डिजिटल अरेस्ट कशी केली जाते?, कसं रचलं जातं जाळं?, काय आहे खेळ?; A to Z डिटेल्स घ्या जाणून

डिजिटल अटक हा फसवणुकीचा एक नवा प्रकार असून त्यामध्ये पोलीस अथवा सरकारी अधिकाऱ्यांचा वेश धारण किंवा भासवून लोकांना धमकावले जाते आणि त्यांच्याकडून पैसे लुटले जातात. त्यामुळेच डिजिटल अरेस्ट म्हणजे काय याची ओळख, त्याचे प्रकार, त्यापासून बचाव कसा करावा आणि तक्रार कशी करावी याची संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे. सतर्कता आणि जागरूकताच या फसवणुकीपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.

डिजिटल अरेस्ट कशी केली जाते?, कसं रचलं जातं जाळं?, काय आहे खेळ?; A to Z डिटेल्स घ्या  जाणून
डिजीटल अरेस्टImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 4:39 PM

देशभरात सायबर क्राईम वेगाने वाढत आहे. त्यातच आता गुन्हेगारीचा डिजिटल अरेस्ट हा नवा प्रकारही समोर आला आहे. डिजिटल अरेस्टच्या द्वारे कोट्यवधी रुपयांची लूट केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिजिटल अरेस्टच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी अशा स्कॅमपासून सावध राहण्याचे आवाहन देशवासियांना केलं आहे. डिजिटल अरेस्ट काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? डिजिटल अरेस्ट कसं ओळखायचं हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला याबाबतची ए टू झेड माहिती देणार आहोत.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

डिजिटल अरेस्ट हा एक सायबर स्कॅम आहे. डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये फोन करणारे पोलीस, सीबीआय, नार्कोटिक्स, आरबीआयचे अधिकारी किंवा दिल्ली, मुंबईचे अधिकारी असल्याचं भासवतात. समोरच्या व्यक्तीसोबत थेट आणि आत्मविश्वासाने बोलतात. जेव्हा व्हॉट्सअप किंवा स्काइप कॉल कनेक्ट होतो, तेव्हा ते फेक अधिकारी तुम्हाला खरे वाटू लागतात. ते पीडित व्यक्तीला इमोशनली आणि मेंटली टॉर्चरही करू शकतात. त्यांच्या कुटुंबीयांसोबत काही तरी वाईट झाल्याचं सांगत त्यांना भीत दाखवू शकतात. समोरचा अधिकारी वर्दीत असल्यामुळे लोक घाबरतात आणि त्यांच्या जाळ्यात फसतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिजिटल अरेस्टमध्ये बोगस सरकारी अधिकारी बनून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लोकांना धमकावून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली जाते.

डिजिटल अरेस्टचा खेळ कसा खेळला जातो?

अनोळखी नंबरवर व्हिडिओ कॉल येतो

कुणी तरी एखाद्या प्रकरणात अडकल्याची किंवा पकडला गेलाय अशी माहिती दिली जाते

धमकी देऊन व्हिडीओ कॉलवर येण्यासाठी भाग पाडलं जातं

स्कॅमर्स मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्सचा धंदा किंवा अन्य गुन्ह्यांचे आरोप ठेवतात

कुटुंबातील कुणालाही याची माहिती देण्यास मज्जाव केला जातो, तसं धमकावलं जातं.

व्हिडीओ कॉल करणाऱ्याचा बॅकग्राऊंड पोलीस स्टेशन सारखा असतो.

पोलीस आपली ऑनलाईन चौकशी करत असल्याचं पीडित व्यक्तीला वाटतं.

केस बंद करण्यासाठी किंवा अटक टाळण्यासाठी मोठी रक्कम मागितली जाते.

डिजिटल अरेस्ट झाली हे कसं ओळखाल?

डिजिटल अरेस्ट झालीय हे ओळखण्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. तुम्हाला अनोळखी नंबरवरून फोन आला किंवा व्हॉट्सअप कॉल आला तर मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवा

मुंबई पोलिसांच्या सूचना काय?

पोलीस अधिकारी आपली ओळख दाखवण्यासाठी कधीच व्हिडीओ कॉल करत नाहीत.

पोलीस अधिकारी कधीच तुम्हाला कोणतंही ॲप डाऊनलोड करायला सांगत नाहीत.

ओळखपत्र, एफआयआर कॉपी आणि अटक वॉरंट ऑनलाईन शेअर केलं जात नाही.

पोलीस अधिकारी कधीच व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलवर साक्ष नोंदवत नाहीत.

पोलीस अधिकारी पर्सनल कॉलवर पैसे किंवा पर्सनल माहितीसाठी कधीच धमकावत नाहीत.

पोलीस हे एखादा कॉल केल्यावर त्या व्यक्तीला इतरांशी बोलण्यापासून रोखत नाहीत.

मुख्य बाब म्हणजे कायद्यात डिजिटल अरेस्टची कोणतीच तरतूद नाहीये, गुन्हा झाल्यावर खरोखरची अटक केली जाते.

बचाव कसा करायचा ?

भारतीय कॉम्प्युटर आपत्कालीन प्रतिक्रिया टीमने लोकांना डिजिट अरेस्टपासून वाचण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व दिले आहेत. डिजिटल अरेस्टपासून कसं वाचायचं हे सीआयआरटीने सांगितलं आहे.

