Periods Celebration : लेकीच्या पहिल्या पीरियडबद्दल वडिलांनी दिली पार्टी, जाणून घ्या जगभरात कुठे-कुठे करतात सेलिब्रेशन ?
उत्तराखंडमध्ये संगीत शिक्षक असणाऱ्या जितेंद्र भट्ट यांनी मुलगी पहिल्यांदा ऋतूमती झाल्यावर एक नवी सुरूवात केली. त्यांनी हे सेलिब्रेट करत सर्वांना पार्टी दिली. पीरियड्स सुरू झाल्यावर देश आणि जगभरात कुठे कसे सेलिब्रेशन होते, ते जाणून घेऊया.
Periods Celebration in India : उत्तराखंडच्याल उधम सिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथील एक कुटुंब सध्या बरंच चर्चेत आलं आहे. तेथे संगीत शिक्षक असणारे जितेंद्र भट्ट यांनी एक नवी सुरूवात केली आहे. त्यांच्या मुलीला पहिल्यांदा पाळी (periods) आल्याचे त्यांनी सेलिब्रेशन केले आहे. तो दिवस त्यांनी छान साजरा (Periods Celebration) करत रुढी-परंपरा तोडल्या. आजही उत्तर मध्य भारतातील अनेक भागांमध्ये, मासिक पाळीविषयी चर्चा करणे तर दूरच राहिलं, काही घरांमध्ये ते पाच दिवस महिला आणि मुलींसाठी अपवित्र मानले जातात. त्यांना स्वयंपाकघरापासून ते पूजा करण्यापर्यंत सर्व कामांपासून दूर ठेवलं जातं.
मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा आणि अभिन्न हिस्सा आहे. किशोरावस्थेत पाळी सुरू झाल्यानंतर वयाच्या 45-50 वर्षापर्यंत ती चालू राहते. दर महिन्याला चार- ते पाच दिवस पाळी येते. मासिक पाळी आल्यावर देशभरात आणि जगाच्या विविध भागात हे कसे सेलिब्रेट केले जाते, ते जाणून घेऊया.
कुठे ऋतू कला संस्कार तर कुठे प्रथमच नेसतात साडी
देशातील दक्षिण भारतीय राज्यांमध्ये प्रथ मासिक पाळी आल्याचे साजरं केलं जातं. अनेक लोक तो उत्साहाने साजरा करतात. तेथे पूजा, पार्टी सगळं काही करण्याची परंपरा आहे. जगातील अनेक भागांतही हे लपवलं जात नाही, त्याबद्दल उघडपणे बोललं जातं. पण काही ठिकाणी रुढी-परंपरांचे पालन करतात, पाळीला अपवित्र मानलं जातं.
दक्षिण भारतीय राज्यांबदद्ल जाणून घेऊया. येथे हा प्रसंग उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. त्याची वेगवेगळी नावं आहेत. काही हिंदू कुटुंबे ऋतू कला संस्कार सोहळा साजरा करतात. त्याला ऋतूशुद्धी असेही म्हणतात.
दक्षिण भारतात, पहिल्यांदा पीरियड आल्यावर साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवाला हाफ साडी फंक्शन म्हणतात.
जेव्हा मुलीला पहिली मासिक पाळी येते तेव्हा हे साजरं केलं जातो. त्या दिवशी मुलीला पहिल्यांदा साडी नेसवली जाते. अनेक भागात याला हाफ साडी फंक्शन असेही म्हणतात. आजही या निमित्ताने लोक आपापल्या कुवतीनुसार कार्यक्रम आयोजित करतात. या समारंभात मुलीसाठी पहिली साडी तिचे मामा आणतात. या सेलिब्रेशनसाठी मित्र आणि नातेवाईकांना देखील आमंत्रित केले जाते. लोकं वेगवेगळी गिफ्ट्सही देतात. या समारंभात बहुतांश महिला सहभागी असतात.
मोरक्को ते जपानपर्यंतही होतं सेलिब्रेशन
लॅटिन अमेरिकन देशांमध्ये याकडे एक उत्सव म्हणून पाहिले जाते. मोरोक्को मध्येही हे साजरं केलं जातं. या सणात सहभागी असलेले कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी मुलीला भेटवस्तू देतात. जपानमध्ये, लाल रंगाचे तांदूळ आणि बीन्स खाऊन प्रथम मासिक पाळी साजरी केली जाते. या डिशला सेकिहान म्हणतात.
वेगवेगळ्या धर्मात काय आहेत परंपरा ?
वेगवेगळ्या धर्मात याकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले जाते. शीख धर्मात मासिक पाळी अशुद्ध मानली जात नाही. या दरम्यान त्यांच्यावर कोणतेही बंधनही घातले जात नाही. तर जैन धर्मात, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये, स्त्रियांना विश्रांती घेण्याचा आणि कोणत्याही धार्मिक विधींमध्ये भाग न घेण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू धर्मात या बाबतीत मुली आणि स्त्रियांना वेगळी वागणूक दिली जाते. काही ठिकाणी पहिल्या पिरियड्सचे सेलिब्रेशन केले जाते तर काही ठिकाणी या काळात महिलांना स्वयंपाक करण्यापासून तसेच पूजा करण्यापासून रोखले जाते. बौद्ध धर्मातही विविधता आहे पण मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला जातो. ख्रिस्ती धर्मात या काळात महिलांना येशू ख्रिस्ताला स्पर्श करण्यास बंदी असते.
पण अनेक भागांत पूजेत सहभागी होण्यास मनाई नसते. चीनमध्ये, मासिक पाळीत मूर्तींना स्पर्श करणे, प्रसाद अर्पण करणे आणि पूजा करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
या देशात मासिक पाळीच्या कालावधीत वापरली जाणारी उत्पादने फ्री आहेत.
मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. सर्वांना याबद्दल माहीत आहे, मात्र तरीही या मुद्यावर अजून बरंच काम बाकी आहे. या प्रकरणात, स्कॉटलंड हा जगातील पहिला देश आहे, ज्यांनी पुढाकार घेतला. या देशात पीरियडच्या काळात वापरली जाणारी उत्पादने मोफत मिळतात.
तर अमेरिकेतील काही शाळांमध्ये मासिक पाळीबद्दल शिक्षण दिलं जातं . अनेक देशांमध्ये मासिक पाळीच्या काळात मोठ्या संख्येने मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे पुरेसे सॅनिटरी पॅड उपलब्ध नसतात. या विषयावर अद्याप बरेच काम बाकी आहे.