मद्यपानाची सवय आहे? मग जाणून घ्या एक ‘पेग’ पोटात जाताच शरीरात काय ‘खेळ’ सुरु होतो!
जेव्हा एखादी व्यक्ती मद्यपान करते, तेव्हा थोड्या काळासाठी त्या व्यक्तीला काहीही होत नाही. परंतु, त्या व्यक्तीचा आवाज थोडासा बदलतो. काही वेळाने त्याला चालणे देखील अवघड वाटू लागते आणि तो शरीरावरचा ताबा गमावून बसतो.
मुंबई : जेव्हा एखादी व्यक्ती मद्यपान करते, तेव्हा थोड्या काळासाठी त्या व्यक्तीला काहीही होत नाही. परंतु, त्या व्यक्तीचा आवाज थोडासा बदलतो. काही वेळाने त्याला चालणे देखील अवघड वाटू लागते आणि तो शरीरावरचा ताबा गमावून बसतो. आपण असा कधी विचार केला आहे का की, असे का घडते. काही वेळानेच का अल्कोहोल त्याचे परिणाम दाखवण्यास सुरूवात करतो?. अशा परिस्थितीत तुम्हाला नेमकं माहित आहे की, अल्कोहोल आपल्या शरीरावर काय-काय परिणाम करू शकतो. चला तर जाणून घेऊया एक ‘पेग’ पोटात जाताच शरीरात नेमकं काय-काय सुरु होतं…(Know exact what happens inside your body when you drink alcohol)
जेव्हा एखादी व्यक्ती मद्यपानाचा पहिला घोट पिते तेव्हा तो तोंडाच्या आत जाताच त्याचा शरीरावर परिणाम होण्यास सुरुवात होतो. अल्कोहोल प्रथम पोटात गॅस्ट्रिक आम्ल तयार करते आणि पोटाच्या आतड्यांत जळजळ सुरु होते. यानंतर, आतडे अल्कोहोल शोषून घेतात आणि त्यानंतर ते विंगद्वारे यकृतापर्यंत पोहोचतात. यकृत खूपच जवळ आहे, म्हणून अल्कोहोल पोटातून थेट यकृतापर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक असते.
मेंदूवर दिसतो परिणाम
डीडब्ल्यूच्या अहवालानुसार नंतर यकृत बरेच अल्कोहोल नष्ट करते आणि शरीरावर होणारे हे प्रभाव कमी करते. तथापि, जे घटक लीव्हर नष्ट करू शकत नाहीत, ते थेट मेंदूपर्यंत पोहोचतात. अशा परिस्थितीत शरीराच्या पॅकचा परिणाम काही मिनिटांतच मेंदूवर दिसू लागतो. मद्यपान मध्यवर्ती मज्जासंस्थेला प्रभावित करते. यानंतर, मज्जासंस्थेचे कनेक्शन खंडित होते, त्यानंतर या पेशी खूप हळू काम करण्यास सुरुवात करतात. मग मेंदू स्वतःच या परिस्थितीला सामोरा काऊ शकत नाही. मद्य मेंदूच्या मध्यभागी असलेल्या भागावर देखील हल्ला करते, ज्यानंतर ती व्यक्ती स्वत:चे नियंत्रण गमावते (Know exact what happens inside your body when you drink alcohol).
अल्कोहोल पिण्यामुळे यकृतावर वाईट परिणाम होतो आणि यकृत आपले कार्य व्यवस्थित करण्यास सक्षम राहत नाही. विशेष गोष्ट अशी आहे की, यकृतमध्ये वेदना होत नाही आणि त्यामुळे मद्यपीला माहित नसते की त्याला नेमक्या कोणत्या समस्या आहेत. जेव्हा ते डॉक्टरकडे तपासणीसाठी जातात तेव्हाच या समस्यांचे निदान होते. म्हणून, जे लोक जास्त मद्यपान करतात, त्यांनी अशी तपासणी केली पाहिजे.
दारू सोडल्यानंतर काय होते?
मद्यपानाची नशा प्रथम मेंदूचा एक भाग असलेल्या सेरेब्रममधून खाली येते. हा भाग शरीराची हालचाल आणि भाषण संस्था नियंत्रित करतो आणि 8-10 तासांनंतर, हा प्रभाव येथून कमी होतो. यानंतर ती व्यक्ती व्यवस्थित बोलू लागते. तसे, सुमारे मद्यपान केल्याच्या दोन दिवसानंतर, मेंदू आधीप्रमाणे काम करण्यास सुरुवात करतो. बराच काळ मद्यपान न केल्यास, एक ते दोन महिन्यांनंतर, पोट देखील व्यवस्थित कार्य करण्यास सुरुवात करते. त्याच वेळी, यकृत बरा होण्यास मात्र अधिक वेळ लागतो आणि अल्कोहोल सोडल्यानंतर यकृत हळूहळू बरे होऊ लागते, परंतु पूर्वीसारखे होऊ शकत नाही.
(Know exact what happens inside your body when you drink alcohol)
हेही वाचा :
काय आहे भारतीय रेल्वेचा चार धाम प्रकल्प? जाणून घ्या कशी जाईल असेल तीर्थयात्रा
जगातील सर्वात महागडे मीठ, तब्बल 8 लाख रुपयांना मिळते एक पॅकेट! जाणून घ्या यामागचे कारण…
भारत कसा बनला इंडिया, कधी मिळाली या शब्दाला मंजुरी, जाणून घ्या यामागचा इतिहासhttps://t.co/ZmvUKdgAZe#Bharat |#Became |#india |#know |#when |#approved
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 28, 2021