कोण आहेत आयपीएस बसंत रथ, ज्यांना केंद्र सरकारनं वेळेपूर्वी सेवानिवृत्त केलं
बसंत रथ यांनी आपले शिक्षण जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली येथून पूर्ण केले. वर्ष २००० मध्ये सिव्हील सेवा परीक्षा पास करून भारतीय पोलीस सेवा निवडली.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गैरव्यवहाराचे आरोप करून वरिष्ठ आयपीएस अधिकारी बसंत रथ यांनी वेळेपूर्वी सेवानिवृत्त केले. गृहमंत्रालयाने याची अधिसूचना जारी केली. गेल्या काही दिवसांपासून ते निलंबित होते. गेल्या महिन्यात सरकारने त्यांचे निलंबन सहा महिने वाढवले होते. बसंत रथ २००० बॅचचे अरुणाचलप्रदेश, गोवा, मिझोरॅम आणि केंद्र शासित प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. जम्मू-काश्मिरमध्ये असताना ते काही वादामध्ये अडकले. काश्मीरमध्ये आयजीपी ट्रॅफिक येथे असताना बसंत रथ यांचे डीजीपी दिलबाग सिंह यांच्याशी मतभेद समोर आले होते.
कोण आहेत आयपीएस बसंत रथ
बसंत रथ मूळचे ओडिशाचे राहणारे. जन्म १९७२ साली पिपली, उत्तरकाशी येथे झाला. बसंत रथ यांनी आपले शिक्षण जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली येथून पूर्ण केले. वर्ष २००० मध्ये सिव्हील सेवा परीक्षा पास करून भारतीय पोलीस सेवा निवडली. जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात त्यांची पहिली पोस्टिंग झाली. बसंत रथ सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात.
काही वादामध्ये नाव समोर आले
आयपीएस बसंत रथ यांचे नाव काही वादामध्ये समोर आले. २०१८ मध्ये त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये एका सेना अधिकाऱ्याची कार जप्त केली होती. ते अधिकारी एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा मुलगा आणि जावई होते. काँग्रेसचे आमदार उस्माद मजीदने बसंत रथ यांच्यावर दबंद पोलीस अधिकारी असल्याचा आरोप लावला.
तत्कालीन सीएम महबूबा मुफ्ती यांचे माध्यम विश्लेषक जावेद त्राली यांच्यासोबत त्यांचा वाद होता. सर्वात जास्त चर्चा झाली ती डीजीपी दिलबाग सिंह यांच्यासोबत झालेल्या वादाची. त्यावेळी बसंत रथ जम्मू काश्मीरचे वाहतूक आयजीपी होते. त्यानंतर श्रीनगरमधील महापौर जुनैद मट्टू यांच्याशी वाद झाला. त्यामुळे बसंत रथ यांना होमगार्ड आणि सिव्हील डिफेन्समध्ये पाठवण्यात आले.
राजीनामा लिहून व्यक्त केली निवडणूक लढण्याची इच्छा
२५ जून रोजी राजीनामा देऊन बसंत रथ यांनी निवडणूक लढण्याची इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली. त्यांनी लिहिले होते की मला राजकारण करायला आवडेल. त्यांनी आपला राजीनामा जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता यांना लिहिला. त्यानंतर डीजीपी दिलबाग सिंह यांना कमांडंट जनरल होम गार्ड्स आणि नागरी सुरक्षा देण्यात आली होती. त्यावेळी बसंत रथ हे होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्स विभागात कार्यरत होते. बसंत रथ यांनी असा दावा केला होता की, ते भाजपामध्ये सहभागी होऊन काश्मीरमधून निवडणूक लढणार.