देशातील कानाकोपऱ्यात दिसणाऱ्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरचे महत्त्व काय? कसे करते काम?
देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक राज्यात, लहान गाव-गावात, रस्ते-खेड्यापाड्यात सर्वत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर दिसतात. (How do electricity transformers work)
मुंबई : देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक राज्यात, लहान गाव-गावात, रस्ते-खेड्यापाड्यात सर्वत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर दिसतात. हे ट्रान्सफॉर्मर्स आपल्या घर, ऑफिस तसेच इतर सर्व ठिकाणी वीज पोहोचवण्यासाठी खूप गरजेचे असतात. जर तुमच्या आजूबाजूला ट्रान्सफॉर्मर नसतील तर तुमच्या घरातील सर्व विद्युत उपकरणं चालूच होणार नाही. इतकंच नाही तर तुमच्या घरातील विद्युत उपकरणांना आगही लागू शकते. पण या ट्रान्सफॉर्मरचे नेमकं काम काय? ते कसे काम करते? याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (How do electricity transformers work)
ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय?
ट्रान्सफॉर्मर हे विद्युत उपकरण आहे. विजेचा दाब कमी-जास्त करणे, सामान्यपणे वीज पुरवठा करणे हे ट्रान्सफॉर्मरचे मुख्य काम असते. ट्रान्सफॉर्मर हे आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करण्याचे काम करतो. एखाद्या परिसरातील लोकांना अधिक व्होल्टेज ऊर्जा आवश्यक असल्यास तिथे अधिक व्होल्टेज वीज पुरवठा केला जातो. तर ज्या ठिकाणी कमी व्होल्ट उर्जा आवश्यक असेल, तर त्या भागात कमी व्होल्टेजने वीज पुरवठा केला जातो.
ट्रान्सफॉर्मरचे नेमकं काम काय?
अनेकदा ट्रान्सफॉर्मर स्वतः वीजनिर्मिती करते, असा गैरसमज असतो. पण तसे नाही. ट्रान्सफॉर्मर्स हे आपल्या घरात वीज पोहोचवण्याचे एक साधन आहे. ट्रान्सफॉर्मर विजेच्या आवश्यकतेनुसार कमीत कमी किंवा जास्तीत जास्त विजेचा पुरवठा केला जातो.
ट्रान्सफॉर्मर्सचे अनेक प्रकार
विद्युत इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर्स म्युच्युअल इंडेक्शनच्या तत्त्वावर कार्य करतात. ट्रान्सफॉर्मर्सचे अनेक बरेच प्रकार आहेत. त्यांचे प्रामुख्याने 3 भिन्न रुप असतात. ट्रान्सफॉर्मर हे आऊटपुट व्होल्टेज, कोर स्ट्रक्चर आणि फेजच्या संख्येच्या आधारावर विभागण्यात आले आहेत. आउटपुट व्होल्टेज अंतर्गत स्टेप-अप आणि स्टेप-डाउन असे दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स येतात. तसेच कोरच्या संरचनेवर कोर टाईप आणि शेल टाईप असे दोन प्रकारचे आहेत. तर फेजच्या संख्येच्या आधारे अवलंबून असलेले ट्रान्सफॉर्मर हे प्रामुख्याने सिंगल फेज आणि थ्री फेजचे असतात. (How do electricity transformers work)
PHOTO: ‘राधे’ चित्रपटातला सलमान खानचा बॉडी डबल पाहिलात का?https://t.co/5jNlsgaYU2 #ParvezKazi #SalmanKhan #Bollywood
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2021
संबंधित बातम्या :
पुढच्या आठवड्यात दिसणार वर्षातील शेवटचा ‘सुपर फ्लॉवर मून’, जाणून घ्या भारतात कसे दिसेल चंद्रग्रहण