दररोज 100 रुपयांची गुंतवणूक आणि पाच वर्षात होणार लाखोंची कमाई, जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या स्किमबाबत

भविष्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करत असते. योग्य वेळी आणि योग्य वयात केलेली गुंतवणूक लाभदायी ठरते. त्यामुळे अशाच एका स्किमबाबत आपण जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसमध्ये दरदिवशी 100 रुपये जमा केले तर पाच वर्षांत लाखो रुपये मिळतील. चला जाणून घेऊयात या स्किमबाबत

दररोज 100 रुपयांची गुंतवणूक आणि पाच वर्षात होणार लाखोंची कमाई, जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या स्किमबाबत
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 4:19 PM

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणून सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे देशभरातील गुंतवणूकदार काही अंशी का होईना पोस्ट ऑफिस गुंतवणुकीला प्राधान्य देतात. पण गुंतवणूक किंवा बचत करण्यासाठी हाती पैसा तर हवा ना. त्यामुळे अनेकजण हात आखुडता घेतात. बचत आज उद्या असं करत वेळ निघून जाते. त्यामुळे योग्य वेळी योग्य बचत केली तर फायदेशीर ठरते. त्यामुळे घरातील लहानग्यांना कमी वयातच बचतीचं महत्त्व सांगितलं पाहीजे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे गुंतवणूक केली तर भविष्यात फायदेशीर ठरू शकते. जर गुंतवणूक करायची आहे आणि जोखिमही घ्यायची नसेल, तर पोस्ट ऑफिस गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट हा चांगला पर्याय ठरू शकतो. या स्किमला अनेक जण शॉर्ट फॉर्ममध्ये आरडी असं संबोधतात. पोस्ट ऑफिसमधील ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या योजनेत दर दिवसाला फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षात लाखो रुपयांची कमाई होईल.

दररोज 100 रुपयांची गुंतवणूक केली तर महिन्याकाठी 3000 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. म्हणजेच दर महिन्याला 3000 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. वर्षाला तुमच्या खात्यात 36 हजार रुपये जमा होतील. याच पाच वर्षांचं गणित पकडलं तर 1 लाख 80 हजार रुपये जमा होतील. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये 6.7 टक्के व्याज मिळतो. म्हणजेत पाच वर्षात तुम्हाला तुमच्या जमा राशीवर 34,097 रुपये मिळतील. याचा अर्थ असा की पाच वर्षांनी तुम्हाला तुमची मुद्दल अधिक व्याज पकडून 2 लाख 17 हजार 97 रुपये मिळतील. कमी गुंतवणुकीत तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. छोट्या गुंतवणुकीमुळे कधी इतकी मोठी रक्कम झाली याचा पत्ता देखील लागणार आहे. भविष्यात अडीअडचणीच्या काळात या पैशांची मदत होऊ शकते.

विशेष म्हणजे गरजेवेळी या आरडीवर तुम्ही कर्जही घेऊ शकता. नियमानुसार, आरडीचे 12 हप्ते जमा केल्यानंतर खात्यात जमा असलेल्या रकमेच्या 50 टक्के लोन मिळू शकतं. हे कर्ज एक दमात किंवा हप्त्याने भरण्याची मुभा देखील मिळते. आरडीवर मिळणाऱ्या व्याजाच्या 2 टक्के अधिक व्याज कर्जासाठी भरावं लागतं. दरम्यान, गरजेवेळी हे खातं तु्म्ही बंद करून पैसे काढू शकता. आरडी ओपन केल्यापासून तीन वर्षानंतर कधीही खातं बंद करून पैसे काढू शकता. इतकंच काय तर मुदतीच्या एक दिवस आधीही पैसे काढू शकता.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....