भारतीय सेनाचे जवान काश्मीरमध्ये प्रत्येक क्षण देशाच्या सुरक्षेत तैनात असतात परंतु आता भारतीय सेना (Indian Army) काश्मीरी मुलांच्या शिक्षणासाठी पुढे येत आहे.आता सेनाने देशातील लोकप्रिय कोचिंग सुपर-30 (Super-30) प्रमाणेच सुपर-50 बनवण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. हो, खरंच भारतीय सेना आता मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. सेनाने नॉर्थ कश्मीर मध्ये सुपर 50 नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे,ज्याच्या माध्यमातुन मुलांना शिकवले जाईल. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना मोफत शिक्षण सुविधा पुरवली जाईल आणि मुलांना मेडिकल स्पर्धा परीक्षासाठी( Medical Exam) देखील तयार केले जाईल. एवढेच नाही तर ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले आहे,अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सेनाकडून आर्थिक मदत दिली जाईल. भारतीय सेना कडून गरीब कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया भारतीय सेना कडून अजून कोण कोणत्या प्रकारची मदत केली जाईल आणि सुपर 50 मध्ये मुलांना कशा प्रकारचे शिक्षण सुविधा दिली जाईल याबद्दल…
काश्मीरमधील परिस्थिती होत आहे सर्वसामान्य
एएनआयच्या एका रिपोर्ट नुसार, मेजर जनरल एसएस स्लारिया यांनी सांगितले की, उत्तर कश्मीरमध्ये सध्या स्थिति सामान्य होत आहे. त्यांनी म्हंटले की, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येमध्ये वाढ होत आहे त्याचबरोबर आतंक निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये घट झाल्यामुळे येथील परिस्थिती आता सर्व सामान्य होत आहे. उत्तर काश्मीर मधील सुरक्षा स्थिती सध्या स्टेबल आहे आणि म्हणूनच भविष्यात येथील वातावरण सुद्धा लवकरच सर्वसामान्य होईल अशी आशा सुद्धा वर्तवण्यात येत आहे.
त्यांनी बातचीत करताना सांगितले की, हल्ली आतंकी घटना दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि संप संदर्भात असणाऱ्या घटना देखील कमी होत आहेत. पर्यटन क्षेत्र पर्यटकांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेला आहे. अनेक विद्यार्थी शाळेत सुद्धा जात आहेत. तरुण मंडळींनी आपल्या आदर्शांना योग्य पद्धतीने निवडायला हवे. जर योग्य व्यक्तींना तरुण मंडळींनी आदर्श मानले तर त्यांचे भवितव्य सकारात्मक व प्रगतीशील राहिल.
नेमका काय आहे सुपर 50 फॉर्मूला?
सेनेच्या संस्थानमधील शिक्षक वाहिद फारूक यांनी सांगितले की, सेनेच्या या उपक्रमात 30 मुले आणि 20 मुलींना निवडले जाते आणि यांना मोफत मध्ये पुढील शिक्षण दिले जाते. आपणास सांगू इच्छितो की, या उपक्रमाची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येक शाळेशी संपर्क साधून सुपर 50 साठी परीक्षाचे आयोजन केले गेले.या शिक्षकानी सांगितले की ,वर्षे 2018 मध्ये आम्ही 30 विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत प्रवेश दिला त्यातील 25 विद्यार्थ्यांनी मेडिकल कॉलेजची प्रवेश परीक्षा दिली आणि या परीक्षेत हे मुले पास सुद्धा झाली. या प्रोजेक्टला 2021 मध्ये सुपर 30 ते सुपर 50 मध्ये रूपांतर करण्यात आले त्यानंतर या उपक्रमात मुलींना सुद्धा समाविष्ट करण्यात आले.
सोबतच त्यांनी सांगितले की आमच्याकडे 30 मुले आणि 20 मुली शिकत आहेत, त्यांना त्यांच्या इच्छा,ध्येय पूर्ण करण्यासाठी मोफत शिक्षण सुविधा पुरवली जात आहे. विद्यार्थ्यांना एम्स सारख्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर भारतीय सेना या विद्यार्थ्यांची फी सुद्धा भरत आहे. या उपक्रमांतर्गत निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड हा उच्च ठरलेला आहे म्हणजेच या मुलांनी 100 टक्के यश प्राप्त केले आहे आणि असे म्हटले जात आहे की मुलीसुद्धा 100% च्या आकडा पर्यंत भविष्यात नक्की पोहोचतील. असा भारतीय सेना सकारात्मक विचार देखील करत आहे.
अशी पार पाडली जाते ॲडमिशन प्रक्रिया
भारतीय सेनाच्या सुपर 50 मध्ये 50 मुलांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखती च्या आधारावर केली जाते. सोबतच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा दिली जाते. तसे पाहायला गेले तर शहरांमध्ये मेडिकल कोचिंग साठी लोकांना 2 ते 3 लाख रुपये खर्च करावा लागतो परंतु भारतीय सेना या सगळ्या सुविधा अगदी मोफत मध्ये विद्यार्थ्यांना पुरवत आहे.