भारतीय सैन्यात नेहमीच आपल्या गोटा मध्ये नवीन नवीन मिसाईलचा समावेश करत असतो. शत्रू राष्ट्र पासून सुरक्षा मिळवण्यासाठी किंवा आपले लक्ष बळकट मजबूत बनवण्यासाठी वेगवेगळे शस्त्र अस्त्र नेहमी तयार करत असतो. भारतीय सेने कडे अनेक मिसाईल आहेत. या सगळ्या मिसाईलने आता पर्यंत उत्तुंग कामगिरी केली आहे. ओडिशा येथील बालासोर (Balasore) मध्ये इंटीग्रेटेड टेस्ट रेंज द्वारे हवेत थेट निशाणा साधणाऱ्या मिसाइल (MRSAM) चे रविवार रोजी परीक्षण केले गेले. ही एक मध्यम रेंज असलेली मिसाइल आहे. या मिसाईलला भारतीय सेनेसाठी (Indian Army) तयार केले गेले आहे. आज मिसाइलचे परीक्षण केल्यानंतर हे परीक्षण सफल झाले आहे. टेस्टिंग दरम्यान या मिसाइलने आपले टार्गेट काही मिनिटांमध्येच उद्ध्वस्त केले आणि अपेक्षित रिझल्ट देखील मिळवला.
या मिसाइलची निर्मिती रक्षा अनुसंधान आणि विकास संगठन (DRDO) ने इस्त्राईल एयरोस्पेस इंडस्ट्री (IAI) कंपनी या दोघांनी मिळून केली आहे. इस्त्राईल कडून भारताला मिळालेली बराक मिसाइल (Barak Missile) सुद्धा MRSAM (Medium Range Surface to Air Missile) पद्धतीची च आहे. हि मिसाइल जमिनीवरून थेट हवेत निशाणा साधते. हि मिसाईल इस्त्राईल मधील धोकादायक मिसाइल बराक-8 (Barak-8) च्या धर्तीवर बनवण्यात आली आहे.
The first launch was to intercept a medium-altitude long-range target and the second launch was for proving the capability of a low altitude short-range target: Defence Ministry
— ANI (@ANI) March 27, 2022
MRSAM चे वजन सर्वसाधारण पणें 275 किलो ग्रॅम आहे . या मिसाईलची लांबी 4.5 मीटर आणि व्यास 0.45 मीटर आहे .या विशेष अश्या मिसाइलवर 60 किलोग्रॅम चे शस्त्र (वॉरहेड) लोड केले जाऊ शकते. ही एक सेकंड स्टेज असणारी मिसाइल आहे,जे लॉन्च केल्यानंतर कमी धूर बाहेर सोडते.
MRSAM-Army missile system flight tested from ITR Balasore at around 1030 Hrs intercepting a high speed aerial target at long range. The target was destroyed by the missile in a direct hit.@PMOIndia @DefenceMinIndia @SpokespersonMoD @adgpi pic.twitter.com/Ra5yfHaHo1
— DRDO (@DRDO_India) March 27, 2022
लाइव मिंट रिपोर्ट नुसार, हे मिसाईल 70 किलोमीटर पर्यंतच्या रेंज मध्ये येणाऱ्या टारगेट ला उद्ध्वस्त करू शकतं, असं डीआरडीओनं म्हटलं आहे. या मिसाइलची गती प्रचंड वेग घेणारी आहे. भारताची ही मिसाईल 2,448 किलोमीटर प्रति तास वेगाने शत्रूवर हल्ला साधू शकते. फक्त गतीच नाही तर या मिसाइलचे खूप सारे विशेष गुणधर्म आहेत. जर शत्रु आपल्या मिसाईल मध्ये रेडिओ फ्रीविन्सीचा वापर करत असेल तर समोरील शत्रूला गाफील ठेवून शत्रूवर हल्ला देखील हे मिसाईल करु शकते. या विशेष गुणामुळे हे मिसाईल भारतीय सेनेसाठी खूपच लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर भारतीय सेनेच्या शस्त्रसाठयामध्ये देखील नव्याने आलेल्या या मिसाईलमुळे भारतीय सैन्यात अजून एका मिसाईल ची भर झाली आहे.
Two launches of MRSAM Army version for two different ranges conducted successfully proving the system capability and performance@PMOIndia @DefenceMinIndia @SpokespersonMoD @adgpi https://t.co/UUEhElNjY6 pic.twitter.com/S2FE3Cc3un
— DRDO (@DRDO_India) March 27, 2022
Pan card वापरुन भलत्याच कुणीतर कर्ज काढलं? अनेकांसोबत असं घडलंय, तुम्हीही वेळीच खात्री करुन घ्या!
आमदार मालामाल जनता कंगाल, राज्यातील आमदरांना काय काय मिळतं?
जर एखाद्या चित्रपटात चुकीची माहिती दाखवली गेल्यास काय करतात, कायद्याच्या आधारे करू शकता तक्रार!…