आर्टिफिशीएल इंटॅलिजन्सकडून वाढला भरोसा, ही अशक्य गोष्ट होणार का शक्य, शास्त्रज्ञ करताहेत काम
आर्टिफिशीएल इंट्रलिजन्सचा वापर करून मृत व्यक्तीला जीवंत कसे ठेवता येईल, यावर वैज्ञानिक काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून यावर शोध सुरू आहेत.
नवी दिल्ली : जगात आपण जास्त जगलो पाहिजे, असं बहुतेकांना वाटते. याला बळ देण्याच काम विज्ञान आणि तंत्रज्ञान करत आहे. देशात आणि जगात आर्टिफिशीएल इंटॅलिजन्सचा डंका वाजत आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला जीवंत ठेवण्यावर भर दिला जात आहे. मृत्यूनंतर पुन्हा जीवंत होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अमेरिका, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रिलीया यासारख्या देशांमध्ये आर्टिफिशीएल इंटॅलिजन्सचा वापर वाढत आहे. आर्टिफिशीएल इंट्रलिजन्सचा वापर करून मृत व्यक्तीला जीवंत कसे ठेवता येईल, यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून यावर शोध सुरू आहेत.
काय आहे क्रायोनिक्स फॅसिलीटी
मृत शरीराला पुन्हा जीवंत करण्याच्या व्यवस्थेला क्रायोनिक्स फॅसिलीटी असे म्हणतात. या प्रक्रियेत मृत व्यक्ती पुन्हा जीवंत होईल या आशेने त्याचे शरीर सुरक्षित ठेवले जात आहे. पार्थिव शरीराला स्टीलच्या मोठ्या बॉक्समध्ये ठेवले जाते. त्यात आधी नायट्रोजन भरले जाते. या बॉक्सचे तापमान सुमारे १९६ डिग्री सेल्सिअस ठेवले जाते.
मृत्यूचे मुळ कारण काय?
अमेरिकेच्या एरिजोना शहरात याच्याशी संबंधित कंपनीने सुमारे २०० मृतदेह ठेवले आहेत. सुमारे दीड हजार लोकांनी मृत्यूपूर्वी याचे फार्म भरले आहेत. मृत्यूनंतर आपले शरीर आणि मेंदू पुन्हा जीवंत व्हावा, या आशेने हे केले जात आहे. परंतु, अद्याप जगात कुणालाही यात यश आले नाही. आर्टिफिशीएल इंटॅलिजन्सच्या माध्यमातून जीवनाचे मुळ स्त्रोत आणि मृत्यूचे मुळ कारण शोधले जात आहे.
तर त्याच्या जीवनाचा उद्देश काय असेल?
आर्टिफिशीएल इंटॅलिजन्सने जगात नॅनो टेक्नॉलॉजीपासून रोबोटिक्सपर्यंत अनेक शोध लावले. मृतदेहांना सुरक्षित ठेवले जात आहे. परंतु, मृत्यू व्यक्तीला जीवंत ठेवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास समाजापुढं मोठं आव्हान राहणार आहे. एखादा व्यक्ती मृत्यूच्या २० ते २५ वर्षांनंतर जीवंत झाला तर त्याच्या जीवनाचे उद्देश काय असेल.