शत्रूचा जागीच खात्मा करणारे कमांडो का नाही घालत अंडरविअर? असं काय घडलं 65 वर्षांपूर्वीच्या लढाईत

Commandos Underwear | तुम्हाला मथळा वाचून वाटेल की, काय राव, हा काही विषय आहे का? पण असे विषय सहसासहसा समोर येत नाहीत. 1970 मध्ये अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धाविषयी तुम्हाला माहिती असेल. पण कमांडोचं हे अंडरविअर पुराण तुम्हाला माहिती नसेल. जिंकण्यासाठी केव्हा काय स्ट्रॅटर्जी ठेवण्यात येईल, हे सांगता येत नाही...

शत्रूचा जागीच खात्मा करणारे कमांडो का नाही घालत अंडरविअर? असं काय घडलं 65 वर्षांपूर्वीच्या लढाईत
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 9:34 AM

नवी दिल्ली | 7 जानेवारी 2024 : जगातील अनेक देशांकडे मोठे सैन्य दल आहे. लष्करी ताकदीच्या जोरावर अनेक देश दादागिरी करतात, हे आपण पाहत आहोत. जगात सध्या दोन युद्ध सुरु आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला आता दोन वर्ष होत आहेत. तर हमास-इस्त्राईल युद्ध पण सुरु आहे. प्रत्येक देशाकडे कमांडोंची (Commando) पण खास तुकडी असते. भले त्याला नाव वेगळं असेल, पण त्यांचे प्रशिक्षण आण कार्य तसेच खडतर असते. त्याविषयी सर्वांनाच जवळपास माहिती आहे. पण एक महत्वाची गोष्ट, कमांडोज स्पेशन ऑपरेशन (Special Operation) वेळी अंडरविअर घालत नाहीत. या मागे काय असेल कारण?

व्हिएतनाममध्ये अमेरिकेचे पोळले हात

तसा हा बुद्धीला न पटणारा विषय. खडतर प्रशिक्षण घेणारे हे कमांडोज युद्धाच्या वेळी वा मोठ्या संकटावेळी अंडरविअर का घालत नाहीत? तर याची पहिल्यांदा चर्चा झाली ती, 1970 मधील अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धावेळी. अमेरिकन फौजांनी व्हितनामवर आक्रमण केले. पण अमेरिकन सैन्याला व्हिएतनामचे वातावरण, जंगल, तिथली भौगोलिक परिस्थिती सर्व काही नवीन होतं. तिथली उष्ण हवामानाने त्यांचे हाल झाले. त्यात अमेरिकचे हात पोळले.

हे सुद्धा वाचा

अंडरविअर न घालण्याचे कारण काय?

व्हिएतनामने अमेरिकन सैन्याचा जंगलातच कडवा प्रतिकार केला. जंगलातील दलदल, चिखल, उष्णता, घामटा काढणारे वातावरण यामुळे अमेरिकन सैनिक हैराण झाले. व्हिएतनामने गोरिला वारने त्यांना अगोदरच बेजार केले होते. त्यात अमेरिकन सैनिकांना अजून दुसऱ्या शत्रूचा सामना करावा लागला. फंगल इन्फेक्शनने अमेरिकन सैनिक बेहाल झाले. टाईट अंडरविअरच या सैनिकांची शत्रू ठरली. त्यांना युद्ध सोडून भलताच त्रास सुरु झाला. या आजाराने इतके भयावह रुप घेतले की सैनिकांची प्रायव्हेट पार्टची त्वचा गळाली. डॉक्टरांचे उपाय थकले. त्यानंतर या सैनिकांना अंडरविअर न घालण्याचा आदेश निघाला.

डायरियाने हिसकावली अंडरविअर

ब्रिटनच्या रॉयल मरीन कमांडोजने 1982 मध्ये फॉकलँड्सवर हल्ला केला. जे मिळेल, ते खायचे आणि युद्ध सुरु ठेवायची वेळ कमांडोवर आली. पण यामुळे त्यांना डायरियाने हैराण केले. डायरियाची लागण सर्वांनाच झाली. त्यामुळे सैनिकांना वारंवार पँट उतरावी लागत होती. अशावेळी ही झंझट संपविण्यासाठी अंडरविअर न घालण्याचे आदेश देण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धात काय झाले

दुसरे महायुद्धात दोस्त राष्ट्रे आणि जर्मनीसह इतर राष्ट्रांमध्ये भीषण युद्ध झाले. विविध प्रदेशात, परिस्थितीत हे युद्ध लढल्या गेले. यावेळी अमेरिका, ब्रिटीश सैनिकांना जमिनीसह समुद्रातील लढाई लढावी लागली. जंगलासह इतर अनेक ठिकाणी आघाडी उघडावी लागली. युद्धाच्या मैदानात अंडरविअर सुखवणे जिकरीचे झाल्याने तसेच इन्फेक्शन आणि खाज यामुळे सैनिकांनी अंडरविअर घालणे सोडले.

काय कधीच नाही घालत अंडरविअर

युद्ध अथवा ऑपरेशन कमी कालावधीसाठी असेल तर कमांडोच अंडरविअर सोबत ठेवतात. पण जर युद्ध अथवा ऑपरेशन प्रदीर्घ काळासाठी सुरु असेल तर मात्र वरिष्ठ अधिकारी अंडरविअर न घालण्याचा सल्ला देतात. त्याचा फायदा सैनिकांना होतो. अर्थात फंगस, इन्फेकशन्स आणि इतर आजार होऊ नये यासाठी काही कंपन्या खास कपडे तयार करण्यावर संशोधन करत आहेत.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.