जिवंत माणूस पाण्यात बुडतो, मग डेडबॉडी कशी तरंगते ? काय आहे कारण ?; खाजवा डोकं

पण एखादा जिवंत माणूस पाण्यात पडला तर तो बुडतो, पण मृत्यू झाल्यावर डेडबॉडी मात्र पाण्यावर तरंगते, हे कसं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का ? शरीर तर तेच असतं, वजनही तेच... मग यामागे काय कारण ?

जिवंत माणूस पाण्यात बुडतो, मग डेडबॉडी कशी तरंगते ? काय आहे कारण ?; खाजवा डोकं
जिवंत माणूस पाण्यात बुडतो, मग मृतदेह कसा तरंगतो ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 11:45 AM

एखाद्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी आपण ऐकतो. आपल्यापैकी काही लोकांनी मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिला असेल, किंवा एखाद्या व्यक्तीचा मृतदेह नदीच्या पाण्यात सापडला अशी बातमीही ऐकली असेल. कोरोना काळात देशातील काही नद्यांमध्ये अनेक मृतदेह तरंगताना दिसले, त्याचीही बरीच चर्चा झाली. पण एखादा जिवंत माणूस पाण्यात पडला तर तो बुडतो, पण मृत्यू झाल्यावर डेडबॉडी मात्र पाण्यावर तरंगते, हे कसं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का ?

जिवंत व्यक्ती पाण्यात असेल, तर पाण्याच्या वर राहण्यासाठी, तरंगण्यासाठी मेहनत करावी लागते, हात-पाय मारावे लागतात. यामागे काही खास कारण आहे की तो एखादा चमत्कार आहे. ? यामागे खरंतर वैज्ञानिक कारण आहे.

हे आहे कारण

खरंतर एखादी वस्तू पाण्यावर तरंगेल की नाही हे तिच्या घनतेवर अवलंबून असतं. आणि पाण्याच्या वर राहण्यासाठी ती ( वस्तू) तिच्या आजूबाजूने किती पाणी बाजूला करते यावरही ते निर्भर असतं. ज्या वस्तूची घनता जास्त असते ती पाण्यात बुडते. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या शरीराची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात बुडते तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी त्याच्या फुफ्फुसात जाते. त्यामुळेच मनुष्याचा मृत्यू होतो.

मात्र लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, माणसाचा मृत्यू होताच, त्याचं शरीर पाण्याच्या वर न येता, एकदम तळापर्यंत जातं.

म्हणून ती वस्तू तरंगू लागते

आर्किमिडीज या शास्त्रज्ञाच्या सिद्धांतानुसार, एखादी वस्तू पाण्यामध्ये बुडते जेव्हा ती त्याच्या वजनाइतकी पाण्याचे विस्थापन करू शकत नाही. त्या वस्तूने विस्थापित केलेल्या पाण्याचे वजन कमी असल्यास ती वस्तू पाण्यात तरंगत राहते.

मृत्यू झाल्यावर शरीर पाण्यावर का तरंगतं ?

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराच्या गॅस तयार होऊ लागतो, ज्यामुळे त्याचे शरीर पाण्यात सूजू लागते. सूज झाल्यामुळे शरीराची मात्रा वाढते आणि घनता कमी होते. अशा स्थितीत मृतदेह वर येतो आणि पाण्यावर तरंगू लागतो.

मृत शरीरात कोणता गॅस तयार होतो ?

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती काम करणे थांबवते. शरीराचे विघटन होऊ लागते. मृत शरीरातील बॅक्टेरिया त्याच्या पेशी आणि ऊती नष्ट करू लागतात. जीवाणूंमुळे शरीरात मिथेन, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजनचा समावेश असलेल्या विविध वायूंचा समावेश होतो. हा वायू तयार होऊन बाहेर पडल्यावर तो तरंगू लागतो. पाण्यात बुडल्यावर शरीर लगेच वरती येत नाही, त्याला काही कालावधी किंवा काही दिवस लागू शकतात.

बऱ्याच गोष्टी पाण्यावर का तरंगतात ?

साधारणत: आपल्याला पाण्यावर अनेक गोष्टी तरंगताना दिसतात. लाकूड,कागद, पानं वगैरे गोष्टी. बर्फही अशी गोष्ट आहे जी पाण्यात बुडत नाही. जड वस्तू पाण्यात बुडतात, परंतु हलक्या वस्तू पाण्यात तरंगतात हाँ सामान्य नियम आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.