गर्ल्स हॉस्टेलमध्ये काय पाहाल? 10 टिप्स… तिसरी सूचना सर्वात महत्त्वाची; नाही तर…

अनेक मुली किंवा महिला शहरात नोकरी निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने येत असतात. अशावेळी त्या हॉस्टेल, पीजीमध्ये राहतात. किंवा एखादा फ्लॅट घेऊन चारपाचजणी मिळून राहतात. पण अशावेळी सुरक्षेची खबरदारी घेतली पाहिजे. कुणावरही विसंबून राहता कामा नये.

गर्ल्स हॉस्टेलमध्ये काय पाहाल? 10 टिप्स... तिसरी सूचना सर्वात महत्त्वाची; नाही तर...
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 11:38 AM

गर्ल्स हॉस्टेलमध्ये किंवा कॉलेजातील वॉशरूममध्ये सीक्रेट कॅमेरा लावण्यात आल्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात. आंध्रप्रदेशात तर मागे मुलींचे 300 हून अधिक व्हिडीओ काढण्यात आल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे देशभर खळबळ उडाली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मुलींचं हॉस्टेलमध्ये राहणंही मुश्कील झालं होतं. अनेक पालकांनीही या प्रकरावर चिंता व्यक्त केली होती.

शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या किंवा घरापासून दूर राहून नोकरी करणाऱ्या मुली नव्या शहरात हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहतात. मात्र, या मुलींचे व्हिडीओ काढले जात असल्याच्या घटना उघड होत असल्याने खळबळ उडाली आहे. अशा घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पहिल्यांदाच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींनी अधिक सतर्क राहण्याची गरज असते. त्यांनी आपल्या सुरक्षेबाबत एक्स्ट्रा कॉशियस असलं पाहिजे.

सेफ्टी टिप्स काय?

अनेक विद्यापीठांकडून मुलींसाठी हॉस्टेलची सुविधा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्थाही असते. मात्र असं असतानाही अनेक कांड होतात. त्यामुळे पालक चिंतीत होता. मुलीही भयभीत होतात. त्यामुळे मुलींनी गर्ल्स हॉस्टेल निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. खालील गोष्टींची काळजी घेतली तर त्यांची सुरक्षा चांगली राहू शकते.

1- जर तुम्हाला कँपसमध्ये हॉस्टेल मिळालं नाही आणि तुम्ही पीजी किंवा फ्लॅटमध्ये राहण्याचा विचार करत असाल तर नेहमी वस्तीच्या ठिकाणीच रुम घ्या. कुटुंब असणाऱ्या ठिकाणीच रुममध्ये राहा.

2- ज्या मुली किंवा महिलेसोबत हॉस्टेल, फ्लॅट किंवा पीजी रुम शेअर करत आहात, तिची ओळख असेल तर अधिक चांगलं. तिची माहिती असेल तर सर्वात उत्तम. जर मुलगी अनोळखी असेल तर काही दिवस सावध राहा.

3- रुममेटसोबत काही नियम ठरवून घ्या. अनेकदा गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुलंही येतात. अशा गोष्टी चालणार नाहीत, हे तुम्ही तुमच्या रुममेटला स्पष्टपणे सांगून टाका.

4- रुममेटच्या बाबतची बेसिक माहिती मिळवा. ती कुठून आली, ती कुठे शिकत होती, तिचे कुटुंबीय काय करतात, तिचा स्वभाव कसा आहे याची माहिती घ्या.

5- तुमच्या परवानगीशिवाय कुणालाही तुमचा फोटो घेऊ देऊ नका. तुमचा व्हिडीओ बनवू देऊ नका. चांगली मैत्री झाल्यावरही फोटो आणि व्हिडीओ काढण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर नंतर त्रास होऊ शकतो.

6- तुमचं कोणी रेकॉर्डिंग वा शुटिंग करत असेल तर त्याची लगेच तक्रार करा. मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहू नका.

7- शाळा, कॉलेज किंवा हॉस्टेलच्या कँपसमध्ये जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसतील तिथे एकट्या फिरू नका. वॉर्डनच्या नियमाचं पालन करा.

8- तुमच्या हॉस्टेलमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल किंवा तुम्ही बाहेरून जेवण मागवत असाल तर बाहेरच्या व्यक्तीला तुमची डिटेल्स देऊ नका.

9- हॉस्टेल निवडताना लायब्ररी किंवा क्रीडाशी संबंधित गोष्टी कँपसमध्ये असायला हव्यात याची खबरदारी घ्या. त्यामुळे बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. वेळही वाचेल.

10- हॉस्टेलच्या बाहेर चांगली कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा बाहेरून यायचं असेल तर त्याची सुविधा हॉस्टेलपर्यंत असली पाहिजे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.