स्पेसमध्ये राहिल्याने अॅस्ट्रोनटचं वय थांबत का?, तो म्हातारा होत नाही का ? संशोधनात झाला खुलासा
आईन स्टाईनचा सापेक्षता वादाचा सिद्धांत तुम्ही शाळेत वाचला असेल...प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जगात कोणीही प्रवास करु शकत नाही. जर एखाद्याने प्रकाशाच्या वेगाहून अधिक वेग धारण केला तर आपण काळाला थांबवू शकतो किंवा काळाच्या मागेही जाऊ शकतो....अंतराळात वय खरंच थांबतं का याची पडताळणी करण्यासाठी संशोधकांनी दोन जुळ्या भावांवर प्रयोग केला...
अंतराळात राहिल्याने अंतराळवीराचे वय थांबत का ? ते लवकर म्हातारे होत नाहीत हे खरं आहे का ? यासाठी संशोधन करण्यात आले होते. साल 2015 रोजी याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेला. यासाठी दोन भावांना सुमारे वर्षभर प्रयोग करण्यात आले होते. यासाठ दोन जुळ्या भावांना निवडण्यात आले होते. एक संशोधन करण्यात आले. त्यात एका भावाला एक वर्षभरासाठी स्पेसमध्ये पाठविण्यात आले. आणि दुसरा भाऊ येथेच पृथ्वीवर राहीला. तुम्ही इंटरस्टेलर चित्रपट जर पाहीला असेल किंवा अंतराळातील घडामोडींमध्ये विश्वास असेल तर हा ख्रिस्टोफर नोलन यांचा चित्रपट जरुर पाहावा. साल 2014 मध्ये आलेल्या या चित्रपटाने अंतराळातील रहस्य आणि रेलेव्हिटी महान संशोधक शास्रज्ञ आईन स्टाईन यांच्या सापेक्षता वादाचा सिद्धांत दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात स्पेस, टाईम ट्रॅव्हल आणि ग्रॅव्हीटीचे अनेक सिद्धांत दाखविले आहेत.
या चित्रपटाचा नायकाला अंतराळात पाठवितात. ज्यावेळी तो खाली पृथ्वीवर परततो तेव्हा त्याची पृथ्वीवरील मुलगी म्हातारी झालेली असते. त्याचे मात्र वय वाढलेले नसते.त्यामुळे खरच अंतराळात वय वाढत नाही का याची पडताळणी करण्यासाठी हा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात विज्ञान काय म्हणजे ते पाहूयात…
संशोधनात काय पुढे आले….
साल 2015 मध्ये या गहन प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जुळ्या भावांवर संशोधन करण्यात आले होते. या संशोधनासाठी जुळ्यांभावांपैकी एका भावाला वर्भभर स्पेसमध्ये पाठविण्यात आले होते. तर दुसरा भाऊ पृथ्वीवरच ठेवण्यात आले होते. या संशोधनासाठी 12 युनिव्हर्सिटीचे 84 संशोधक काम करीत होते. साल 2019 मध्ये संशोधनाचे निष्कर्ष जेव्हा सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
काय आला परिणाम
दोन्ही जुळ्या भावांपैकी एक स्कॉट यांना जेव्हा स्पेसमध्ये पोहचले तेव्हा त्याच्या शरीरातील एक हजाराहून जीन्समध्ये बदल झाला. या एक हजार बदलांपैकी एक सर्वात मोठा बदल म्हणजे टेलोमेयरमध्ये पाहायला मिळाला. टेलोमेयर हे क्रोमोझोमच्या मुळांमध्ये मधील एक प्रोटीन असते. पृथ्वीवरील माणसाच्या शरीरातील टलोमेयरमुळे काळानुरुप डीएनए लहान होऊ लागतो. यामुळे पेशीत म्हातारपणाचे बदल दिसतात. त्यामुळे माणसात वृद्धत्वाचे बदल घडतात. परंतू स्कॉट याच्या शरीरात असा काही बदल झाला नाही. तो त्याच वेळी पृथ्वीवरील त्याच्या भावाच्या तुलनेत तरुण दिसू लागला. स्कॉटच्या जीन्स ( गुणसूत्रं ) मध्ये सुमारे 91.3 टक्के बदल दिसला.
पृथ्वीवर आल्यानंतर काय ?
परंतू हे बदल जेवढ्या वेगाने झाले होते. ते पृथ्वीवर आल्यानंतर पुन्हा नष्ट होत सहा महिन्यात स्कॉट पुन्हा आपल्या भावासारखाच दिसू लागला. अंतराळात स्कॉट आपल्या जुळ्या भावा पेक्षा तरुण दिसत होता. तोच स्कॉटनंतर पृथ्वीवर आल्यानंतर सहा महिन्यातच भावासारखाच म्हातारा दिसू लागला आणि काही काळानंतर त्यांचा डीएनए देखील पुन्हा नॉर्मल पृथ्वीवरील माणसांसारखा दिसू लागला.