असे 5 पदार्थ जे कधीच पुन्हा गरम करुन खायचे नाहीत? का? वाचा एका क्लिकवर
पदार्थ गरम करुन खाल्ल्यास ते आरोग्याला घातक ठरु शकतात. त्यामुळे खाणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते. म्हणूनच हे पदार्थ कोणते आणि ते का खाऊ नये याचा हा खास आढावा.
1 / 6
जेवण फेकून देऊ नये असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच शिल्लक राहिलेले पदार्थ गरम खाणं भारतात अगदी सर्वमान्य आणि सगळीकडेच आढळतं. यामागे अन्न हे परब्रम्ह म्हणत त्याला अधिक महत्त्व देणं आणि बचतीचाही हेतू असतो. मात्र, अशाप्रकारे पदार्थ गरम करुन खाल्ल्यास ते आरोग्याला घातक ठरु शकतात. त्यामुळे खाणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते. म्हणूनच हे पदार्थ कोणते आणि ते का खाऊ नये याचा हा खास आढावा.
2 / 6
संग्रहीत छायाचित्र
3 / 6
कच्चा तांदुळात शरीराला पोषक जीवाणू असतात. तांदुळ शिजवून भात केल्यानंतरही ते भातात तसेच राहतात. त्याचा शरीराला फायदा होतो. मात्र, हाच भात पुन्हा गरम करुन खाल्ल्यास या जीवाणूंचं रुपांतर विषाणूत होतं आणि ते शरीराला अपायकारक ठरु शकतात. त्यामुळे शरीरात अन्न विष बाधा म्हणजेच फूड पॉईजनिंग होऊ शकते.
4 / 6
अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने (प्रोटीन) असतात. जेव्हा अंडे वारंवार उष्णतेच्या संपर्कात येतात तेव्हा प्रोटीनला बाधा होते. त्यामुळे अंडे गरम केल्यानंतर लवकरात लवकर खावं असं सांगितलं जातं. थंड झाल्यानंतर ते तसेच थंड खावेत. पुन्हा गरम केल्यास अंड्यातील प्रोटीनसोबतच्या नायट्रोजनमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.
5 / 6
चिकन हा पदार्थही वारंवार गरम करुन खाऊ नये. चिकन वारंवार गरम केल्यास त्यातील प्रोटिन कम्पोझिशनची संरचना पूर्णपणे बदलते. गरम केलेलं चिकन खाल्यास अन्न पचनातही अडथळे निर्माण होतात.
6 / 6
मशरूम देखील शिजवल्यानंतर तात्काळ खावं. थंड झालं म्हणून मशरुम पुन्हा गरम करुन खाऊ नये. मशरूम दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेऊ नये. कारण त्यात असे काही घटक असतात जे पचन प्रक्रियेला बाधा निर्माण करतात. शिल्लक राहिलेले मशरूम गरम न करता थंडच खाल्ले पाहिजे.