GK Quiz : नाव विचारलं तर सांगितलं WV733N, तुम्हाला ओळखता आलं का ?
जनरल नॉलेज अर्थात सामान्य ज्ञान म्हणजे आजूबाजूच्या प्रत्येक विषयाशी निगडीत ज्ञान, ते फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नव्हे तर आपल्या रोजच्या आयुष्यातही महत्वाचं असतं. आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय, काय होतंय याची माहिती सर्वांना असणे गरजेचं आहे.

Quiz Questions and Answers : जनरल नॉलेज अर्थात सामान्य ज्ञान म्हणजे आजूबाजूच्या प्रत्येक विषयाशी निगडीत ज्ञान, ते फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नव्हे तर आपल्या रोजच्या आयुष्यातही महत्वाचं असतं. आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय, काय होतंय याची माहिती सर्वांना असणे गरजेचं आहे. त्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बरेच काही यासह विषयांची मालिका समाविष्ट आहे.
आपलं जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान चांगलं असणं महत्वाचं असतं कारण त्यामुळे जगाची चांगली समज होते. तसेच त्यामुळे आजूबाजूच्यांशी अर्थपूर्ण संभाषण राखता येतं. या ज्ञानाने आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदतही होते. पुस्तकं, वर्तमानपत्रं वाचून,बातम्या पाहून आणि चालू घडामोडींबाबत अपडेट घेऊन हे साध्य करता येतं.
जनरल नॉलेजचे असेच काही प्रश्न आपण जाणून घेऊया. त्यातील किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहे, तेही चेक करता येईल.
प्रश्न 1 – माणसाचं हृदय 1 मिनिटांत किती वेळा धडधडते?
उत्तर – मानवी हृदय 1 मिनिटात 72 वेळा धडकते.
प्रश्न 2 – पत्ते खेळण्याचा शोध कोणत्या देशात लागला ?
उत्तर – 9व्या शतकात चीनमधील तांग राजवंशाच्या काळात, राजा यिझोंगची मुलगी राजकुमारी तोंगचांग वेळ घालवण्यासाठी वेई कुळातील सदस्यांसोबत खेळत असे. पत्ते खेळण्याचा शोध चीनमध्ये लागला.
प्रश्न 3 – कोणत्या देशात एकही ट्रेन धावत नाही?
उत्तर – सीलँड आणि भूतानसह असे अनेक देश आहेत जिथे एकही ट्रेन धावत नाही.
प्रश्न 4 – जगातील सर्वात मोठे सिनेमागृह अर्थात मूव्ही थिएटर कुठे आहे?
उत्तर – जगातील सर्वात मोठे सिनेमागृह अर्थात मूव्ही थिएटर न्यूयॉर्क मध्ये आहे.
प्रश्न 5 – दूध कसे प्यावे, गरम की थंड?
उत्तर – उन्हाळ्यात थंड दूध पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
प्रश्न 6 – एका मुलीला नाव विचारलं, तर तिने सांगितलं WV733N, तुम्हाला याचा अर्थ कळला का ?
उत्तर – त्या मुलीचं नाव नीलम असेल. WV733N हे उलटं करून वाचलं तर ते NEELAM असं बनतं.