मुंबई : येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाच राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election 2022) होणार आहेत. राजकीय पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार लोकांना खूष करण्यात व्यस्त आहेत तसेच निवडणूक आयोग सुद्धा निष्पक्ष निवडणूक आयोग निवडणूक(Election Commission) नीट पार पाडण्यासाठी तयारीत लागलेले आहे अशा मध्ये मतदार वर्गाला सुद्धा आपला योग्य उमेदवार निवडण्यासाठी तत्पर असणे गरजेचे आहे. या सोबतच असे काही नियम आहेत या नियमाबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे, जे तुम्हाला मतदान करते वेळी उपयोगी पडतील. तसे पाहायला गेले तर मतदान प्रक्रिया (Voting Process) म्हणजेच वोटींग प्रोसेस बद्दल अनेकांना फारशी माहिती नसते. जसे की जेव्हा आपण मतदान करायला जातो तेव्हा वोटिंग रूम मध्ये उपयोगी पडणारे अनेक नियमांबद्दल आपल्याला फारशी कधी माहिती दिली जात नाही ,ज्यामध्ये दोन रुपये वाला नियमाचा सुद्धा समावेश आहे. अशा वेळी तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की नेमकं दोन रुपये वाला नियम आहे तरी काय…? खरे तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जेथे वोटिंग केली जाते तेथे दोन रुपयांची फी देऊन तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करू शकता. अशातच आपण जाणून घेणार आहोत की हा नियम नेमका काय आहे? आणि यामध्ये दोन रुपयाची नेमकी भूमिका काय असते सोबतच कोणत्या परिस्थितीमध्ये कोणकोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे ,या सगळ्यांबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
विवी पॅट ला देऊ देऊ शकता आव्हान
मतदान करतेवेळी तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मतदान निवडणूक निष्पक्ष व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ईवीएम मशीन सोबत आता विवी पॅटची सुविधा सुद्धा केलेली आहे. ही एक मशीन असते ज्यामध्ये तुम्हाला तुमचे मतदान केल्याची स्लीप मिळते. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास जेव्हा तुम्ही एखाद्या उमेदवाराला मतदान करता तेव्हा 7 सेकंदाच्या आत मध्ये विवी पॅट मशीनमध्ये तुम्हाला एक स्लीप दिसते.या स्लीप द्वारे तुम्हाला कळू शकते की तुमचे मत कोणाला गेले आहे आणि हे पाहून तुम्हाला समाधान लाभू शकते. या स्लीपच्या माध्यमातून तुम्ही मतदान केल्यानंतर त्या मधील निवडणूक चिन्ह व इत्यादी माहिती दिसते.
परंतु अनेकदा अनेक लोक असे आरोप सुद्धा करतात की ज्यांनी एखाद्या नावावर समोरील बटणावर क्लिक केले आहे परंतु निवडणूक चिन्ह विवी पॅट स्लीप मध्ये दिसत नाही ,अशा वेळी मतदार या गोष्टीला आव्हान देऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये मतदार 2 रुपये फी देऊन Form of Declaration’ हा फॉर्म भरून झालेल्या प्रकाराला बद्दल न्याय प्राप्त करू शकतो आणि Rule 49MA अंतर्गत या घडलेल्या प्रकारावर कारवाई सुद्धा करता येते यानंतर पीठासीन अधिकारी मतदाराच्या तक्रारी संदर्भात एक माँक पोल घेतात आणि विवी पॅटला पुन्हा एकदा तपासतात. जर मतदाराने केलेला दावा योग्य असेल तर अशावेळी मतदान थांबवले जाते आणि संबंधित अधिकारीला याबद्दलची माहिती दिली जाते.
जर मतदाराने केलेला दावा चुकीचा ठरला आणि विवी पॅट ही मशीन योग्य पद्धतीने कार्य करत असेल तर अशा वेळी मतदारावर योग्य ती कारवाई केली जाते. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस काही कलम सुद्धा लावून मतदाराला अटक करू शकतात व त्याच्यावर केस दाखल करण्याचा अधिकार सुद्धा पोलिसांना दिलेला आहे.
पोलिंग एजेंट द्वारे सुद्धा करू शकतात तक्रार
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा आपण मतदान करण्यासाठी जातो तेव्हा वोटिंग रूम मध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसोबत पक्षांचे अधिकारी किंवा पोलिंग एजंट सुद्धा बसलेले असतात. हे पोलिंग एजंट सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत मतदार यांना ओळखण्याचे कार्य करतात. जर त्यांना असे वाटत असेल की मतदान करण्यासाठीं आलेला उमेदवार या भागातील नाही ,तो चुकीचा मतदार आहे आणि चुकीच्या पद्धतीने मतदान करत आहे तर अशावेळी त्याला थांबवले जाते यासाठी पोलिंग एजंट 2 रुपये पीठासीन अधिकारी ला देऊन मतदाराची ओळख करण्यासाठी सांगतो त्यानंतर मतदाराची माहिती पडताळून तो योग्य मतदार आहे की नाही हे तपासले जाते. जर तो मतदार योग्य असेल तर अशावेळी पोलिंग एजंट चे 2 रुपये जप्त केले जाते आणि मतदाराला मत देण्यास सांगितले जाते.