कोणत्याही जिल्ह्यामधील (District) कायदा व प्रशासन व्यवस्था (Law and Order) सुरळीत ठेवायची असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस यांच्यावर असते. याच कारणामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जिल्हा पातळीवर प्रमुख पोलीस ठाणे असते. एका जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस ठाण्याचा समावेश असतो. या ठाण्यात अनेक पोलीस अधिकारी व अन्य कर्मचारी असतात. अशा मध्ये अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की, या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वात मोठे पद असलेले अधिकारी नेमके कोणते ? पोलीस ठाण्यांमधील मुख्य अधिकारी (Police Officer) साहेब कसे ओळखायचे? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत असतात. जर याच प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये देखील निर्माण होत असतील तर आज यायच उत्तर जाणून घेणार आहोत.
ठाणे किंवा पोलीस स्टेशन हे एक असे कार्यालय आहे, जिथे पोलीस विभागांचे महत्त्वाचं केंद्र असते. पोलीस ठाण्याची स्थापना प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्षेत्रानुसार केली जाते. ठाण्यामध्ये कार्यालय, लॉकर अस्थायी स्वरूपात जेल, वाहन पार्किंग आणि चौकशी कक्षासोबतच पोलीस कर्मचारी यांच्यासाठी राहण्यासाठी व आराम करण्यासाठी कक्ष देखील असतात.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस ठाणे असतात, जेथे जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) किंवा पोलीस अधीक्षक (SP) यांच्या अंतर्गत कार्य केले जाते. जेव्हा एखाद्या नागरिकाला कायदेशीर व्यवस्था संदर्भातील काही समस्या निर्माण होतात किंवा एखादा व्यक्ती एखाद्या गुन्ह्याचा शिकार होतो अशावेळी ती व्यक्ती आपल्या विभागातील पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन तक्रार करते. तक्रार केल्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतात.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस ठाणं आपल्याला पाहायला मिळतं. पोलीस यंत्रणा जिल्ह्यातील कायदेशीर सुरक्षा व व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशावेळी प्रत्येक विभागामध्ये एक प्रभारी अधिकारी असतात. यांना एसएचओ (SHO), एसओ (SO), प्रभारी निरीक्षक (Inspector in charge), ठाणेदार आणि कोतवाल या नावाने ओळखलं जातं. पोलीस ठाण्यातील सर्वात मोठे अधिकारी संपूर्ण पोलीस स्टेशनची जबाबदारी सांभाळतात. या पदावर रँक इंस्पेक्टर अधिकारी यांची नेमणूक केलेली असते. अनेक विभागांमध्ये सब इन्स्पेक्टर यांना देखील पोलीस ठाण्याचा चार्ज दिलेला असतो. त्यांना एसओ असे म्हणतात.
जिल्ह्यातील सर्वात मोठे पोलीस अधिकारी म्हणजेच एसएसपी किंवा एसपी! त्यांच्या सूचनेनुसार इतर कर्मचारी कार्य करतात. त्यांची नियुक्ती आणि बंदोबस्ताची ड्युटी सुद्धा एसपी किंवा ठरवतात. कोणत्याही पोलीस ठाण्यातील स्टाफ प्रभारी अधिकारी यांच्या सूचनेवरच कार्य करतात. मारामारी, हत्येसारख्या प्रकरणांमध्ये पोलीस स्टेशन मधील अधिकारीच प्रामुख्याने तपासणी करतात.
मोठ्या जिल्ह्यात आणि महानगरांमध्ये पोलीस कमिशनर प्रणाली लागू असते. अशा ठिकाणी ठाण्याचे एसएचओ, एसओ, प्रभारी निरीक्षक, ठाणेदार आणि कोतवाल या साऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त यांच्या खांद्यावर असते.
असे युद्ध ज्यात 5 कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले, जाणून थक्क व्हाल युद्धामागील रक्तरंजित कहाणी
प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !
हक्काच्या कारमध्ये बसून दारू पिणं का ठरतं बेकायदेशीर? ‘हे’ आहे यामागचं नेमकं कारण!