टेक ऑफपासून लँडिंग पर्यंत… विमानाचं उड्डाण कसं होतं?; थोडी चूक कशी देते दुर्घटनेला आमंत्रण?
विमानाचे उड्डाण, टेकऑफ आणि लँडिंग यांच्या विज्ञानाबद्दल माहिती दिली आहे. मानवी चूक, तांत्रिक दोष आणि हवामान अशा विमान अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा समावेश आहे. दुर्घटना टाळण्यासाठी घेतले जाणारे उपाय आणि सुरक्षितता उपाययोजना यावरही प्रकाश टाकला आहे.
अजरबैजान येथील विमान अपघाताचे फोटो व्हायरल झाले आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. हे होत नाही तोच दक्षिण कोरियातील विमान अपघाताची बातमी येऊन धडकली. थायलंडहून दक्षिण कोरियासाठी विमानाने उड्डाण घेणार होतं. सकाळीच रनवेवरून उड्डाण घेण्यापूर्वी हे विमान क्रॅश झालं. त्यामुळे विमानात आग लागली. या आगीत 120 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर अजरबैजान येथील विमान अपघातात 38 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांवर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
या दोन्ही विमान दुर्घटना पाहिल्या तर एका छोट्या चुकीमुळे किती तरी लोकांचा जीव जाऊ शकतो हे स्पष्ट झालंय. पण मग मात्र, प्रश्न हा निर्माण होतो की, चूक कोणाची? पायलटचा आहे की काही त्यामागे तांत्रिक कारण आहे. एवढं आधुनिक तंत्रज्ञान असताना विमान दुर्घटना कशी होते? असा सवालही निर्माण होतो. ही सर्व कारणं जाणून घेण्यासाठी आपल्याला टेक ऑफ पासून लँडिंगपर्यंत विमानाचं काम कसं चालतं याची माहिती घ्यावी लागेल.
विमान उड्डाणाचं विज्ञान
टेक ऑफच्या बाबतची माहिती घेण्यापूर्वी विमान कसं उड्डाण घेतं हे जाणून घेतलं पाहिजे. विमान उड्डाणाचा मुख्य आधार फक्त चार फोर्सवर आधारीत आहे. एक लिफ्ट, दुसरं ड्रॅग, तिसरं थ्रस्ट आणि चौथं वेट. लिफ्ट विमानाला वर उचलते. विमानाच्या पंखांच्या विशेष डिझाइनमुळे ते होतं. थ्रस्ट इंजिनात फौर्स निर्माण करतो. त्यामुळे विमान पुढे जातं.
ड्रॅग हवेला रोखण्याचं काम करतं. त्यामुळे विमान स्लो होतं. वेट म्हणजे विमानाचं एकूण वजन. या चार फोर्सच्या बळावर विमान हवेत उडतं. या सर्व फोर्सच्या संतुलनाच्यामुळेही विमान हवेत सुरक्षित उडतं. त्यामुळेच सर्व फोर्सला सविस्तर समजून घेऊया.
लिफ्ट फोर्सचं काम कसं चालतं?
लिफ्ट फोर्स प्लेनला वर जाण्यासाठी मदत करतं. हा फोर्स विमानातील पंखांच्या डिझाईनने निर्माण होतो. हवा पंख्याच्यावरून वेगाने आणि खालून धीम्यागतीने गेली पाहिजे, अशा पद्धतीने पंख्याचा आकार तयार केलेला असतो. यावर बर्नोलीचा एक सिद्धांत आहे. जेव्हा हवेचा वेग वाढतो, तेव्हा हवेचा दाब कमी होतो, असं बर्नोलीचा सिद्धांत सांगतो. त्यामुळेच पंख्याच्यावर दाब कमी आणि खाली दाब अधिक असतो. त्यामुळेच प्लेन वर उडतं.
