चालाख लोक कसे ओळखायचे? या 5 ट्रिक्स लक्षात ठेवा
चतुर असलेल्या लोकांना ओळखण्याच्या पाच महत्वाच्या युक्त्या या ठिकाणी दिल्या आहेत. हे लोक फुशारकी मारतात, शब्द पाळत नाहीत, भावनांशी खेळतात आणि वारंवार खोटे बोलतात. ते इतरांच्या मजबुरीचा फायदा घेतात आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नेहमीच तयार असतात.
चालाख लोक कसे ओळखायचे? या 5 ट्रिक्स लक्षात ठेवा
जितकी माणसं तितक्या प्रवृत्ती असतात. काही माणसं रागीट असतात, काही शांत असतात. काही उतावीळ असतात, काही मस्तीखोर असतात. काही साधू वृत्तीचे असतात तर काही शैतानी वृत्तीचे असतात. एकूण माणूस ओळखणं तसं मुश्किलच. काही माणसं तर अत्यंत चतुर असतात. अशा लोकांना आपण नेहमी दूर ठेवलं पाहिजे. पण ही माणसं ओळखायची कशी? अशी माणसं ओळखण्याच्या पाच ट्रिक्स आहेत. त्या तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ही चतुर माणसं ओळखता येतील.
शांत स्वभावाची माणसं कधीच कुणाच्या वाट्याला जात नाहीत. पण जी लोक चालाख असतात ती तात्काळ ओळखता येतात. एक तर ही माणसं प्रचंड गोड बोलतात. शिवाय ही माणसं पुढे पुढे करणारी असतात. या लोकांच्या हालचाली चित्रविचित्र असतात. ते स्थिर नसतात. त्यांचे डोळे कावरेबावरे असतात. त्यांच्या बॉडीलँग्वेजमधून ते किती अस्थिर आहेत, किंवा काही तरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे स्पष्ट होत असतं.
चालाक लोक कसे ओळखायचे?
फुशारकी मारतात
जे लोक खूप चालाख असतात, ते स्वतःच्या गोष्टींनाच खूप महत्त्व देतात. हे लोक दुसऱ्यांच्या गोष्टींना महत्त्व देत नाहीत आणि त्यांना चांगले दाखवण्यासाठी त्यांचेच विचार आणि यश अतिशयोक्तीने सांगतात. हे लोक फुशारकी मारत असतात. ते नेहमीच दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. आपण कसे ग्रेट आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
शब्द पाळत नाहीत
चालाख लोक लवकर शब्द देतात, पण ते कधीच दिलेला शब्द पूर्ण करत नाहीत. तसेच, ते त्यांच्या चुका इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात. जर असे काही होत असेल, तर त्या व्यक्तीपासून दूर राहा.
भावनेशी खेळतात
चालाख लोक दुसऱ्याच्या भावनांसोबत खेळतात. ते तुमची कमजोरी किंवा संवेदनशीलता ओळखतात. त्याचा फायदा घेत तुमची फसवणूक करण्याचं काम करतात.
वारंवार खोटं बोलतात
ही मंडळी चुकीचे समज किंवा गैरसमज निर्माण करतात, जेणेकरून त्यांच्या चुका आणि अपयशाचे दोष इतरांवर ठेवता येईल. तसेच वारंवार खोटं बोलून आपलं म्हणणं खरं करण्याचा आणि समोरच्यांना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्नही करतात.
मजबुरीचा फायदा
हे लोक इतरांची मजबुरी ओळखून त्याचा फायदा घेतात. ते कधीच त्यांचे प्लान सांगत नाहीत. फक्त तुमच्याकडून स्वतःचा स्वार्थ साधतात.