फक्त 10 तास, 18 मिनिटांचा दिवस, वर्षातला सगळ्यात लहान दिवस कधी ?
एक दिवस असतो जो वर्षातील सर्वात लहान दिवस मानला जातो. त्याला इंग्रजीमध्ये Winter Solstice असे म्हटले जाते. वर्षातला हा सर्वात लहान दिवस शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबर महिन्यात येतो
एका वर्षात 365 दिवस असतात, हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण यामध्येही असा एक दिवस असतो जो वर्षातील सर्वात लहान दिवस मानला जातो. त्याला इंग्रजीमध्ये Winter Solstice असे म्हटले जाते. वर्षातला हा सर्वात लहान दिवस शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबर महिन्यात येतो. 21 किंवा 22 डिसेंबर रोजी वर्षातील सगळ्यात लहान दिवस मानला जातो. या दिवशी सूर्य हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात आपल्या शिखर बिंदूवर पोहोचतो.त्यामुळेच तो सर्वात लहान दिवस असतो.
तर ज्योतिष शास्त्रानुसार वर्षातील सर्वात लहान दिवसापर्यंत सूर्यदेवाने धनु राशीत प्रवेश केलेला असतो आणि यावेळी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात जाण्याच्या तयारीत असतो. ही वेळ सकारात्मकता प्रदान करणारी असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून या दिवसाचे विशेष वर्णन केले आहे, तसेच या दिवशी काही कामं करणं हे फायदेशीर असते. ती कामं कोणती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
वर्षातील सर्वात लहान दिवशी कोणती कामं करावीत ?
ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील सर्वात लहान दिवस अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते. या काळात सर्व नकारात्मक गोष्टी सोडून द्याव्यात, वाईट सवयी सोडून द्याव्यात आणि जीवनात नवीन संकल्प करावेत. वर्षातील सर्वात लहान दिवशी धर्मादाय कार्य करणे देखील उत्तम मानले जाते.
धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी अन्न, वस्त्र आणि धन दान करणे खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर त्याला बल देण्यासाठी या दिवशी ‘ओम सूर्याय नमः’ या सूर्य मंत्राचा जप करावा. तुम्ही गायत्री मंत्राचा जप करूनही लाभ मिळवू शकता. सूर्य कमकुवत झाल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते. वर्षातील सर्वात छोट्या अथवा लहान असलेल्या या दिवशी सात्विक अन्न खाणे उत्तम मानले जाते, यामुळे शरीराला शक्ती मिळते असे म्हणतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)