दुसरा फोर्स थ्रस्ट फोर्स आहे. या फोर्समुळे विमान पुढे खेचल्या जातं. इंजिनातून हा फोर्स निर्माण केला जातो. हे इंजिन हवेला वेगाने मागे फेकते. त्यामुळे न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार, प्लेन पुढे जातं.
इतर फोर्स कसं काम करतात?
ड्रॅग हे एक प्रकारचं प्रतिरोधक फोर्स आहे. या फोर्समुळे प्लेनची स्पीड नियंत्रणात राहते. हवेमुळे हा फोर्स तयार होतो. हा फोर्स निर्माण व्हावा म्हणून विमानाचा आकार एयरोडायनामिक केला जातो. तर, चौथा फोर्स आहे वेट. वेट हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा फोर्स प्लेनला खाली खेचतो. वेटच्या तुलनेत लिफ्ट अधिक भारदस्त असते. कारण त्यामुळे प्लेन हवेत उडते. अशा प्रकारे या फोर्सच्यामुळेच विमान हवेत उडतं.
न्यूटन यांचा उल्लेख तर होणारच…
विज्ञानाची बातमी असेल आणि त्यात थोर शास्त्रज्ञ न्यूटन यांचा उल्लेख होणार नाही असं होऊच शकत नाही. यातही न्यूटनच्या गतीचा नियम लागू होतो. पहिला नियम म्हणजे, जोपर्यंत बाहेरचा फोर्स निर्माण होत नाही, तोपर्यंत एखादी वस्तू आपला स्पीड कायम ठेवते. त्यामुळेच प्लेनमध्ये हवा कायम ठेवण्यासाठी थ्रस्ट सातत्याने दिला जातो. थ्रस्ट प्लेनला वेगाने पुढे नेत असतो. त्यामुळे लिफ्ट निर्माण होते. अशावेळी प्रत्येक क्रियेच्या विपरीत प्रतिक्रिया होत असते.
म्हणजे इंजिन हवेला मागे ढकलतो. आणि त्याच्या विपरीत बल प्लेनला पुढे घेऊन जात असते. त्यामुळे आता तुम्हाला विमान कसं विज्ञानाच्या नियमानुसार उडतं हे तुम्ही जाणून घेतलं. आता टेक ऑफ आणि लँडिंगची माहितीही जाणून घेऊया.
टेक ऑफ आणि लँडिंगची कमाल
टेक ऑफ आणि लँडिंग कशी होते याची माहिती घेऊ. सर्वात संवेदनशील गोष्ट म्हणजे टेक ऑफ आणि लँडिंग. कोणत्याही उड्डाणातील हे जोखमीचे टप्पे असतात. टेक ऑफ घेताना योग्य वेग आणि अँगल ठेवणं आवश्यक असतं. लँडिंगच्यावेळी विमान धीम्यागतीने आणि सुरक्षितपणे जमिनीवर आणणं योग्य असतं. या टप्प्यात पायलटचं कौशल्य आणि तांत्रिक उपकरणाच्या प्रभावाची परीक्षा असते.
अशी होते चूक
विमानात वापरण्यात येणारी टेक्निक ही अत्यंत रिस्की असते. कारण आपण त्यावरच अवलंबून असतो. इंजिन कधी फेल होईल, नेव्हिगेशन सिस्टिम कधी खराब होईल आणि ऑटोपायलटमध्ये कधी गडबड होईल याची कुणालाच खबर नसते. या सर्व गोष्टी एका दुर्घटनेमुळे होऊ शकतात. 2009मध्ये एअर फ्रान्स फ्लाइट 447बाबत असाच प्रकार झाला होता. त्यामुळे मोठा अपघात झाला होता. या विमानात ऑटोमॅटिक सिस्टिममध्ये काही डिफॉल्ट झाला होता.
