Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्तमानपत्र वाचताना पानावर वेगवेगळ्या रंगाचे असणारे चार डॉट कधी पाहिलेत का? त्यामागे लपला आहे “हा” अर्थ!!

Colourful Dots on Newspaper : आपल्या सर्वांच्या घरी वर्तमान पत्र येत असतो. Colourful Dots on Newspaper: आपल्या सर्वांच्या घरी वर्तमान पत्र येत असतो. या चार वेगवेगळ्या रंगाच्या डॉटबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहोत.. चला तर मग जाणून घेवूया त्याबद्दल...

वर्तमानपत्र वाचताना पानावर वेगवेगळ्या रंगाचे असणारे चार डॉट कधी पाहिलेत का? त्यामागे लपला आहे हा अर्थ!!
वर्तमानपत्रावरील 4 डॉट्स
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 4:29 PM

तुम्ही प्रत्येक दिवशी वर्तमानपत्र वाचत असाल परंतु कधी वर्तमानपत्र वाचताना एक गोष्ट नोटीस केली आहे का? खरंतर वर्तमानपत्राच्या पानांच्या खाली चार रंगाचे डॉट किंवा एक डिझाइन बनवलेली असते. ही डिझाइन वर्तमापत्रात रोज छापलेली असते आणि विशेष गोष्ट अशी, की प्रत्येक दिवशी हे डॉट एकाच रंगाचे असतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का वर्तमानपत्र जेव्हा प्रिंटिंगला जाते त्यावेळी हे डॉट का बनवलेले असते आणि या डॉटमागे नेमके कारण काय असते. या चार वेगवेगळ्या रंगांचा डॉटचा नेमका अर्थ काय असतो? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर आज आम्ही या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत..

का छापलेले असतात हे चार रंगाचे डॉट?

तसे पाहायला गेले तर चार रंगांचे हे डॉट आपल्याला वर्तमान पत्राच्या खाली छापलेले पाहायला मिळतात. यामागे कारण म्हणजे की हे डॉट आपल्याला प्रिंटिंगबद्दल खूप सारी माहिती सांगत असतात. या वर्तमानपत्राला कोणत्या प्रिंटिंगद्वारे छापले गेलेले आहे. ही एक विशेष प्रकारची प्रिंटिंग असते ज्याला CMYK प्रिंटिंग असे म्हटले जाते. या प्रिंटिंगमध्ये चार रंग असतात.

चार रंग

खरे तर या विशेष प्रिंटिंगमध्ये चार रंग आपल्याला पाहायला मिळतात, ते चार रंग म्हणजे निळा, मजेंटा (रानी रंग), पिवळा आणि काळा असतात. ज्यात या रंगाचा समावेश असतो.

अन्य रंगापेक्षा खूप स्वस्त

तसे पाहायला गेले तर या मूळ रूपात या चार रंगापासून अन्य इतर रंगसुद्धा तयार केले जातात. या सगळ्या रंगांना वर्तमानपत्राच्या पानावर अंथरले जाते आणि याद्वारे पानांची प्रिंटिंग करतेवेळी हे कलर एका स्थानावर क्रमबद्ध पद्धतीने लावले जातात. कोणतेही पान कलर प्रिंट करतेवेळी या चार रंगांची आवश्यकता असते. आपणास सांगू इच्छितो, की टोनर-आधारित किंवा मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रिंटिंगसाठी हे रंग अन्य रंगापेक्षा खूप स्वस्त असतात. अशाप्रकारच्या प्रिंटिंगमध्ये चार रंगाच्या कार्टेजचा वापर केला जातो. अशातच वर्तमानपत्राची प्रिंटिंगसुद्धा अशीच केली जाते आणि या माध्यमातून सांगितले जाते, की हे वर्तमानपत्र कोणत्या पद्धतीद्वारे प्रिंटेड केलेले आहे.

जाणून घ्या खाकी गणवेषाचा संपूर्ण इतिहास, आत्तापर्यंत किती वेळा झालेत गणवेशात बदल?

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा दिनपण असतो! याचं नेमकं कनेक्शन काय आहे?

Rajmata Jijau: आजचाच तो दिवस जेव्हा राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, देश महाराष्ट्रात सोहळा

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.