सार्वजनिक ठिकाणी फ्री wifi चा पर्याय मिळाल्यानंतर ऑनलाईन ट्रांजेक्शन करणे आणि फोन अपडेट करणे युजर्सना महागात पडू शकते. एयरपोर्ट, रेल्वे स्टेशन, रेस्टॉरंट्स या इतर सार्वजनिक ठिकाणी मिळणाऱ्या फ्री Wifi च्या माध्यमातून हॅकर्स युजर्सना त्यांची शिकार बनवू शकतात. Wifi च्या माध्यमातून ते तुमच्याशी संबंधित असणारी माहिती जसे की, बँक अकाऊंट सारखी माहिती चोरी करू शकतात. यासाठी सावध राहण्याची आवश्यकता आहे. फ्री-wifi किती धोकादायक आहे, जर कुठे याचा वापर करत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कधी याचा वापर करू नये, जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे..
फ्री-wifi किती धोकादायक आहे?
सायबर सिक्योरिटी फर्म कैस्परस्कायच्या रिपोर्टनुसार फ्री wifi सिक्योर आहे की नाही, एक सामान्य युजर याचा अंदाज लावू शकत नाही. बऱ्याचदा याचा वापर करण्यासाठी ऑथेंटिकेशनची गरज पडत नाही. हिच बाब हॅकर्स साठी जमेची बाजू ठरते. अशा परस्थितीमध्ये लोक अगदी सहजरीत्या wifi नेटवर्कसोबत कनेक्ट होतात. त्यानंतर हॅकर्सना फोनद्वारे कित्येक प्रकारची माहिती चोरी करण्याची संधी मिळते. कैस्परस्कायच्या रिपोर्टनुसार, वायफाय सिक्योर नसल्यास हॅकर्स युकर्सच्या मोबाईलमध्ये असे मालवेअर पोहोचवतात जे फोनमध्ये होणारी ॲक्टिविटी त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. यासाठी एक्सपर्ट सांगतात की अशा फ्री कनेक्शनचा वापर करताना आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
फ्री-wifiचा वापर करताना ही गोष्ट लक्षात ठेवा
१- काही शेअर करू नका – एक्सपर्ट सांगतात की, सार्वजनिक wifi चा वापर करतेवेळी कोणत्याही प्रकारची फाईल, फोटो किंवा फोल्डर दुसऱ्यांना शेअर करण्यापासून स्वतः ला वाचवा. असे केल्यास हॅकर्सपर्यंत ती माहिती पोहोचण्याचा धोका अधिक वाढतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या दरम्यान बँक ट्रांजेक्शन करण्यापासून सुध्दा आपण वाचायला हवे.
२- VPN कनेक्शनचा वापर करा- जर मोबाईल किंवा लॅपटॉपवर काही महत्वाचे काम करत असाल आणि सार्वजनिक वायफाय सुविधा वापरत असाल तर VPN चा वापर करावा. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर अनेक VPN App उपलब्ध आहेत. Wifi कनेक्शनचा वापर करण्याआधी VPN App डाऊनलोड करून ऑन करावे. या App चा वापर करत असाल तर हॅकर्सना तुमचा डेटा चोरी करणे अवघड होवून जाते.
३- फ्री कनेक्शन प्रत्येकवेळी ऑन ठेवू नका – लक्षात असूद्या की फ्री-Wifi कनेक्शन असल्यास ते नेहमी ऑन ठेवू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल आपले काम संपले आहे तर त्यावेळेस कनेक्ट असलेले Wifi त्वरित ऑफ करावे. जसे की समजा तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्पुटरला फ्री Wifi ला कनेक्ट केले आहे आणि तुम्ही वर्ड किंवा एक्सेलवर काम करत असाल तर लगेच wifi बंद करणे एक चांगला पर्याय ठरतो. तसेच हल्ली अधिकतर ऑपरेटिंग सिस्टम बेसिक फायरवॉल असलेल्या असतात. त्यामुळे हे ऑन ठेवल्यास हॅकिंगचा धोका कमी होतो.