हस्टोरी...
zakir hussainImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 11:18 AM

प्रसिद्ध तबलावादक, पद्मविभूषण जाकीर हुसैन यांचं काल सॅन फ्रॉन्सिस्को येथे उपचार घेताना निधन झालं. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या तबला वादनाच्या माध्यमातून संपूर्ण आयुष्य त्यांनी जगभरातील कलाप्रेमींना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या निधनामुळे देशातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक कलाप्रेमी हळहळला आहे. संगीत क्षेत्रावर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

उस्ताद जाकीर हुसैन यांचा कला प्रवास अत्यंत रोचक असा आहे. वयाच्या सातव्या वर्षीच ते तबला वादनात पारंगत झाले होते. जाकीर हुसैन यांच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना त्यांच्या व्यावसायिक कर्तृत्वाबद्दल सर्व काही माहीत आहे, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहिती नाही. जाकीर हुसैन यांची लव्हस्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नव्हती.

जाकीर हुसैन यांचा विवाह कथ्थक नृत्यांगना अँटोनिया मिनेकोला यांच्याशी झाला होता. अँटोनिया मिनेकोला या जाकीर हुसैन यांच्या मॅनेजरही होत्या. जाकीर हुसैन आणि अँटोनिया मिनेकोला यांनी 1978 मध्ये लग्न केले होते. त्यांना अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत.

अँटोनिया यांच्याशी पहिली भेट?

जाकीर हुसैन आणि अँटोनिया यांची पहिली भेट 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात कॅलिफोर्नियाच्या बे एरियामध्ये झाली होती. ते दोघेही तबला आणि कथ्थकचे औपचारिक प्रशिक्षण घेत होते. पहिल्या भेटीनंतर जाकीर यांना अँटोनिया आवडू लागल्या. हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेली. ते रोज वर्गाबाहेर अँटोनियाची वाट पाहत राहायचे.

जाकीर आणि अँटोनिया यांनी पहिल्या भेटीनंतर आठ वर्षांनी लग्न केले. दोघांनी काही काळ डेट केले. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. अँटोनियाच्या आई-वडिलांनाही त्यांच्या नात्याची माहिती होती. मात्र त्यावेळी उत्पन्नाचे स्थिर स्त्रोत नसल्याने तिचे वडील तिचे संगीतकाराशी लग्न करण्याच्या बाजूने नव्हते. वडिलांची इच्छा नसली तरी अखेर 1979मध्ये दोघांनी लग्न केले.

जातीबाहेर लग्न

जाकीर हुसैन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबाबतचा खुलासा केला होता. जातीबाहेर लग्न करणारे ते त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते. त्यामुळे जाकीर यांच्या आईने अँटोनियाशी लग्न करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला नव्हता. मात्र त्यांच्या वडिलांनी गुपचूप दोघांना लग्नात मदत केली आणि त्यानंतर त्यांच्या आईला त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले. काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर जाकीर यांच्या आईने अँटोनियाला आपली ‘सून’ म्हणून स्वीकारले होते, हा किस्सा खुद्द उस्ताद जाकीर हुसैन यांनी सांगितला होता.

कौटुंबिक माहिती

जाकीर हुसैन आणि अँटोनिया यांना अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत. जाकीर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, लग्नानंतर काही वर्षे अँटोनिया अमेरिकेत राहत होती. त्यावेळी ते कॉन्सर्टसाठी प्रवास करत होते आणि आपल्या मुलींची काळजी घेत असताना पैसे कमावण्यासाठी धडपडत होते. अँटोनियाने जाकीर यांना बळ देण्यासाठी आपल्या कारकिर्दीचा त्याग केला आणि आपल्या मुलींचे उत्तम प्रकारे संगोपन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.

जाकीर हे जेव्हा परदेशात जायचे तेव्हा राग, नैराश्य अशा अनेक भावना जाणवत असत. पण आपल्या मुलांसाठी त्यांनी स्वत:ला जुळवून घेतलं. एकमेकांच्या चालीरिती आणि कौटुंबिक मूल्यांचा स्वीकार केला आणि त्यांना महत्त्व दिले. आपल्या दोन्ही मुलींना चांगले शिक्षण चांगले संगोपन देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केले, असं अँटोनिया यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.