तुम्ही आणि तुमचे शेजारी कुत्रा पाळताहेत का? तर हे नियम माहीत असायलाच हवे
Pet Dogs Attack Video : समाज माध्यमातून पाळीव प्राण्यांनी केलेला हल्ला आणि पाळीव प्राण्यावर केलेल्या हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच बघायला भेटतात. पण, हे पाळीव प्राणी पाळण्यासाठी देखील सरकारने काहो नियम सांगितले आहे.
सामाजिक माध्यमातून (social media) पाळीव प्राण्याचे (pet animals) व्हिडिओ आपल्याला रोजच बघायला मिळतात. त्यात मग मांजर, कुत्रा, खार, ससा, पोपट, माकड इ. एवढेच नाही तर काही लोक चक्क सरडा( Lizard) देखील घरातल्या माणसाप्रमाणे ठेवत असल्याचे बघायला मिळते. त्यात लोकांचा सगळ्यात जास्त आवडीचा असलेला पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट, व्हाट्सएपच्या माध्यमातून कुत्र्याचे व्हिडिओ शेयर केले जातात. काही लोकांनी तर चक्क कुत्र्याच्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाउंट (instagram account) उघडून त्यावर रोजचे त्याचे फोटो किंवा व्हिडिओ टाकतात. पण याच समाज माध्यमातून आपल्याला कुत्र्याने माणसांवर केलेला हल्ला, इतर लहान प्राण्याला केलेली इजा बघायला मिळते. तर कधी पाळीव कुत्र्याने घरातल्या व्यक्तीवर, शेजारच्यावर हल्ला केल्याचे व्हिडिओ देखील बघायला मिळतात. कुत्र्यावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन वाद टोकाला गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पाळीव कुत्र्यासाठी सरकारने काही नियम बनवले आहे. जर तुम्ही किंवा तुमचे शेजारी कुत्रा पाळत असाल तर हे नियम तुम्हाला पाळणे अनिवार्य आहेत. भारत सरकारने पाळीव कुत्र्यासाठी बनवलेले
नियम खालीलप्रमाणे…
एनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया (animal welfare board of india) यांनी पाळीव कुत्र्यासाठी काही नियम बनवले आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे, जर कोणी घरमालक कुत्रा पाळत असेल आणि महानगरपालिकेचे कोणत्याही नियमाचे उल्लंघन न करता, शेजारच्यांना त्रास न देता. कुत्रा घरात ठेवत असेल तर तो कुत्रा पाळू शकतो. भारतीय संविधान आर्टिकल A(G) नुसार प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की तो प्राण्यांबद्दल दया, प्रेम दाखवू शकतो. त्याचबरोबर अधिनियम 1960 11(3) नुसार हाऊसिंग सोसायटीत (housing society) पाळीव प्राण्यांना पाळण्याचा अधिकार आहे. याशिवाय भाडेकरूदेखील घरात कुत्रा पाळू शकतो.
कुत्र्याचा भुकण्यांवरून (Dog barking ) आक्षेप घेतला जाऊ शकतो.
कुत्र्याच्या भुंकण्यावरुन वाद होतात. पण कुत्रा भुंकतो म्हणून त्याला घरात ठेवण्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. परंतु कुत्रा खूपच भुंकत असेल तर त्याच्यावर उपचार करणे हे मालकाचे काम आहे.
शेजारीचे (Neighbors) कसे करू शकता तक्रार?
खूप लोकांची समस्या असते की कुत्रा खूप जास्त भुंकत असेल ज्याने शेजारच्यांना त्रास होत असेल अशावेळी के करावे? यासाठी समोरच्या व्यक्तीला समज दिली जाते. जर तुम्हाला कोर्टात तक्रार करायची असेल तर ध्वनी प्रदूषण होत आहे म्हणून तक्रार करू शकतात. त्यात आवाज, घाणेरडा वास या तक्रारीचा समावेश असतो.
लिफ्ट आणि मैदानासंबंधी नियम
नियमानुसार पाळीव प्राण्याला लिफ्टने येण्या जाण्यास विरोध केला जाऊ शकत नाही. कोर्टाचे नियमात कुत्रा घरातीलच एक सदस्य आहे त्यामुळे त्याला लिफ्टने येण्या जाण्यास परवानगी आहे. पाळीव प्राण्यांसाठी सोसायटी वेगळे चार्जेस लावू शकत नाही. तसेच पाळीव प्राण्याला सोसायटीच्या गार्डनमध्ये घेऊन जाण्यासही कोणी थांबवू शकत नाही.