सध्या देशभरात रस्त्याने प्रवास करताना टोल देण्यासाठी खास फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आलीय. ती आता बंधनकारक झालीय. त्यामुळे तुम्ही फास्टॅग असलेली गाडी चालवत असाल तर काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या खात्यातून दोन वेळा पैसे कपात होऊ शकते. तसं होऊ नये म्हणून महत्त्वाचे 5 नियम समजून घेऊयात.
तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल आणि तरीही तुम्ही फास्टॅगच्या रांगेत आपली कार घातली, तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.
याशिवाय तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसेल किंवा तुमचा फास्टॅग खराब झाला असेल आणि तुम्ही फास्टॅग रांगेत घुसलात तरीही तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.
पेटीएम सुरु करणार फास्टॅग आधारित पार्किंग सेवा
कोणताही गाडी मालक एकच फास्टॅग वेगवेगळ्या गाड्यांसाठी वापरु शकत नाही. प्रत्येक गाडीसाठी वेगळा फास्टॅग आवश्यक आहे.
तुम्ही जर एखाद्या टोलवरुन दररोज प्रवास करत असाल तर तुम्ही यासाठी पासही काढू शकतो.