पशुपतीनाथ मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी का?, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर चिखलफेक
पोलिसांनी या प्रकरणी खटला दाखल केला आहे. मंदिर परिसर बंद करण्यात आला आहे. भाविकांचा मंदिरात प्रवेश रविवारी दुपारपासून बंद करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : नेपाळची राजधानी काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरातून १० किलो सोने चोरीला गेले. मंदिरात १०० किलो सोन्याचे दागिने होते. त्यापैकी १० किलो वजनाचे दागिने चोरीला गेले. ही घटना समोर आल्यानंतर नेपाळमध्ये मोठी खळबळ माजली. नेपाळमध्ये संसदेपासून गल्लीपर्यंत प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरातील चोरीची चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणी खटला दाखल केला आहे. मंदिर परिसर बंद करण्यात आला आहे. भाविकांचा मंदिरात प्रवेश रविवारी दुपारपासून बंद करण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण…
पशुपतीनाथ मंदिरात १० किलो सोन्याची चोरी
नेपाळचे एंटी करप्शन बॉडी सीआयएए आता पशुपतीनाथ मंदिरातील १०० किलो दागिन्यांपैकी १० किलो सोने गायब झाल्याची तपासणी करत आहे. पशुपतीनाथ हे नेपाळमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे. १०० किलो सोन्याचे दागिने या मंदिरात आहेत. गेल्या महाशिवरात्रीला मंदिरातील शिवलिंगासभोवताल हे दागिने ठेवण्यात आले होते.
संसदेत १० किलो सोन्याच्या दागिन्यांचा मुद्दा समोर आला. नेपाळ सरकारने या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. सीआयएएने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली निशाण्यावर का?
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार, नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली स्वतःला नास्तिक मानतात. केपी शर्मा ओली यांनी नेपाळच्या हिंदू समुदायाला खूश करणारे काम केले. त्यांनी पशुपतीनाथ मंदिरात १०४ किलो सोना चढवला.
पशुपतीनाथ मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. केपी शर्मा ओली यांनी सोना चढवला. त्यातून सोन्याचे वस्त्र तयार करण्यात आले. पशुपती एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्त्र सहसा चांदीचे तयार केले जातात. परंतु, तत्कालीन पंतप्रधान ओली यांच्या आदेशानुसार वस्त्र सोन्याचे तयार करण्यात आले.
सोना नेपाळच्या सेंट्रल बँकेतून खरेदी केला होता. परंतु, १०४ किलो सोन्यात ७ किलो चांदी, तांब्यासारखी सामृग्री मिश्रित होती. माजी पंतप्रधान ओली म्हणतात, सोना असली होता की, मिश्रित हे तपासणे माझे काम नाही. विद्यमान पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी ओली यांच्या स्पष्टीकरणाचे समर्थन केले.