इमरान खान जेलमध्ये, घरचे जेवण, नमाजसाठी चटई नाही; आता कोर्टाने दिला हा आदेश

जेल अधिकाऱ्यांना इमरान खान यांना त्यांचे मित्र, नातेवाईक आणि वकिलांसोबत बैठक करण्याची सुविधा दिली जाईल. प्रत्येक आठवड्याला त्यांना फक्त एक बैठक घेता येईल.

इमरान खान जेलमध्ये, घरचे जेवण, नमाजसाठी चटई नाही; आता कोर्टाने दिला हा आदेश
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 3:05 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. जेलमध्ये असताना घरचं जेवण द्यायचं की, नाही यावर आदेश दिलेला नाही. परंतु, शनिवारी कोर्टाने जेल अधिकाऱ्यांना एक आदेश दिला. त्यानुसार, माजी पंतप्रधानांना नमाज पठणासाठी मॅट आणि पवित्र कुराणची एक कॉपी देण्यात यावी. इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आमिर फारुख यांनी हा आदेश दिला. पाकिस्तानातील तहरीक-ए-इंसानचे नेते इमरान खान यांना कुराणची इंग्रजी अनुवादित प्रत देण्यात यावी. हायकोर्टाने पीटीआय प्रमुखाच्या याचिकेवर इमरान खान यांना आदियाला जेलमध्ये शिफ्ट करण्याचा आदेश दिला. शिवाय पुढील सुनावणीसाठी मदत मागितली की, इमरान खान यांना घरचे जेवण द्यायचे की नाही.

जेवणासंबंधी आदेश न आल्याने निराशा

जेलमध्ये असलेले इमरान खान यांना घरील जेवण मिळत नाही, यावर पक्षाने चिंता व्यक्त केली आहे. पीटीआयच्या एक नेता फारूख हबीब यांनी ट्वीटरवर आपली नाराजी व्यक्त केली. इमरान खान भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी सापडल्याने शिक्षा भोगत आहेत.

कोर्टाने असेही निर्देश दिले की, जेल अधिकाऱ्यांना इमरान खान यांना त्यांचे मित्र, नातेवाईक आणि वकिलांसोबत बैठक करण्याची सुविधा दिली जाईल. प्रत्येक आठवड्याला त्यांना फक्त एक बैठक घेता येईल. हायकोर्टाने इमरान खान यांना प्रार्थना चटई, कुराणचा इंग्रजी अनुवाद आणि चिकित्सा सुविधा देण्याचे आदेश दिले.

जेलमध्ये भेटली पत्नी बुशरा

हायकोर्टाने शुक्रवारी निर्णय दिला की, इमरान खान यांना वकील जेलमध्ये भेटू शकतात. गुरुवारी इमरान खान यांची पत्नी बुशरा यांना पहिल्यांदा भेटण्याची परवानगी दिली. परंतु, अद्याप वकिलांची टीम इमरान खान यांना भेटू शकली नाही.

तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणी कोर्टाने इमरान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. ५ ऑगस्टपासून इमरान खान जेलमध्ये आहेत. लाहौर येथील कोर्टाने इमरान खान यांचा जामीन अर्ज फेटाळला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.