वातावरणातील बदलाशी लढणारे मुख्य तापमान अधिकारी, कसे देतात अडचणींवर मात

हवामानातील बदलाचा मनुष्यावर वाईट परिणाम होत आहे. मुख्य तापमान अधिकारी हवामानाचा परिणाम कमी होण्यासाठी काम करत आहेत. मुख्य तापमान अधिकाऱ्यांचं काम काय ते पाहुयात.

वातावरणातील बदलाशी लढणारे मुख्य तापमान अधिकारी, कसे देतात अडचणींवर मात
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 9:29 PM

नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीचा काळ आला आहे. जग गर्मीमुळे त्रासली आहे. पृथ्वीवरील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रकरण फक्त काही देशांपर्यंत मर्यादित नाही. संपूर्ण जग याच्याशी लढत आहे. शास्त्रज्ञांनी जुलै हा एक लाख २० हजार वर्षांपासूनचा सर्वात जास्त उष्ण महिना असल्याचं सांगितलं. अमेरिकेपासून युरोप, आशिया आणि आफ्रिका हे देश वाढत्या उष्णतेमुळे चिंतेत आहेत. या बदलत्या हवामानाशी लढण्यासाठी मुख्य तापमान अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत आहे. अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांनी दिली.

हवामानातील बदलाचा मनुष्यावर वाईट परिणाम होत आहे. मुख्य तापमान अधिकारी हवामानाचा परिणाम कमी होण्यासाठी काम करत आहेत. मुख्य तापमान अधिकाऱ्यांचं काम काय ते पाहुयात.

कसे काम करतात मुख्य तापमान अधिकारी?

सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्या कमी करण्यासाठी मुख्य तापमान अधिकारी काम करतात. अमेरिकेत तीन मुख्य तापमान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. वर्ल्ड इकानॉमिक फोरमच्या रिपोर्टनुसार, वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे काम करतात. वाढत्या तापमानामुळे धोका वाढत आहे.

वाढत्या जागतिक तापमान वाढीशी लढण्यासाठी मुख्य तापमान अधिकाऱ्याची संकल्पना अमेरिकेचे एड्रीन आर्श रॉकफेलर फाउंडेशन रिसायलंस सेंटरने सुरू केली. २०३० पर्यंत हवामानातील बदलावर हे उपाय सूचवतील. सूर्याच्या थेट किरणांपासून बाधित होणाऱ्या लोकांसाठी हे काम करणार आहेत. हवामान बदलाचा परिणाम आता मनुष्य, प्राणी आणि समुद्रातील जिवांवर दिसणे सुरू झाले आहे.

अमेरिकेत ८ अधिकाऱ्यांची नियुक्ती

गेल्या तीन वर्षांत अमेरिकेने ८ मुख्य तापमान अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मियामी, लॉस एंडलीस, फोनिक्स यांचा समावेश आहे. पहिली नियुक्ती एप्रिल २०२१ मध्ये मियामीमध्ये झाली. मियामीमध्ये होते जेन गिलबर्ट. जेन गिलबर्ट हे पर्यावरण विशेषज्ञ होते. यांच्या नियुक्तीमागील उद्देश हा उष्णता नियंत्रित करणे आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणारे मृत्यू थांबवणे आहे. याशिवाय मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशातही मुख्य तापमान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उष्णतेचा सामना कसा करतात?

अरीजोनाच्या फोनिक्समध्ये ४३ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले. तेथील मुख्य तापमान अधिकारी (सीएचओ)डेवीड होन्डुला म्हणाले, मी फोनचा वापर करत होतो. लोकांना मॅसेजेस पाठवत होतो.

सीएचओची टीम लोकांना वाढत्या तापमानाबद्दल इशारा देते. वृक्षारोपण कार्यक्रम चालवतात. जेणेकरून उष्णतेच्या लाटांपासून बचाव करता येईल. २०५३ पर्यंत अमेरिकेतील मियामी भागात हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका राहू शकतो. त्यामुळे आतापासून उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.