100 उंट, 60 हजार गुलाम, 12000 नोकर, आणि सोन्याची खाण; विश्वातील सर्वात श्रीमंत माणूस

असा एक व्यक्ती ज्याची संपत्तीशी तुलना कोणाच्याच संपत्तीसोबत होऊ शकत नाही. संपूर्ण पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून त्याची ओळख आणि ख्याती आहे. आजही त्याच्या संपत्तीशी तुलना होऊ शकेल अशी संपत्ती कोणाकडेच नसल्याचं म्हटलं जातं. 12000 नोकर ते सोन्याची खाण असेलला असा श्रीमंत व्यक्ती पुन्हा कधी होणे नाही असही म्हटलं जातं.

100 उंट, 60 हजार गुलाम, 12000 नोकर, आणि सोन्याची खाण; विश्वातील सर्वात श्रीमंत माणूस
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 2:11 PM

आज जर पाहिलं तर जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण तर बरीच नावं समोर येतील. पण असा व्यक्ती ज्याच्यापेक्षा श्रीमंत कोण झाला नाही आणि कदाचितच कधी होईल. त्याच्या संपत्तीचे आजही तेवढीच चर्चा होते. ज्याच्याकडे 100 उंट, 60 हजार गुलाम; हा पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस 100 उंट, 60 हजार गुलाम, 12000 नोकर, आणि सोन्याची खाणच होती. असा अब्जाधीश पुन्हा पृथ्वीवर होणे नाही.

विश्वातील सर्वात श्रीमंत माणूस

या व्यक्तीचं नाव आहे मानसा मुसा. 14 व्या शतकात आफ्रिकन खंडावर राज्य राजा. मानसा मुसाचा जन्म 1280 मध्ये झाला होता. याला पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखलं जायचं. प. अफ्रीका महाकाय सत्ता माली सल्तनतची गादी 1312 मध्ये मानसाकडे आली. आजच्या काळाशी तुलना केली तर मानसाकडे असणारी संपत्ती म्हणजे 400 अब्ज डॉलर्सच्यापेक्षाही जास्त होती. दरम्यान आजही त्याच्याएवढा श्रीमंत माणूस कोणी झालं नाही असं म्हटंल जातं.

मनसा मुसा स्वत:ला राजा म्हणून पाहत असताना, तो स्वत:ला देवाचा एक निष्ठावान सेवक म्हणूनही पाहत असे. मानसाच्या राज्यात अनेक नैसर्गिक साधनसंपत्ती होती. त्यामुळे त्यांची संपत्ती कायम वाढतच गेली होती. त्याच्याकडे अनेक सोन्याच्या खाणी होत्या. मुसाचे राज्य टिंबक्टूपासून सुरू व्हायचे ते आयव्हरी कोस्ट, माली, बुर्किना फासो, सेनेगल आणि अनेक आफ्रिकन देशांपर्यंत विस्तारलेले होतं.

जेवढा श्रीमंत तेवढाच उदार आणि बुद्धिमान

इतिहासकार सांगतात, त्याच्याकडे जेवढी संपत्ती होती, तेवढाच तो उदार आणि बुद्धिमानही होता. मुसाबद्दल असंही म्हटलं जातं की जेव्हा कोणी त्याच्याकडे काही मागायला यायचं तेव्हा तो त्याच्या पिशवीत सोनं भरायचा. 1324 हे वर्ष म्हणजे मुसाचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. त्या वर्षी त्याने मक्केचा प्रवास केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सहारा वाळवंट पार करणारा हा सर्वात मोठा काफिला होता.

12000 नोकर, 100 सोन्याने भरलेले उंट आणि 60 हजार गुलाम

माहितीनुसार तेव्हा त्याच्या सोबत प्रवासात 12000 नोकर, 100 सोन्याने भरलेले उंट आणि 60 हजार गुलाम असायचे. या प्रवासात मुसाने 18 टन सोने उंटांवर नेल्याचे इतिहासकार सांगतात. आजच्या काळात त्याची किंमत 1 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त असेल. एवढच नाही तर मुसाचे एवढे सोने गेले तरी कुठे असं विचारलं तर मुसाने गरिबांना ते सोने दान केल्याचंही म्हटलं जातं. त्याला इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाते.

भौतिक संपत्तीच्या बाबतीत, मानसा मुसापेक्षा कोणीही कधीही श्रीमंत झाला नाही आणि कोणीही असेल अशी शक्यता नाही. मानसा मुसासची बहुतेक संपत्ती सोन्यात होती आणि त्याच्याकडे भरपूर सोने होते. त्याच्याकडे बरीच जमीनही होती. वयाच्या 57 व्या वर्षी तो मरण पावल्यानंतर , साम्राज्याचा वारसा त्याच्या पुत्रांना मिळाला जे साम्राज्य एकत्र ठेवू शकले नाहीत. छोटी राज्ये तुटली आणि साम्राज्य कोसळले.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.