Mysterious Village | भारतातील एक रहस्यमय गाव, जेथे फक्त जुळी मुलेच जन्मतात
केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील हे गाव आहे. प्रत्येक कुटुंबात जुळीच मुले का जन्माला येत असावीत, हे कोडे आजपर्यंत कुठल्याही संशोधकांनाही उलगडलेले नाही. (A mysterious village in India, where only twins are born)
नवी दिल्ली : भारत वैविधतेने नटलेला देश मानला जातो. देशात खरंच विविध तऱ्हेच्या गोष्टी पाहायला मिळतात. काही न उलगडणारी रहस्ये आहेत. अशीच एक जागा म्हणजे केरळ. केरळला ‘गॉड्स ऑन कंट्री’ असे म्हटले जाते. यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की केरळ हे विविध दैवी चमत्कारांचे राज्य असेल. इथे असे एक रहस्यमय गाव आहे, जेथे प्रत्येक घरात केवळ जुळी मुलेच जन्माला येतात. केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील हे गाव आहे. प्रत्येक कुटुंबात जुळीच मुले का जन्माला येत असावीत, हे कोडे आजपर्यंत कुठल्याही संशोधकांनाही उलगडलेले नाही. देशातील एकूण जुळ्या मुलांपैकी सर्वाधिक जुळी मुले ही याच गावात आहेत. (A mysterious village in India, where only twins are born)
गावात तब्बल 550 जुळी मुले
मल्लपुरम जिल्ह्यातील कोडिन्ही असे या रहस्यमय गावाचे नाव आहे. केवळ जुळी मुले जन्माला येणारे हे देशातील एकमेव गाव आहे. एका अंदाजानुसार, या गावात 2000 कुटुंबे असून 550 जुळे लोक आहेत. अधिकृत आकडेवारीची चर्चा करायची झाल्यास सन 2008 च्या अंदाजानुसार, या गावामध्ये 280 जुळे लोक होते. पण मागील 12 -13 वर्षांत यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गावातील बहुतांश मुलांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आहे. एका शाळेमध्ये तर 80 जुळी मुले आहेत.
संपूर्ण देशात 1000 मुलांच्या जन्मामध्ये 9 मुले जुळी असतात. कोडिन्ही गावात 1000 मुलांमागे 45 जुळी मुले जन्म घेतात. हा आकडा संपूर्ण जगात दुसरा आणि आशियामध्ये पहिल्या स्थानावर आहे. याबाबत चीन आणि पाकिस्तानही मागे आहे. जुळ्या मुलांच्या आकडेवारीत जगात पहिला नंबर नायजेरियाच्या इग्बो-ओराचा आहे. या गावात 1000 मुलांमध्ये 145 जुळी मुले जन्म घेतात. काही कुटुंबांमध्ये दोन ते तीन वेळा जुळ्या मुलांनी जन्म घेतला आहे.
एक नव्हे तर अनेक जुळी मुले
कोडिन्ही या गावात, शाळेत आणि बाजाराच्या परिसरात एकसारखीच दिसणारी अनेक जुळी मुले दिसतील. या गावात सर्वात जुळ्या भावंडांमध्ये 65 वर्षांचे अब्दुल हमीद आणि त्यांची जुळी बहिण कुन्ही कदिया यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, याच जुळ्या भावंडांच्या जन्मापासून गावामध्ये जुळी मुले जन्माला येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये एखाद्या-दुसऱ्या घरात जुळी मुले जन्माला येत होती. परंतु त्यानंतर वेगाने वाढ झाली. गावातील एकूण जुळ्या मुलांपैकी निम्मी जुळी मुले ही मागील दहा वर्षांत जन्माला आली आहेत.
ऑक्टोबर 2016 मध्ये संशोधनासाठी पोहोचली टीम
गावात प्रत्येक कुटुंबात जुळी मुले कशी काय जन्माला येतात, या रहस्याचा उलगडा करण्यासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये संशोधकांची एक संयुक्त टीम पोहोचली होती. या टीममध्ये हैदराबाद येथील सीएसआयआर- सेन्टर फॉर सेल्युलर अँड मॉड्युलर बायोलॉजी, केरळ युनिव्हर्सिटीज ऑफ फिशरिज अँड ओशिन स्टडीज (केयूएफओएस), लंडन युनिव्हर्सिटी तसेच जर्मनीच्या संशोधकांचा समावेश होता. अशाप्रकारे अनेकदा संशोधन झाले, मात्र गावात जुळी मुलेच जन्माला का येतात, हे कोडे अजून उलगडलेले नाही. (A mysterious village in India, where only twins are born)
अवघ्या 53 हजारात खरेदी करा 1.60 लाखाची Royal Enfield Thunderbird 350#RoyalEnfield #RoyalEnfieldThunderbird350https://t.co/TdOIMqlKdm
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 30, 2021
इतर बातम्या
मिर्झापूर फेम अभिनेता विजय वर्माने घेतली नवी ढासू SUV, पॉवर आणि फीचर्सच्या बाबतीत अव्वल
ट्रेनच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या का असतात? जाणून घ्या ही महत्त्वपूर्ण माहिती