कमी गुंतवणुकीत मिळवा लाखोंचा नफा; पोस्टाच्या या अफलातून स्किम माहीत आहे का?
लेख पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांचा आढावा घेतो ज्या उच्च व्याजदर आणि सरकारी विश्वासार्हतेमुळे लोकप्रिय आहेत. PPF, SCSS, SSA, NSC आणि टाइम डिपॉझिटसारख्या योजनांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. या योजनांच्या कालावधी, गुंतवणुकीची मर्यादा आणि करसवलतींबद्दल माहिती यात समाविष्ट आहे. लेख शेवटी गुंतवणुकीच्या निर्णयासाठी स्वतःच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टांचा विचार करण्याचा सल्ला देतो.
सध्या प्रत्येकाला डबल नफा हवा असतो. त्यासाठी प्रत्येकजण विविध स्किममध्ये पैसा गुंतवत असतो. पोस्ट असो, एलआयसी असो की शेअर बाजार असो प्रत्येकजण भरवश्याच्या ठिकाणी पैसा गुंतवून दामदुप्पट पैसा घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण सर्वसामान्यांचा कल असतो तो पोस्ट ऑफिसच्या योजनांकडे. पोस्ट ऑफिसच्या योजनात अधिकाधिक पैसा गुंतवून अधिक पैसा कमावण्याचा सामान्यांचा कल असतो. त्याचं मुख्य कारणे म्हणजे उच्च व्याज दर आणि सरकारी संस्थेचे विश्वासार्हतेचे मूल्य. अशा प्रकारे, जे लोक बचत करण्याची इच्छा बाळगतात, त्यांच्यासाठी पोस्टऑफिसच्या काही योजनांचा विचार केला जातो. त्या योजना काय आहेत त्याची ही माहिती.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना म्हणजे PPF. दर वर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत PPF मध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. पाच वर्षांची योजनेची मुदत असली तरी, ती पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना ती 5 वर्षाने वाढवता येते. या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर इनकम टॅक्स कायदा 80-सी अंतर्गत कर सवलत देखील मिळू शकते.
सीनियर सिटीझन्स सेव्हिंग्स स्कीम (SCSS)
60 वर्षांच्या वयाच्या वरील व्यक्तींसाठी सरकारने खास तयार केलेली योजना म्हणजे SCSS. या योजनेत कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेंतर्गत 5 वर्षांचा कालावधी असतो, परंतु याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षांची मुदत वाढवता येते. या योजनेत देखील 80-सी अंतर्गत कर सवलत मिळू शकते.
सुकन्या समृद्धी अकाउंट (SSA)
मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे. सुकन्या समृद्धी योजना असं या योजनेचं नाव असून 10 वर्षांच्या वयाच्या खाली असलेल्या मुलींच्या नावावर या योजनेत अकाउंट उघडता येते. कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये दरवर्षी गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेत 8.50% वार्षिक व्याज दिले जाते. पण सरकार या योजनेचा व्याज दर दोनदा बदलू शकते.
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC)
किमान 1000 रुपये गुंतवणुकीसाठी सुरू होणारी योजना म्हणजे NSC. यामध्ये 5 वर्षांचा कालावधी असतो आणि या योजनेत उत्कृष्ट व्याज मिळते. यामध्ये देखील 80-सी अंतर्गत कर सवलत उपलब्ध असते.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 किंवा 5 वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते. कमीत कमी 1000 रुपये गुंतवणुकीसाठी सुरू करता येणारी ही योजना आहे. यामध्ये देखील 80-सी अंतर्गत कर सवलत उपलब्ध आहे.
इतर योजनाही उपलब्ध आहेत
या योजनांच्या व्यतिरिक्त, पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्र (KVP), मासिक उत्पन्न योजना (MIS) अशा इतर अनेक योजना देखील उपलब्ध आहेत. गुंतवणूक करण्याआधी, आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि गरजांनुसार सर्वात योग्य योजना निवडणे महत्वाचे आहे.