1. सतर्क रहा, सुरक्षित राहा

कोणत्याही सरकारी चौकशी यंत्रणा व्हॉट्सअप आणि स्काईप सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत नाही. तर ऑनलाईन फसवणूक करणारे त्याचाच वापर करत आहेत. सुरुवातीला संशय आल्यावर लगेच फोन कट करा. फोनवर दीर्घकाळ बोलू नका.

2. दुर्लक्ष करा

डिजिटल अरेस्टसाठी फसवणूक करणारे पीडितांना फोन कॉल, ईमेलद्वारे संदेश पाठवतात. मनी लॉन्ड्रिंग किंवा चोरीचे तुमच्यावर आरोप असल्याचं सांगतात. त्यासाठी तुमची चौकशी होत असल्याचं सांगतात. पण तुम्ही अशा कोणत्याही कॉल किंवा ईमेलकडे लक्ष देऊ नका.

3. घाबरू नका

सायबर फसवणूक करणारे अटक करण्याची किंवा कायदेशीर काराई करण्याची धमकी देतात. त्यांच्या बोलण्याने आणि युक्त्यांमुळे तुम्हाला भीती वाटू शकते. पण घाबरू नका. बँक डिटेल्स किंवा यूपीआय आयडी त्यांना शेअर करू नका.

4. घाई करू नका

कॉल किंवा व्हिडीओ कॉल आल्यास फसवणूक करणाऱ्यांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तरे देऊ नका. शांत राहा. केवळ ऐका. अनोळखी नंबरवरून साधा कॉल जरी आला तरी तुमची डिटेल्स त्यांना देऊ नका.

5. पुरावे गोळा करा

कॉलचे स्क्रीनशॉट किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग सेव्ह करा. गरज पडल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.

6. फिशिंगपासून सावध राहा

फोनशिवाय ईमेलद्वारे संदेश पाठवले जातात. ते अविश्वसनीय वाटतात. ही फिशिंगचे प्रकरण आहे. हे ठग तुमच्या कॉम्प्युटरपर्यंत पोहोचून व्यक्तीगत माहिती घेतात.

7. फसवणुकीची तक्रार करा

जर तुमची फसवणूक झाली असेल किंवा होत असेल तर लगेच सायबर क्राईमच्या हेल्पलाईन 1930 वर किंवा वेबसाइट cybercrime.gov.in वर तक्रार करा.

बनावट कॉलची तक्रार करता येते?

बनावट कॉल्स आणि मेसेजेसची ऑनलाइन तक्रार केली जाऊ शकते. टेलिकॉम विभागाने व्हॉट्सअॅपवरील बोगस कॉल्स आणि मेसेजेस रोखण्यासाठी ‘चक्षु’ (Chakshu) नावाचे एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आपण स्पॅम कॉल्स, मेसेजेस आणि व्हॉट्सॲपवरील बनावट कॉल्स किंवा मेसेजेसची तक्रार करू शकता.

चक्षु पोर्टलवर तक्रार कशी कराल?

सर्वप्रथम, संचार साथी पोर्टलची अधिकृत वेबसाइट (sancharsaathi.gov.in) वर जा.

‘सिटीझन सेंट्रिक सर्व्हिसेस’ (Citizen Centric Services) वर क्लिक करा.

‘रिपोर्ट सस्‍पेक्‍टेड फ्रॉड कम्युनिकेशन’ (Report Suspected Fraud Communication) वर क्लिक करा.

त्यानंतर ‘कंटीन्यू फॉर रिपोर्टिंग’ (Continue For Reporting) ऑप्शनवर जा.

एक फॉर्म पेज उघडेल, त्यामध्ये बोगस कॉल किंवा मेसेजची माहिती भरा.

फॉर्ममध्ये एक फ्रॉड लिस्ट दिसेल. त्या लिस्टमधून आपल्या तक्रारीवर क्लिक करा.

फेक कॉल किंवा मेसेजचा स्क्रीनशॉट देखील अपलोड करा.

नंतर आपला मोबाइल नंबर आणि नाव भरा.

कॅप्चा कोड आणि OTP व्हेरिफिकेशन झाल्यावर फॉर्म सबमिट करा.

महाराष्ट्र पोलिसांची वैधानिक सूचना :

डिजिटल अरेस्ट, बोगस मॅट्रिमोनियल वेबसाइट्स, डेटिंग ॲप्स, केवायसी, ओटीपी, क्यूआर कोड आणि व्हॉट्सॲप, टेलिग्राम, रोजगार साइट्सच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क रहा.

डिजिटल अरेस्टमुळे किती नुकसान?

गृह मंत्रालयाच्या सायबर विंगनुसार, डिजिटल अरेस्टद्वारे सायबर फसवणूक करणारे दररोज 6 कोटी रुपये लुटत आहेत. यावर्षी ऑक्टोबरपर्यंत डिजिटल अरेस्टच्या 92,334 प्रकरणांमध्ये 2140 कोटी रुपयांपेक्षा अधिक फसवणूक झाली आहे. प्रत्येक महिन्याला सुमारे 214 कोटी रुपयांची सायबर फसवणूक होत आहे. समाजात बदनामी होईल किंवा आपलं नाव खराब होईल या भीतीपोटी अनेकजण तक्रारी करत नाहीत. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचं समजून येत नाहीत. ज्यांच्या तक्रारी येतात त्यावरून डिजिटल अरेस्ट क्राईम किती मोठ्या प्रमाणात पसरत आहे, हे दिसून येतं.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.