खराब हवामान हे सुद्धा विमान अपघाताचं एक मुख्य कारण आहे. वेगाने वाहणारा वारा, वादळ आणि धुकं अशा परिस्थितीत पायलटसमोर प्रचंड अडचणी निर्माण होतात. बर्फ पडत असताना विमानाच्या पंख्यांवर बर्फ जमा झाल्यावर अनेकदा लिफ्ट होते. त्यामुळे विमानाचं संतुलन बिघडतं.
पायलटची चूक आणि…
मानवी चूक हा सुद्धा विमान अपघाताचा एक मुलभूत पैलू आहे. टेक ऑफ आणि लँडिंगमध्ये योग्य चेक लिस्टचं पालन केलं नाही तर कंट्रोल टॉवरमधून संपर्काला अडथळा येतो. किंवा चुकीचा निर्णय घेतला तर त्याचा प्रचंड गंभीर परिणाम होऊ शकतो. 1977मध्ये टेनेरिफ विमानतळावर झालेला विमान अपघात त्याचं उदाहरण आहे. यात दोन विमानांची धडक बसली होती. या अपघातात अनेक लोकांनी आपला जीव गमावला होता.
पक्ष्यांची धडक…
उडत्या विमानाला जर पक्ष्याने धडक दिली तर त्याला बर्ड स्ट्राईक म्हटलं जातं. असा प्रकार टेक ऑफ आणि लँडिंगच्यावेळी होतो. 2009मध्ये मिरॅकल ऑन द हडसन नावाची दुर्घटना झाली होती. पक्ष्याने धडक दिल्याने विमानाचे दोन्ही इंजिन बंद झाले होते. पण पायलटच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षितपणे नदीत उतरवलं होतं.
रनवेशी संबंधित अडचणी
रनवेची स्थिती सुद्धा दुर्घटना घडण्यास कारणीभूत असते. ओल्या किंवा चिखल असलेल्या रनवेवर विमानाचं नियंत्रण जाणं, रनवेवर पुरेसा प्रकाश नसणं, तसेच अन्य त्रुटींमुळे लँडिंग धोक्याची ठरू शकते. यात एका विमानाची चूक दुसऱ्या विमानाला भोवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.
पायलटचा अनुभव आणि त्याची सतर्कता यामुळे विमानाचा अपघात टळू शकतो. कारण अनुभव नसणारे पायलट वेगाने आणि अचानक घडणाऱ्या परिस्थितीचा सामना करताना योग्य निर्णय घेत नाहीत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय सिव्हिल एव्हिएशन ऑर्गेनायजेशन (ICAO)ने पायलट प्रशिक्षणाचे कठोर मानकं तयार केली आहेत.
सिग्नल कसा देतात?
विमानांची टक्कर रोखण्यासाठी TCAS (ट्रॅफिक कोलिजन अव्हायडन्स सिस्टम) आणि लँडिंगसाठी ILS (इंस्ट्रूमेंट लँडिंग सिस्टम) सारख्या प्रणाली दुर्घटनांची संख्या कमी करण्यासाठी मदत करतात. ब्लॅक बॉक्स डेटाच्या विश्लेषणानंतर प्रत्येक दुर्घटनेनंतर सुधारणा घडवून आणली जाते.
जेव्हा विमान अपघात होतो तेव्हा त्याची सखोल चौकशी होते. एयरक्राफ्ट अॅक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन बोर्ड दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेते. चौकशीत जे काही निष्पन्न होतं त्याच्या आधारे प्रक्रियेत बदल केला जातो. या प्रक्रियेमुळे भविष्यातील दुर्घटना रोखल्या जातात.
हवाई प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. पण हवाई प्रवासात दुर्घटना होणारच नाही, असं नाही. दुर्घटना रोखणंही कठिण आहे. मानवी चूक, तांत्रिक बिघाड, नैसर्गिक कारणं आदी कारणांमुळे हे अपघात होत असतात. आणि होत राहतील. पण प्रत्येक दुर्घटनेतून सर्वांनी धडा घेणं आणि अधिक सजग राहणं आवश्यक आहे.