Hindi language : केवळ भारत नव्हे तर ‘या’ देशांमध्येही बोलली जाते हिंदी भाषा

मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भारतीय येथे राहतात. त्यामुळे हिंदी भाषेचा मोठा वापर येथे होत असतो. याबद्दल माहिती जाणून घेऊ या..

Hindi language : केवळ भारत नव्हे तर 'या' देशांमध्येही बोलली जाते हिंदी भाषा
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 3:17 PM

भारतात राहणाऱ्या बहुतांश लोकांना वाटतं की हिंदी भाषा (Hindi Language) फक्त आपल्याच देशात बोलली जाते. पण ही भाषा इतर काही देशांमध्येही बोलली जाते, हे तुम्हाला माहीत आहे का? हिंदी ही भाषा भलेही भारतात सर्वात जास्त बोलली जात असेल, पण जगात इतरही काही देश आहेत जिथे या भाषेचा वापर केला जातो. काही देशांमध्ये तर या भाषेला अधिकारिक भाषेचा म्हणजेच राजभाषेचा दर्जाही (Official language) देण्यात आला आहे. नेपाळ, फिजी, सिंगापूर, मॉरीशस यारखी अनेक ठिकाणे आपण फिरण्यासाठी जातो. या जागा विविधतेने, सौंदर्याने नटलेल्या आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक (Tourists) येथे येतात. मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भारतीय येथे राहतात. त्यामुळे हिंदी भाषेचा मोठा वापर येथे होत असतो. याबद्दल माहिती जाणून घेऊ या..

नेपाळ

डोंगर, दऱ्या आणि सौंदर्याने नटलेल्या नेपाळमध्ये बहुतांश भागात हिंदी भाषा बोलली जाते. जरी इथली राजभाषा ही नेपाळी असली, तरीही देशातील अनेक भागात लोक हिंदी भाषेतच संवाद साधतात.

फिजी

फिजी हा त्या देशांपैकी एक आहे, जिथे हिंदी भाषेला राजभाषेचा दर्ज देण्यात आला आहे. हे दक्षिण महासागरातील मेलोनेशियातील एक बेट आहे, जेथे लोक हिंदी बोलतात. ब्रिटिश राजवटीची झळ सोसणाऱ्या या देशाचे भारतीयांशी चांगले संबंध आहेत.

हे सुद्धा वाचा

सिंगापूर

आपल्यापैकी अनेक जण सिंगापूरला फिरायला गेले असतील. तेथील नयनरम्य दृश्य, विविधता, सौंदर्य पाहून अनेकांना आनंद झाला असेल. असे मानले जाते, की सिंगापूर जवळजवळ 500 वर्षांपासून ग्रेटर इंडियाचा एक भाग आहे आणि म्हणूनच भारतीय समुदायातील लोक मोठ्या संख्येने येथे वास्तव्यात आहेत. येथे तमिळ भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. प्रवासाच्या दृष्टीनेही हा देश एक उत्तम पर्यटनस्थळ मानला जातो.

मॉरीशस

भारतीयांसाठी हे ठिकाण एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. येथील हिंदी भाषेच्या चलनामुळे भारतीयांना येथे येणे आवडते. या देशात अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत आणि येथील बहुतेक लोक इंग्रजी बोलतात. मात्र क्रिओल ही या देशाची मूळ भाषा आहे.

Non Stop LIVE Update
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.